नवीन महाबळेश्वरच्या प्रोजेक्टमध्ये आता रोप वे चाही समावेश !

नवीन महाबळेश्वरच्या प्रोजेक्टमध्ये आता रोप वे चाही समावेश !

Mahableshwar Tourism :

सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगा , आजूबाजूला असणारी हिरवळ, पावसाळ्यात प्रवाहित होणारे धबधबे अशा निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक महाबळेश्वरला येत असतात. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशात प्रचलित आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. मात्र पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता आता साताऱ्यातच नवे महाबळेश्वर साकार करण्यात येणार आहे. यात आता आणखी एकाची भर पडली असून या प्रकल्पाअंतर्गत रोप वे चा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

उपलब्ध होणार रोप वेचा पर्याय
साताऱ्यातील प्रस्तावित नवीन महाबळेश्वर प्रकल्पात दुर्गम भागातील रहिवाशांना ये जा करण्यासाठी आणि पर्यटकांना पर्यटन स्थळी सुलभ रीतीने जाता यावे यासाठी रोपवेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नवीन महाबळेश्वरचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात येत असून त्या आराखड्यात रोपवे प्रस्तावित आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिथे रस्ते बांधणे ( Mahableshwar Tourism ) किंवा दळणवळणाच्या इतर कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत तिथे रोपवे प्रस्तावित करण्यात येणार आहे.

MSRDC एमएसआरडीसी कडून नवीन महाबळेश्वरचा प्रारूप आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे. हा विकास आराखडा तयार करताना तेथील अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यावर अधिक भर दिला जाणार असल्याचं एम एस आर डी सी कडून सांगण्यात येत आहे. त्यानुसार रस्त्यांचे रुंदीकरण, नवीन रस्ते उपलब्ध करणे, रस्त्यांची दुरुस्ती अशा कामांना आराखड्यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचवेळी जिथे रस्ते व इतर कोणत्याही वाहतुकीच्या सुविधा नसतील तिथे रोपेचा पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती एम एस आर डी सी तील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले आहेत.

एका ठिकाणी होणारी गर्दी दुसऱ्या ठिकाणी वळवण्यासाठी नवे महाबळेश्वर साकारण्यात येणार आहे. यासाठी कोयना बॅक वॉटर च्या भागातील 37 हजार हेक्टर क्षेत्र पाहण्यात ( Mahableshwar Tourism ) आले आहे. सातारा जिल्ह्यातल्या पाटण, जावळी आणि सातारा या तीन तालुक्यांमध्ये 52 गावांमध्ये हे नवीन महाबळेश्वर निर्माण करण्यासाठी प्रस्तावित आहे. पाटण तालुक्यातल्या कराड चिपळूण रस्त्यापासून जावळी खोऱ्यातील कसबे, बामनोली आणि सावरी गावपर्यंतच्या क्षेत्रामध्ये ते विस्तारलेले असेल. नवीन महाबळेश्वर मध्ये सातारा तालुक्यातील ठोसेघर, चाळकेवाडी, आलवडी, जांभे, चिखली, जावळी तालुक्यातील अंधारी, कास, कसबे बामनोली, सावरी, पाटण तालुक्यातील गोशटवाडी, आंबेघर तर्फ, बागलवाडी, सावरघर, चाफोली आदी (Travel) गावांचा समावेश असेल.

नवीन महाबळेश्वर जिथे साकारण्यात येणार आहे तिथला हा परिसर सह्याद्री डोंगररांगांच्या उत्तर दक्षिणेला समुद्रसपाटीपासून 1200 मीटर उंचीवर आहे. या भागातून सुळशी, उरमोडी, कांदाटी या उपनद्या वाहतात यामुळे हा परिसर अतिशय निसर्गरम्य आणि हिरवागार आहे त्याच सोबत घनदाट जंगलं वन्यजीव धबधबे, तलाव, ऐतिहासिक वास्तू यांची मोठी देणगीदेखील या भागाला लाभलेली आहे. त्यामुळेच हा परिसर नवीन महाबळेश्वर ( Mahableshwar Tourism ) साकारण्यासाठी निवडण्यात आला आहे

 

Leave a Comment