Maharashtra Fire Department Bharti 2022

मुंबई अग्निशमन दलातील अग्निशामकच्या रिक्त पदांच्या सरळसेवा भरती होणार ?

Maharashtra Fire Department Bharti 2022:   The Mumbai Fire Brigade has insisted that the recruitment process should not be given to any agency while the fire brigade administration should carry out the process while demanding that the recruitment process should be included in the written test along with other necessary conditions. The Details about Agnishamak dal bharti 2022 Maharashtra Bharti Updates will be given on this page soon.

Written test in the direct recruitment process for the post of firefighter is required for this. Similarly, this candidate passed 12th However, there should not be 50% educational requirement for 12th standard. The height limit should be 172 cm instead of 165 cm for men and 155 cm for women in uniform like police, municipal security department etc. All certificates required for firefighters such as driving license, SFTC course, swimming etc. should have the same bonus points. Most importantly, the recruitment process should not be given to any agency. The Mumbai Fire Brigade has demanded that the fire brigade administration carry out this process.

fireman bharti 2022 Maharashtra

मुंबई अग्निशमन दलामध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी पदभरती होणार असून त्याबाबतच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे. थेट मुलाखतीने ९०२ जणांची मेगाभरती होणार असून पुढील महिन्याभरात प्रत्यक्षात भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

त्यामुळे मुंबई अग्निशमन दलाचे बळ आणखी वाढणार आहे. मुंबई अग्निशमन दलामध्ये ९०२ फायरमनच्या जागा भरण्यात येणार आहेत. सहा महिन्यांपूर्वी अग्निशमन दलाने पाठवलेल्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यात ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मागील ५ वर्षांपासून अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया रखडल्याने कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत होती.

मुंबई अग्निशमन दलात २०१७ मध्ये ७५० कर्मचाऱ्यांची शेवटची भरती झाली होती. त्यानंतर गेल्या पाच वर्षात एकाही कर्मचाऱ्याची नव्याने भरती झाली नाही. अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा बढतीने भरण्यात येत असल्या, तरी कर्मचाऱ्यांच्या शेकडो जागा रिक्त होत्या. त्यामुळे मुंबईतील वाढत्या आगीच्या किंवा इतर आपत्कालीन समस्यांचा सामना करण्यात अनेक अडचणी येत होत्या.
कर्मचाऱ्यांचा तुटवडा लक्षात घेता महापालिका आयुक्तांकडे पदभरतीचा प्रस्ताव पाठवला होता. आयुक्तांनी या प्रस्तावास मान्यता दिल्याने मेगाभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा अग्निशमन दलामध्ये होणारी भरती ही थेट मुलाखतीने होणार आहे. यापूर्वी अग्निशमन दलात भरती प्रक्रियेसाठी टाटा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केली जात होती. या वेळी मात्र भरती प्रक्रिया लवकर संपवायची असल्याने इतर बाबींना फाटा देऊन अग्निशमन दलाकडूनच शारीरिक चाचणी आणि थेट मुलाखत घेऊन पुढील महिन्यात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

मुंबई महापालिकच्या अग्निशमन दलातील अग्निशामकच्या रिक्त पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेत लेखी चाचणी परीक्षेसह इतर आवश्यक अटी-शर्तीचा आवर्जून समावेश करण्यात यावा, अशी मागणी करतानाच भरतीप्रक्रिया कोणत्याही एजन्सीकडे देण्यात येऊ नये तर अग्निशमन दल प्रशासनाने ही प्रक्रिया पार पाडावी यावर मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने जोर दिला आहे.

अग्निशामक पदाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील लेखी चाचणी परीक्षा यासाठी होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हा उमेदवार बारावी पास | असावा मात्र यासाठी बारावीची ५० टक्क्यांची शैक्षणिक अट नसावी. उंची मर्यादा १७२ सेमीऐवजी पुरुष १६५ आणि स्त्री १५५ सेमी याप्रमाणे गणवेशधारी पोलीस, मनपा सुरक्षारक्षक खाते इत्यादीप्रमाणे सावी. अग्निशमन दलासाठी आवश्यक असलेल्या ड्रायव्हिंग लायसन्स, एसएफटीसी कोर्स, स्विमिंग इत्यादी सर्व प्रमाणपत्रांना सारखे बोनस गुण असावेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरतीप्रक्रिया कोणत्याही एजन्सीकडे देण्यात येऊ नये. अग्निशमन दल प्रशासनाने ही प्रक्रिया पार पाडावी अशी मागणी मुंबई अग्निशमन दल सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

MH Fire Department Bharti 2022

मुंबई अग्निशमन दलातील प्रत्यक्ष कार्यवाहीवरील अग्निशामक पदाची भरती सुरू आहे. अग्निशमन प्रशासनाच्या प्रस्तावाची दखल न घेता भरती प्रक्रियेतील लेखी चायणी परीक्षेची प्रक्रिया खर्चिक बाइ असल्याची कारणे सांगत वगळण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मुळात येथील पदे भरताना उत्कृष्ट शरीरयष्टीसह बौद्धिक कौशल्यदेखील असायें लागते. शिवाय आणीबाणी प्रसंगावधानुसार तातडीने व अचूक निर्णय घेण्याची क्षमता अग्निशामकाकडे असावी लागते. या सर्व कसोटीतून अग्निशामक या प्राथमिक पदाचे उमेदवार निवडले जातात. ही अग्निशमन दलाची प्रचलित पद्धत आहे.


अग्निशमन दलात लवकरच 900 फायरमनची कायमस्वरूपी भरती, लेखी परीक्षा, मैदानी चाचणी, मेडिकल टेस्टनंतर मेरिटवर निवड होणार

Maharashtra Fire Department Bharti 2022 : The fire brigade of the municipality has 2600 officers and employees. Firefighters risk their lives to save the lives of Mumbaikars in any accident including fire. Therefore, the process of filling the vacancies in the fire brigade as soon as possible is underway at the fire brigade level. The actual recruitment process will start in May or June. The recruitment will be done on the basis of marks in written test, field test and also will get the marks of heavy driving license. As the recruitment is taking place after August 2016, the candidates will also get employment opportunities and the opportunity to show their bravery by working in the fire brigade. More details about Maharashtra Fire Department Bharti 2022, BMC fire Vacancy 2022, BMC Agnishamak Vibhag Bharti 2022

fireman bharti 2022 maharashtra

Update on 16th April 2022 :  शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्या विचारात घेता वाठोडा परिसरातील आरक्षित जागेवर लवकरच अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. केंद्रामुळे या भागातील नागरिकांना अग्निशमन सेवा उपलब्ध होणार आहे. अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातर्फे अग्निशमन सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने गुरुवारी मनपा मुख्यालयातील हिरवळीवर आयोजित अग्निशमन सेवा दिवस कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली.अग्निशमन दलाची क्षमता वाढविण्याची गरज लक्षात घेऊन 100 पदभरतीचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या काळात विभागाची क्षमता वाढेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

Fire Department Vacant Posts 2022

The Mumbai Fire Brigade will soon be recruiting for 900 firemen. The important thing is that 30 per cent or about 270 posts will be reserved for women in this recruitment process. Therefore, the Mumbai Fire Brigade has appealed to the youth to prepare for the field test.

पालिकेच्या अग्निशमन दलात लवकरच 900 फायरमनची कायमस्वरूपी भरती होणार आहे. या भरतीसाठी कुठल्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून लेखी परीक्षा, मैदानी चाचणी, मेडिकल टेस्टनंतर मेरिटवर या फायरमनची निवड होणार आहे.

या भरतीसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन दल हेमंत परब यांनी दिली.

पालिकेच्या अग्निशमन दलात 2600 अधिकारी-कर्मचारी आहेत. आगीसह कोणत्याही दुर्घटनेत मुंबईकरांचा जीव वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात. त्यामुळे अग्निशमन दलातील जवानांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची कार्यवाही अग्निशमन दलाच्या पातळीवर सुरू आहे. मे किंवा जून महिन्यात या भरतीबाबत प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होणार आहे. लेखी परीक्षा, मैदानी परीक्षेतील गुणांच्या आधारावर ही भरती होणार असून हेवी ड्रायव्हिंग लायसन्सचे गुणही मिळणार आहेत. ऑगस्ट 2016 नंतर ही भरती होत असल्यामुळे रोजगाराची संधी आणि अग्निशमन दलात नोकरी करून शौर्य गाजवण्याची संधीही उमेदवारांना मिळणार आहे.

अग्निशमन दलात काही पदे रिक्त असून ती तात्काळ भरण्यासाठी सुमारे ९०० फायरमन या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक जाहिरात येत्या दोन महिन्यांत काढली जाईल. दरम्यान, भरती प्रक्रियेसाठी आवश्यक माहिती जाहिरातीमध्ये असेल. त्याप्रमाणे इच्छुक उमेदवारांनी लेखी परीक्षा, मैदानी चाचणी आणि नंतर वैद्यकीय चाचणीत यश मिळवल्यानंतर त्यांना अग्निशमन दलात काम करण्याची व शौर्य गाजवण्याची संधी मिळणार आहे.

Young men and women will have to work hard to be recruited. This is because the general knowledge is tested in the written test when recruiting as a fireman. However, the field test requires physical fitness. Since firefighting work is risky, candidates have to undergo a fire test while recruiting for it. Women are given some leeway in the recruitment process as compared to men.

सहा महिन्यांचे प्रशिक्षण

  • 900 पदांच्या या भरतीसाठी हजारो अर्ज येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जाहिरातीनंतर ऑनलाइन करणाऱया उमेदवारांची टाटा कन्सलटन्सीकडून ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
  • यामध्ये पात्र ठरणाऱया उमेदवारांमधून मैदानी चाचणीसाठी उमेदवार निवड केले जातील. यानंतर मेडिकल चाचणीत पात्र ठरणाऱया उमेदवारांमधून मेरिटवर अंतिम निवड केली जाईल.
  • भरतीमध्ये 30 टक्के महिलांना आरक्षण असेल. यामध्ये महिला उमेदवार पात्र ठरले नाहीत तर पुरुष गटातून पात्र उमेदवारांची ही भरती केली जाईल.
  • यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. अग्निशमन दलाच्या मरोळ, वडाळा, बोरिवली प्रशिक्षण केंद्रांवर हे ट्रेनिंग होईल.

अग्निशमन दलामध्ये मोठ्या संख्येत असलेली “ही” रिक्त पदे कधी भरली जाणार ? जाणून घ्या 

Maha Fire Department Recruitment 2022 – A fire station needs more than 40 personnel including officers, 32 firemen, six leading firemen and eight drivers. In addition, two fire engines, a water tanker and another water tanker should be in the center for emergencies.

Maha Fire Department Recruitment 2022

ठाणे शहर घोडबंदर रोड परिसरात मोठ्या प्रमाणात विस्तारले असून या भागात अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. वाढत्या नागरीकरणाबरोबर मॉल्स, दुकाने, हॉटेल्स आणि इतरही अनेक आस्थापना याठिकाणी आहेत. घोडबंदर रोडवर वाहनांची कायमच वर्दळ असते. या परिसरात गायमुख चौपाटी, थीम पार्कसह इतरही अनेक प्रकल्प ठाणे महापालिकेने उभारले आहेत. मात्र या भागात अग्निशमन केंद्र सुरू करण्यास महापालिकेला लवकर मुहूर्त मिळाला नाही. घोडबंदर भागात छोट्या-मोठ्या आगी लागण्याचे प्रकार कायमच घडत असतात. शिवाय घोडबंदर रस्त्यावर अपघात सातत्याने होत असतात. त्यामुळे वाहतूक थांबते. आधी घोडबंदर परिसरात अग्निशमन केंद्र नसल्याने, आग किंवा भीषण अपघातप्रसंगी मदतीसाठी बाळकूम, नितीन जंक्शन, वागळे इस्टेट किंवा जवाहरबाग अग्निशमन केंद्रातून घटनास्थळी पोहचण्यास जवानांना उशीर होत असे. त्यातच घोडबंदर रस्त्यावरील कायमच वाहतूककोंडीचा फटका अग्निशमन दलाच्या गाड्यांना बसत होता. त्यामुळे घोडबंदर भागात अग्निशमन केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती.

अखेर इतक्या वर्षांनी घोडबंदर रस्त्यावरील आनंदनगर येथे महापालिकेने ओवळा अग्निशमन केंद्र बांधले. परंतु, अद्यापही हे केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यन्वित झालेले नाही. अगोदरच ठाणे अग्निशमन दलामध्ये मनुष्यबळाचा तुटवडा असून अनेक पदे रिक्त आहेत. ओवळा अग्निशमन केंद्रात एका पाळीमध्ये केवळ चारच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. केंद्राचे कामकाज तीन पाळ्यामध्ये चालत असले, तरी कर्मचाऱ्यांअभावी जास्तीचे कर्मचारी देणार कोठून, असा प्रश्न अग्निशमन अधिकारीच उपस्थित करत आहेत. या केंद्रात सध्या एकच लहान गाडी ठेवण्यात आली आहे. मोठ्या गाड्यांसाठी अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. या केंद्रात फोनची सुविधाही चालू झालेली नसल्याची बाब समोर आली आहे.

किमान ४० कर्मचाऱ्यांची गरज

एका अग्निशमन केंद्रामध्ये अधिकारी वर्गासह ३२ फायरमन, सहा लीडिंग फायरमन, आठ चालक अशा एकूण ४० पेक्षाही अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्याशिवाय दोन फायर इंजिन, एक पाण्याचा टँकर, अत्यावश्यक परिस्थितीसाठी आणखीन एक पाण्याचा टँकरही केंद्रामध्ये असणे आवश्यक आहे.

रिक्त पदांची संख्या मोठी

ठाणे अग्निशमन दलामध्ये मंजूर असलेल्या फायरमनच्या ४५० पदांपैकी १६८ पदे भरलेली असून लीडिंग फायरमनची ७० पदांपैकी १५ पदे, चालकांची २२४ पैकी ३५ पदे, स्टेशन अधिकारी २१ पदांपैकी दोन पदे, सहाय्यक अग्निशमन अधिकाऱ्यांची ५६ पैकी १७ पदे भरलेली आहेत. मोठ्या संख्येत असलेली ही रिक्त पदे कधी भरली जाणार, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.


Maharashtra Fire Department Bharti 2022 | अग्निशमन  विभागातील महत्वाचे पदे रिक्त

Maha Fire Department Recruitment 2022 –  There has been no recruitment in Yavatmal Fire department (Yavtmal Agnishamak Vibhag Bharti 2022)  for the last several years. Therefore, the fire department is facing many difficulties. Currently, the fire department of the municipality is working with the help of contract drivers and helpers. Although a contract employees are not trained. Read Below Update on Maharashtra Fire Department Bharti 2021, fire brigade bharti 2022 maharashtra.

Follow MahaBharti.co.in For Latest Bharti in Maharashtra Fire Department , We Update all Latest News Related to Maharashtra Agnishamak Vibhag Bharti 2022.

महत्वपूर्ण विभागातीलच महत्वाचे जवळपास 22 पदे रिक्त- Fire Brigade Bharti 2022 Maharashtra

fire brigade bharti 2021 maharashtra – यवतमाळ नगरपालिकेतील अग्निशमन विभाग हा सर्वांत महत्वाचा विभाग आहे. शहरात लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवून नागरिक व त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याचे काम कर्मचारी करतात. अशा महत्वपूर्ण विभागातीलच महत्वाचे जवळपास 22 पदे रिक्त आहेत. परिणामी, कंत्राटी कामगारांवरच विभागाचे कामकाज सुरू असून, ते आपला जीव धोक्‍यात घालून आगीपासून नागरिकांचे संरक्षण करीत आहेत.

अनेक वर्षांपासून रखडली भरती – Fire brigade Bharati 2022 Maharashtra

गेल्या अनेक वर्षांपासून या विभागात भरती झालेली नाही.  कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे त्यामुळे अग्शिनशमन विभागालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.  लिडींग फायरमन, फायरमन व मतदनीस असे महत्वाची पदे रिक्त आहेत. सध्या कंत्राटी वाहनचालक व मदतनीस यांच्या भरवशावर नगरपालिकेतील अग्निशमन विभागाचे काम सुरू आहे. कंत्राटी कर्मचारी असले तरी ते प्रशिक्षित नाही. परिणामी ते जीव धोक्‍यात घालून काम करीत आहे.

अग्निशमन विभागातील रिक्त पदे -fire brigade bharti 2022 maharashtra

लिडींग फायरमन वाहनचालक कम ऑपरेटर फायरमन मदतनीस
01 03 08 10

अग्निशमन दलामध्ये कंत्राटी प्रकल्पात स्थानिक तरुणांना प्राधान्याने तत्काळ रोजगार उपलब्ध होणार – मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष

Maharashtra Fire Department Bharti 2021 – In The Mumbai Port Trust, Soon Candidates will get recruited on Contract Basis. And Vacant posts in Agnishaman Vibhag will filled soon . Read Latest Update at below:

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये सध्या चालू असलेल्या आणि भविष्यात होणाऱ्या कंत्राटी प्रकल्पांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने संधी देण्याबाबत कंत्राटदारांना बंधनकारक करावे. अग्निशमन दलामध्ये कंत्राटी पद्धतीने भरती न करता नियमित भरती करावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली. त्यानुसार कंत्राटी प्रकल्पात स्थानिक तरुणांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत तत्काळ सर्व खातेप्रमुखांना निर्देश देणार असल्याचे पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी आश्वासन दिले. अग्निशमन दलातील रिक्त पदे भरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


Maharashtra Fire Department Bharti 2021 – The recruitment process of drivers will be started on contract basis. The fire brigade is hiring 54 private contract drivers. Read all details on Maharashtra Fire Department Bharti 2021 in this post

Mumbai BMC Fire Brigade Drivers Recruitment 2021– बेस्टनंतर अग्निशमन दलातही (Fire Brigade) खाजगीकरण करण्यात येणार आहे. कंत्राटी पद्धतीने चालकांची भरती प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. अग्निशमन दलात 54 खासगी कंत्राटी ड्रायव्हर नेमले जात आहेत. (Mumbai BMC Fire Brigade Drivers Recruitment on private contract basis)

आग लागणे, इमारत किंवा घर कोसळणे, पाण्यात बुडालेल्या व्यक्तींना वाचवणे अशा अनेक कामांसाठी मुंबई अग्निशमन दलाला बोलावले जाते. अग्निशमन दलातील पदे रिक्त असल्याने अग्निशमन दलात जीप, कार यासारखी वाहने चालवण्यासाठी 54 खासगी कंत्राटी ड्रायव्हर नेमले जात आहेत.

कंत्राटी पद्धतीने चालक भरती का?

मुंबई अग्निशमन दलात यंत्रचालक संवर्गाची 665 पदे असून यापैकी 158 पदे रिक्त आहेत. आपत्कालीन परिस्थितीत पंप ऑपरेट करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे प्रक्षिशित यंत्रचालकांना जीप किंवा कार चालवण्यास तैनात केले, तर आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होते.

काळबादेवी येथे लागलेल्या आगीच्या घटनेनंतर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसीनु%Aार अग्निशमन दलातील रुग्णवाहिका, जीप आणि कार चालवण्यासाठी खाजगी वाहक भरती केले जाणार आहेत.

किती पदं रिक्त?

मुंबई महापालिका रिक्त जागा भरण्याऐवजी खाजगी कंत्राटदाराकडून नोकर भरती करणार आहे. अग्निशमन दलात एकूण 665 यंत्रचालक संवर्गाची पदे आहेत. परंतु, अनुभवी चालक मिळत नसल्याने दोन वर्षासाठी 54 कंत्राटी चालक 84 वाहनं चालवण्यासाठी घेतले जाणार आहेत.

5 कोटी 97 लाख 87 हजार रुपये यावर खर्च केला जाणार आहे. मे. केएचएफएम हॉस्पिलिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेसला अटी आणि शर्तीवर हे काम दिले जाणार आहे. अग्निशमन पदावर काम करणाऱ्या उमेदवाराकडे पाच वर्षांचा अनुभव आणि एक वर्ष अवजड वाहने चालवण्याचा परवाना असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे. (Mumbai BMC Fire Brigade Recruitment on private contract basis)

काय असतील अटी?

उंची – 165 सेंमी
वजन – 50 किलो
दृष्टी – चष्मा नसावा
वयोमर्यादा – 21 ते 45 वर्ष
शैक्षणिक अर्हता – दहावी उत्तीर्ण

अग्निशमन दलात कंत्राटी पद्धतीने खासगी वाहनचालकांच्या येणाऱ्या भरतीच्या प्रस्तावाला आमचा विरोध आहे. या प्रस्तावाला काँग्रेस विरोध करणार आहे. सत्तेत बसलेल्यांनी विचार करायला हवं, पालिकेची कोणत्या दिशेला वाटचाल चाललेली आहे. भाववाढीसाठी नवीन प्राधिकरण तयार केलं जाणार आहे. मग स्टँडिंग कमिटी कशासाठी आहे? हे प्रशासन मंत्रालय जे बोलतं त्यावर चालतं, अशी टीका महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली.

 


Maharashtra Fire Department Bharti 2021 – बेस्टच्या खासगीकरणावरुन वाद सुरु असताना मुंबई महानगर पालिका आता अग्निशमन दलातील लहान वाहाने आणि रुग्णवाहीका चालविण्यासाठी कंत्राटी चालक भरणार आहे. 54 कंत्राटी चालक भरण्यासाठी 3 कोटी 99 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून दोन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात येणार आहे.

अग्निशमन दलाच्या जिप, रुग्णवाहीका चालविण्यासाठी ही भरती करण्यात येणार आहे. अग्निशमन दलात चालकांची 665 पदं मंजूर आहेत. यातील 158 पदं रिक्त आहेत. हे कायमस्वरुपी चालक प्रशिक्षीत असून त्यांना पाच वर्षांचा अग्निशमन जवाना पदाचाही अनुभव असतो. अशा चालकांकडून हलकी वाहाने चालवून घेतल्यास बंब तसेच आपत्ती काळात वापरली जाणारी अवजड वाहाने चालविण्यासाठी मनुष्यबळ कमी पडते. त्यामुळे अग्निशमन दलाने हलकी वाहने चालविण्यासाठी कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता.या नियुक्तींचा प्रस्ताव पुढील आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. ही नियुक्ती खासगी कंपनीमार्फत करण्यात येणार आहे.

अग्निशमन दलाच्या पुर्णवेळ चालकांना वेतन आयोगानुसार वेतन असते. त्%Aात त्यांचा ओव्हरटाईम आणि इतर भत्यांमुळे वेतन वाढते. तसेच, त्यांना वैद्यकिय, अपघात सुविधाही पुरवल्या जातात. या सर्व खर्चाला कात्री लावण्यासाठी अग्निशमन दल हे पाऊल उचलत असल्याची शक्यता आहे. मात्र, अग्निशमन दलाचे चालकही आपत्तीच्या ठिकाणी स्वत:चा जिव धोक्यात घालून काम करत असतात, त्यामुळे या कंत्राटी चालकांना कोणत्या सुविधा मिळणार असा प्रश्‍नही आहेच.

कंत्राटीकरणाकडे वाटचाल

बेस्टने कंत्राटी बसेस घेतल्याचा वाद सध्या सुरु आहे. यापुर्वी महानगर पालिकेने अनेक कार्यालयात ‘हाऊस किंपींग’च्या नावाखाली कंत्राटी भरती सुरु केली आहे. महापालिका मुख्यालयातही कंत्राटी ‘हाऊस किपींग’कामगार नियुक्त केले आहेत. त्याबरोबर उपनगरात सुरु होणाऱ्या नव्या वैद्यकिय अभ्यासक्रमासाठीही कंत्राटी वैद्यकिय प्राध्यापक नियुक्त करण्यात येणार असल्याची घोेषणा अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली आहे. तसेच,रुग्णालयातील कारकुनांच्या जागा भरुन काढण्यासाठी कंत्राटी भरती करण्यासाठी निवीदा मागविण्यात आल्या आहेत. तर, गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेने कंत्राटी सफाई कामगार नियुक्त केले आहे.


Maharashtra Fire Department Bharti 2021 – In Nagpur Fire Department, 872 posts have been sanctioned in the department. At present 682 posts are vacant. The number of retired employees is increasing every month. The posts of Chief Fire Officer (1), Deputy Chief Fire Officer (1) and Divisional Fire Officer (2) are vacant. Read Details on Maharashtra Fire Department Bharti 2021 at below.

Maharashtra Fire department every year recruited freshers, and this year in Nagpur Fire department there is 682 vacant posts to be filled out of 872.

मनपाच्या ९ फायर स्टेशनची जबाबदारी १९० कर्मचारी व अधिकाऱ्यांवर आहे. आकृतिबंधानुसार विभागात ८७२ पदे मंजूर आहे. सध्या ६८२ पदे रिक्त आहेत.त्यात दर महिन्याला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. यात मुख्य अग्निशमन अधिकारी(१)उपमुख्य अग्निशमन अधिकारी (१), विभागीय अग्निशमन अधिकारी (२) पदे रिक्त आहे.

सहायक विभागीय अग्निशमन अधिकाऱ्याच्या ४ पैकी २ पदे, अग्निशमन केंद्र अधिकारी १५ पैकी १४,सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी ३९ पैकी ३५ उपअग्निशमन केंद्र अधिकारी ३९ पैकी २८ प्रमुख अग्निशमन विमोचक ८१ पैकी ४०, चालक-यंत्र चालकांच्या १६२ पैकी ९३ वाहन चालक १०पैकी १०, अग्निशामक विमोचक ५०० पैकी ४४० , फीटर कम ड्रायवरच्या १५ पैकी ९ पदे ºरिक्त आहेत…..

तरतुदीपैकी २८.९६ टक्के खर्च

अग्निशमन विभागासाठी वर्ष २०१९-२० या वर्षात अर्थसंकल्पात ३७ कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु १०.७१ कोटी खर्च झाले. मागील सहा वर्षात सर्वात कमी रक्कम खर्च केली. वर्ष २०१६-१७ मध्ये २८.७२ कोटींच्या तरतुदीपैकी १८.०२ कोटी खर्च झाले. त्यानंतर तरतूद व खर्च यातील अंतर मोठे होते. दुर्दैवाने या विभागासाठी कमी तरतूद केली जाते. अग्निशमन विभागासाठी वर्ष २०१३-१४ मध्ये फक्त १.३७ टक्के तरतूद होती. वर्ष २०१४-१५ मध्ये १.३१ टक्के, वर्ष २०१५-१६ मध्ये १.१७ टक्के, वर्ष २०१६-१७ व वर्ष २०१७-१८मध्ये १.४० टक्के, वर्ष २०१८-१९ मध्ये १.१२ व वर्ष २०१९-२० मध्ये १.१५ टक्के तरतूद करण्यात आली.

23 thoughts on “Maharashtra Fire Department Bharti 2022”

Leave a Comment