विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व आस्थापनांना २० नोव्हेंबरला सुट्टी!

विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व आस्थापनांना २० नोव्हेंबरला सुट्टी!

Maharashtra assembly election 2024 : उद्योग विभागांतर्गत येणारी सर्व महामंडळे, उद्योगसमूह, कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे. मतदारांना मतदानासाठी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याने मतदान करता न आल्यास, संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे विभागाने परिपत्रकात नमूद केले आहे. तसेच पोटकलम (१) नुसार या सुट्टीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना करण्यात आली आहे.

राज्यात येत्या २० नोव्हेंबर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उद्योग विभागांअतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना मतदानाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली असून उद्योग, उर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने यासंदर्भातील सूचना जारी केली आहे.

लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार, निवडणूक क्षेत्रातील कोणताही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांत काम करणाऱ्या आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीस मतदानादिवशी सुट्टी दिली जाईल. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणारे सर्व उद्योगसमूह, महामंडळे, कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांसाठी लागू आहे. तसेच पोटकलम (१) नुसार या सुटीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना करण्यात आली आहे.

उद्योग विभागांतर्गत येणारी सर्व महामंडळे, उद्योगसमूह, कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे. मतदारांना मतदानासाठी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याने मतदान करता न आल्यास, संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे विभागाने परिपत्रकात नमूद केले आहे.

 

Leave a Comment