Maharashtra govt launches Maha Arogya Skills Development Programme for health sector
मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य योजने अंतर्गत नोंदणी प्रक्रिया व अभ्यासक्रम येथे जाणून घ्या
MahaArogya Skills Development Program – CM Uddhav Thackeray on Thursday launched the CM’s Maha Arogya Skills Development Program, under which 20,000 youths will be provided training from 36 different healthcare courses. Read More information about MahaArogya Skills Development Program, MahaArogya Skills Development Program Syllabus 2021, MahaArogya Scheme Registration 2021, Mukhyamantri Maha-Aarogya Kaushaly Vikas Prashikshan Karykram below:
Mukhyamantri MahaAarogya Scheme
An innovative and ambitious scheme “Mukhyamantri Maha-Aarogya Kaushlya Vikas Prashikshan Kaarykram” has been formulated to provide employment opportunities by providing skill development in the paramedical sector to those who are willing to work in the health sector. For this, training centers have been set up in coordination with medical colleges, government hospitals and excellent private hospitals in the state of Maharashtra.
Candidates in the age group of to 45 years who are interested in skill development training will be given employment oriented skill development training under CM Health Care Skills Development Program in next 3 months.
Short Term Training Under this Skill Development Training Program, various short term courses affiliated to NSQF in the field of Health-Care are imparted to the candidates who are interested in acquiring the skills required for employment. The training duration of these courses is generally up to 600 hours. It is then evaluated by a third party. Successful candidates are certified. Successful candidates are then provided employment / self-employment opportunities.
Mukhyamantri Maha-Aarogya Kaushaly Vikas Prashikshan Karykram
Who is the contact Person/Office for this scheme?
A. Assistant Commissioner, District Skill Development, Employment & Entrepreneurship
Guidance Center.
B. District Vocational Training Officer, Directorate of Vocational Education & Training.
C. Mission Coordinator & Additional CEO, Maharashtra State Skill Development Society
कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
MahaArogya Skills Development Program Syllabus 2021
Sr.No | Document | Download |
---|---|---|
2 | मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम – कार्यपद्धती | इथे क्लिक करा |
3 | अभ्यासक्रम | इथे क्लिक करा |
MahaAarogya Scheme Registration 2021
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, काळाची गरज ओळखून आपण हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करत आहोत. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे आरोग्य विभागाला सर्वाधिक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कोरोना संकटकाळात आपण आरोग्य क्षेत्रासाठी सोयी-सुविधांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली आहे. पण या सोयीसुविधा चालवणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. आता कौशल्य विभागाने आज सुरु केलेल्या उपक्रमातून हे मनुष्यबळ तयार होण्याबरोबरच राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. राज्यात ही योजना प्रभावीपणे राबविली जाईल, असे ते म्हणाले.
ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने प्रशिक्षण – MahaArogya Skills Development Program Registration 2021
“सर्वांसाठी आरोग्य” धोरणाला चालना देण्यासाठी आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ अधिक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्य विकास प्रदान करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. राज्यातील ३४८ इतकी वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय रुग्णालये तसेच उत्कृष्ट खाजगी रुग्णालये यांना प्रशिक्षण केंद्र म्हणून नोंदीत करण्यात आले असून यामाध्यमातून प्रशिक्षणासह ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरिता सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण ५०० प्रशिक्षण केंद्रे कार्यन्वित करण्यात येणार आहेत. या केंद्रांमधून २० हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. यातील ५ हजार उमेदवारांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येईल. दर्जेदार पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये उमेदवारांना हे प्रशिक्षण स्थानिक पातळीवरच उपलब्ध होईल.
How To Register For Maha Arogya Kaushalya Vikas Prashikshan Program 2021
प्रशिक्षणाचा लाभ घेण्याकरिता राज्यातील युवक, युवतींनी कौशल्य विकास विभागाच्या https://www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी.
Mukhyamantri MahaAarogya Scheme Registration 2021
- या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत अल्प मुदतीचे प्रशिक्षण (Short Term Training) रोजगारासाठी आवश्यक ते कौशल्य आत्मसात करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आरोग्य क्षेत्रातील NSQF संलग्न विविध अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येते.
