महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागात अप्रेंटिस भरती सुरु – powergridindia.com

Maharashtra Climate Fellowship Programme – महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून अप्रेंटिस साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग इंटर्नशिप कार्यक्रम 2021-22 साठी 20 इंटर्नसची निवड करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांकडून 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. विभागाकडून पदव्युत्तर, रिसर्च स्कॉलर आणि पदवीधर यांना अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे. अप्रेटिंसचा कालावधी 6 महिने असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Maharashtra Climate Fellowship Programme Details – आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागात एकूण 20 पदांवर इटर्नशिप करण्याची संधी दिली जाईल. विद्यार्थ्यांना पर्यावरण विभाग, वातावरणातील बदल, त्यांचे आंतरराष्ट्रीय संदर्भ यासंदर्भात काम करण्याची संधी मिळणार आहे. राज्य शासन वातावरणीय बदलांवर अभ्यासासाठी तरुणांना इंटर्नशीपची संधी उपलब्ध करुन देतेय, याचा आनंद असल्याचं पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

पर्यावरण विभागानं इटर्नशिप प्रोग्राम हा कचरा व्यवस्थापन, जैवविविधता, नवीनकरणीय ऊर्जा, जलसंधारण, सामाजिक जाणीव जागृतीसंदर्भात आहे. याअंतर्गत राज्यातील 3500 शहरी आणि ग्रामीण स्वराज्य संस्थासोबत काम करावं लागणार आहे.

अर्ज कोण करु शकतं?
स्थापत्य, विद्युत, यांत्रिकी, पर्यावरण, रासायनिक, रोबोटिक, मास कम्युनिकेशन, ग्राफिक डिझायनर, वेब डिझायनर या पैकी कोणत्याही शाखेतील पदवी धारण करणारे विद्यार्थी अर्ज दाखल करु शकतात.

वयोमर्यादा
शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचं वय 26 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे. पर्यावरण विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करण्यात येतील, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल विभागानं दिली आहे.

पॉवरग्रिडमध्ये 137 पदांवर भरती
पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून फील्ड इंजिनिअर पदावर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलंय. पॉवरग्रिडकडून एकूण 137 पदांची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी powergridindia.com ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. फील्ड इंजिनिअर पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 13 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2021 आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम दिनांकाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन वाचून घेणं आवश्यक आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) मध्ये इंजिनिअर्सना नोकरीची मोठी संधी आहे.

Leave a Comment