MahaPareshan Recruitment 2022

मार्च अखेर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याबरोबरच त्यात मराठी उमेदवारांना प्राधान्य देण्याचे मान्य

MahaPareshan Recruitment 2022 The pending recruitment process in Mahapareshan Power Pump should be completed by the end of March. Also, Rajan Bhanushali, President of Power Employees-Officers-Engineers Sena and MLA Dr. The delegation led by Balaji Kinikar called on Dinesh Waghmare, Managing Director, Mahatrans and Sugat Gamare, Director, Mahatrans at Prakashganga. At this time, the administration has agreed to complete the recruitment process by the end of March and give priority to Marathi candidates.

MahaPareshan Recruitment 2022 

महापारेषण या वीज पंपनीमधील प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया मार्चअखेरपर्यंत पूर्ण करावी. तसेच त्यात शंभर टक्के मराठी उमेदवारांना प्राधान्य मिळावे या मगाणीसाठी वीज कर्मचारी-अधिकारी-अभियंता सेनेचे अध्यक्ष राजन भानुशाली आणि महापारेषण युनिट अध्यक्ष आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रकाशगंगा येथे महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे आणि संचालक सुगत गमरे यांची भेट घेत चर्चा केली. या वेळी प्रशासनाने मार्च अखेर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याबरोबरच त्यात मराठी उमेदवारांना प्राधान्य देण्याचे मान्य केले आहे.

वीज कर्मचारी-अधिकारी-अभियंता सेनेचे अध्यक्ष राजन भानुशाली यांनी संघटना पदाधिकारी विरोधी परिपत्रक तत्काळ मागे घेण्याची मगाणी केली. त्यानुसार प्रशासनाने सदरचे परिपत्रक मागे घेतले आहे. तसेच अनुपंपा व प्रकल्पग्रस्तांची प्रकरणे लवकरच निकाली काढणार, टेलिकॉमची रिक्त पदे भरून आयटीप्रमाणे स्वतंत्र विंग तयार करण्यासाठी समितीची मान्यता घेऊन बीआर काढणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर सफाई कामगारांच्या मुलांना लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार लवकरच भरती करणार, नाशिक व इतर परिमंडळातील मानव संसाधन विभागातील कारभाराची चौकशी करून करवाई करणार, आयटी विभागातील महिला अधिकारी यांची विभागीय चौकशी तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक साळुंखे, कोषाध्यक्ष विठ्ठल देसाई, महापारेषण कार्याध्यक्ष रोहिदास आल्हाट, सहकार्याध्यक्ष प्रवीण पाटील, राजीव कुलकर्णी, विनोद गोसावी आदी उपस्थित होते.


अखेर महापारेषणचा आकृतिबंध लागू !! नवीन हजारो रिक्त पद भरतीचा मार्ग मोकळा

MahaPareshan Recruitment 2022 – General Secretary, Maharashtra State Electricity Workers Federation Krishna Bhoyar, has announced that The revised structure of Mahatransco has been implemented and thousands of new vacancies have been filled very soon. More details about MahaPareshan Recruitment 20221  are as given below:

Mahatransco Bharti 2022

आकृतिबंध मंजूर होत लागू करण्याची प्रकिया सुरू करण्यात आल्यामुळे लवकरच प्रलंबित ४ हजार ५०० तंत्रज्ञ-४ यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून ४ हजारांवर रिक्त असलेले तंत्रज्ञ – ४ प्रवर्गातील पदा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटनिस कृष्णा भोयर यांनी दिली

MahaPareshan Recruitment 2021

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विभाजनानंतर तयार झालेल्या महापारेषण कंपनीतील वर्ग – १ व ४ प्रवर्गातील आकृतिबंधामध्ये पदोन्नतीमध्ये तयार झालेली असमानता दूर करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने २००७ पासून पाठपुरावा करण्यात आला होता. २०१७ मध्ये सुधारित आकृतिबंध लागू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. महापारेषण प्रशासनाने त्रयस्थ के. पी. बक्षी समितीचे गठन केले. बक्षी समितीचा अहवाल महापारेषण कंपनी व्यवस्थापनास सादर करण्यात आला होता. आकृतिबंध लागू करावा या मागणीसाठी प्रकाशगंगा मुख्य कार्यालयासमोर वर्कर्स फेडरेशन सघंटनेच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात आल्यानंतर प्रधान सचिव ऊर्जा यांच्यासमवेत संघटनेचे पदाधिकारी याची बैठक झाली होती.

आकृतिबंधास मान्यता 

ऊर्जासचिव यांनी तेव्हा दिलेला महापारेषण कंपनी संचालक मंडळाची मान्यता घेऊन राज्य सरकारच्या ऊर्जा विभागास मान्यतेसाठी पूर्ण सुधारणेसह एप्रिल-२०२१ मध्ये हा विषय सादर केला होता. सूत्रधारी कंपनी संचालक मडंळाच्या झालेल्या बैठकीत चर्चा होऊन आकृतिबंधास मान्यता प्रदान करण्यात आली. सूत्रधारी कंपनीची मान्यता मिळाल्यानंतर महापारेषण कंपनी संचालक मंडळाची मान्यता घेण्यात आली असून, आकृतिबंध लागू करण्यात आला.

Leave a Comment