- यामधील अभ्यासक्रमांचा प्रशिक्षण कालावधी सर्वसाधारणपणे ६०० तासांपर्यंत आहे. तद्नंतर त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन केले जाते.
- यशस्वी उमेदवारांचे प्रमाणीकरण करण्यात येते. त्यानंतर यशस्वी उमेदवारांना रोजगार / स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतात.
Age Limit For Mukhyamantri Maha Aarogya Scheme 2021
- कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी इच्छुक १8 ते ४५ या वयोगटातील उमेदवारांना मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत कौशल्य विकासाचे रोजगाराभिमुख प्रशिक्षण पुढील ३ महिन्यात देण्यात येईल.
mahaarogya skills development program registration
Below Is link for Registration On Kaushalya Vikas Prashikshan Karykram-MSSDS Registration 2021
Click Here To Register For Mukhyamantri MahaAarogya Scheme 2021
मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत पॅरामेडिकल व हेल्थकेअर विषयक प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
कोविड १९ प्रादुर्भावामुळे आरोग्य व वैद्यकीय सेवा क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल व हेल्थकेअर विषयक आवश्यक कुशल मनुष्यबळ वाढवण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केली आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यात स्वारस्य असलेल्यांनी पुढील ठिकाणी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.
या योजनेत १८ ते ४५ वर्षे वयोगटातील युवा युवतींना जिल्ह्यातील प्रसिद्ध शासकीय व नामांकित खासगी रुग्णालयामध्ये आरोग्य क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रमामध्ये विना शुल्क प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे.
त्या अंतर्गत आरोग्य क्षेत्रातील रोजगार सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रवेश घेण्याकरिता इच्छुक असलेल्यांनी तातडीने पुढील लिंकवर https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdThDxq5zza8OfEP2uaKW-Q3RwpDz9l7zIVHAoORzBuhV8Biw/viewform?usp=sf_link या ठिकाणी त्वरित आपली नोंदणी करावी. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील. अधिक माहितीकरिता दुरध्वनी क्र. ०२२-२२६२६३०३ यावर किंवा ईमेल mumbaicity.employment@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
या योजनेत 18 ते 45 वर्ष वयोगटातील युवा-युवतींना जिल्ह्यातील प्रसिद्ध शासकीय व नामांकित खासगी रुग्णालयामधील क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रमामध्ये विनाशुल्क प्रशिक्षण देवून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. प्रवेश घेण्याकरिता इच्छुक असणाऱ्यांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfXlE-35EmeZdNCQvmuCLgcc3Qqn89ULU7IY6YSfakEBJHrXA/viewform
या लिंकवर त्वरित आपली नोंदणी करावी. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहिल, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई उपनगर, शोभा शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
3 लाख तरुणांना बँकिंग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्समधील प्रशिक्षण मिळणार
MahaArogya Skills Development Program – A Memorandum of Understanding (MoU) was signed between the Maharashtra State Skill Development Society and the Institute of Cost Accountants of India (ICAI) in the presence of the Minister for Skill Development, Employment and Entrepreneurship, Nawab Malik. In This Over 3 lakh youths in the state will be imparted training in banking, financial services and insurance in the next 3 years. The program will be effectively implemented in all the districts of the state, said Minister Malik.
-
शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास मंडळाचे विविध ३०१ अभ्यासक्रम !! येथे करा अर्ज
-
UX डिझाईन लर्निंग प्रोग्राम प्रशिक्षण – विनामूल्य प्रमाणपत्र मिळवण्यासाठी येथे करा नोंदणी
Maharashtra State Skill Development Society Registration 2021
राज्यातील 3 लाख युवक-युवतींना पुढील 3 वर्षाच्या कालावधीत बँकिंग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्स या विषयातील प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी आज राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (Maharashtra State Skill Development Society) आणि केंद्र शासनाच्या द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. जीएसटी, आयकर आदींविषयक सेवा पुरवठ्याची गरज वाढलेली असताना राज्यातील युवक-युवतींना मिळणारे हे प्रशिक्षण लाभदायक ठरेल. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असे मंत्री मलिक यांनी यावेळी सांगितले.
maharashtra skill development courses
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह, आयसीएआयचे अध्यक्ष एच. पद्मनाभन, माजी अध्यक्ष राकेश सिंग, डॉ. बलविंदर सिंग, बीएफएसआय एसएससीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबरिष दत्ता, ईएमईचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी बालाजी श्रीनिवासनमुर्ती, कौशल्य विकास सोसायटीचे स्किल मिशन ऑफिसर विनय काटोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह आणि आयसीएआयचे अध्यक्ष एच. पद्मनाभन यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करुन त्याचे हस्तांतर केले. आयसीएआय ही केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयांतर्गत कार्यान्वित संस्था आहे.
3 ते 5 महिन्याचे मोफत प्रशिक्षण – Kaushalya Vikas Vibhag Training 2021
या उपक्रमांतर्गत पुढील 3 वर्षात राज्यातील 3 लाख युवक-युवतींना बँकिंग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्स, फायनान्शियल अकाउंटींग, व्यवसाय आणि उद्योगविषयक कायदे, टॅलीद्वारे कॉम्पुटराज्ड अकाउंटींग, इ-फायलिंग आदी विषयातील प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पदवीधारक, पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणारे युवक, बारावीनंतर शिक्षण अर्धवट सोडलेले युवक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 350 तासांचे म्हणजे सुमारे 3 ते 5 महिने चालणारे हे प्रशिक्षण पुर्णत: मोफत असेल. राज्य शासनामार्फत यासाठीचा खर्च केला जाणार आहे. आयसीएआयद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था आदींची निश्चिती करुन प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मंत्री मलिक म्हणाले की, कोरोना आणि इतर आर्थिक संकटामुळे देशात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. वित्तीय क्षेत्रात मनुष्यबळाची वाढती मागणी आहे, पण त्या तुलनेत आपल्याकडे कुशल मनुष्यबळ उपलब्ध नाही. आज झालेल्या सामंजस्य करारातून आणि त्याद्वारे राज्यातील 3 लाख युवक-युवतींना मिळणाऱ्या प्रशिक्षणातून ही कमतरता होईल. या प्रशिक्षणासाठी आवश्यक निधीची उपलब्धता करुन देण्यात येईल. विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील तरुणांना प्रशिक्षण देण्यावर भर
कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या की, राज्यातील विशेषत: वंचित घटकांपर्यंतही हे प्रशिक्षण पोहोचवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. उद्योग आणि वाढत्या आर्थिक क्षेत्राची गरज पाहता हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल. मुलींना तसेच सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील युवक-युवतींना हे प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
आयसीएआयचे अध्यक्ष एच. पद्मनाभन म्हणाले की, आज झालेला सामंजस्य करार हा ऐतिहासिक आहे. देशातील इतर राज्येही असाच उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतील. या उपक्रमातून युवकांना रोजगार किंवा स्वयंरोजगारक्षम प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येईल. महत्वपूर्ण अशा या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाचे अभिनंदन केले.
कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह म्हणाले की, राज्यातील उद्योग आणि सेवा क्षेत्रांच्या नवीन गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काळानुरुप अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणांवर भर देण्यात येत आहे. वाढत्या आर्थिक विकासाच्या पार्श्वभूमीवर त्यासंबंधीत सेवांची मागणी वाढली आहे. आज झालेल्या सामंजस्य करारातून आर्थिक क्षेत्रातील प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents
Social work
मुख्यमंत्री महा आरोग्य कौसल्या विकास प्रशिक्षणासाठी मी इच्छुक आहे
I am pharmacist. Job in covid 5 manth
प्रशिक्षण कधी सुरुवात होणार आहे.
खुप दिवस झाले रजिस्टेशन करुन , प्रशिक्षण ची वाट पाहत आहोत , कधी सुरुवात होणार आहे.
कळावे…..
आपला सहकार्य अपेक्षितच !
धन्यवाद
काहीच रिप्लाय नाही, 8830465763 या नंबर वरील कळवावा…
Kadhi stat honar ahe sir prashikshan. I am very excited. With course for paramedical
सर गडचिरोली जिल्हा मधील प्रशिक्षण कार्यक्रम कधी सुरू होणार आहे त