आरोग्य विभागात सध्या 18 हजारांहून अधिक रिक्त पदे !! भरती साठी आरोग्य विभागासाठी स्वतंत्र केडर तयार करण्यात येणार
Maha Arogya Vibhag Bharti 2021 – कोरोना संकटाशी दोन हात करीत असलेला राज्याचा आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. राज्य लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आरोग्य विभागासाठी स्वतंत्र केडर तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून आरोग्य विभागातील कर्मचारी भरती करतानाच आरोग्य विभाग प्रशासकीयदृष्टय़ा सक्षम केला जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया अनेक वर्षे रखडली होती. सरकारकडून ही भरती करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरोग्य विभागात सध्या 18 हजारांहून अधिक रिक्त पदे असून तीही भरण्यासाठी व्यापक मोहीम राबविली जात आहे असे राजेश टोपे यांनी सांगितले. त्याचबरोबर आता आरोग्य विभागाचे अधिक बळकटीकरण करण्यासाठी स्वतंत्र केडर तयार करण्यासाठी प्रयत्न केले आज आहेत. यासंदर्भात राज्य शासनाने सुधीर ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली माजी आरोग्य महासंचालक डॉ सुभाष साळुंखे, संचालक डॉ अर्चना पाटील तसेच अन्य तज्ञांची एक समिती नेमली. या समितीने नुकताच आपला अहवाल सादर केला आहे. त्यातील शिफारशीनुसार आरोग्य विभागाचे स्वतंत्र केडर तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून आरोग्य भवनातील अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालकांच्या वर्षानुवर्षे रखडलेल्या पदोन्नतीचा प्रश्नही तातडीने सोडविला जाईल तसेच यापुढे कालबद्ध पदोन्नती दिली जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
हिवताप व हत्तीरोग विभागातील सुमारे ६२% पदे रिक्त
Maha Arogya Vibhag Bharti 2021 – डेंग्यूच्या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी ८०० कर्मचाऱ्यांची गरज असताना शहरामध्ये फक्त २१० च कर्मचारी काम करीत आहे. यामुळे डेंग्यू वर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. अश्यातच हिवताप व हत्तीरोग विभागातील सुमारे ६२% पदे रिक्त आहे. या विभागामध्ये अधिकाऱ्यांची २ पदे मंजूर असताना देखील १ पद रिक्त आहे. याप्रमाणे अनेक मजूर असलेल्या पदांपैकी केवळ काहीच पदे भरली गेली. शहराचा व्याप बघता हि पदे लवकरात लवकर भरणे गरजेचे आहे. अधिक माहिती खाली वाचा..
Maha Arogya Vibhag Bharti 2021
अन्य महत्वाच्या जाहिराती –
-
आरोग्य विभागातील ‘अ’ ‘क’ व ‘ड’ संवर्गातील पदभरती प्रक्रिया सुरु !! 22 ऑगस्ट पर्यंत करा अर्ज -७३००+ पदे
-
सार्वजनिक आरोग्य विभाग द्वारे वाहन चालक गट-‘क’ पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु !!-१४ पदे
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents