Maharashtra Engineering Admission राज्यात इंजिनीअरिंग प्रवेशासाठी यंदा चुरस; प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर!
Maharashtra Engineering Admission 2024 :
राज्यात इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा विद्यार्थ्यांनी पंसती दिली असून, राज्यातील ३५० इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये एक लाख ४५ हजार ४८४ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी आतापर्यंत एक लाख ८६ हजार ३४० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे यंदा चांगल्या कॉलेजांत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस राहणार आहे.
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर झाल्यानंतर सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून, विद्यार्थ्यांना ३० जुलैपर्यंत नोंदणी करण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी तीन ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे, तर अंतिम गुणवत्ता यादी आठ ऑगस्टला जाहीर होणार आहे. यानंतर प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे सीईटी सेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी कम्प्युटर, आयटी, सायबर सिक्युरिटी, आयओटी, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशिन लर्निंग (एमएल) अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी पसंती दिली होती. गेल्या वर्षी राज्यातील ३५० कॉलेजांमध्ये एक लाख ४५ हजार ४८४ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी एक लाख १७ हजार ५८५ जागांवर प्रवेश झाले होते. नोंदणीसाठी मुदतवाढ मिळाल्याने, प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी संख्येत वाढ होऊ शकते.
इंजिनीअरिंग प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक-
- विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची संधी : ३० जुलैपर्यंत कागदपत्रांची पडताळणी : ३१ जुलैपर्यंत
- प्रवेशासाठीची तात्पुरती गुणवत्ता यादी : ३ ऑगस्ट
- यादीवर हरकती व तक्रार : ४ ते ६ ऑगस्ट (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
- अंतिम गुणवत्ता यादी : ८ ऑगस्ट
- पसंतीक्रम आणि गुणवत्ता फेरींचे वेळापत्रक नंतर जाहीर होणार
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents