एलएलबी प्रवेशांमध्ये २४ टक्क्यांची वाढ !

एलएलबी प्रवेशांमध्ये २४ टक्क्यांची वाढ !

Maharashtra LLB Admission 2024 :

उपलब्ध १२ हजार ७३१ जागांसाठी १५ हजार १८१ विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. त्यानंतर सामायिक प्रवेश परीक्षा फेरीच्या माध्यमातून त्यापैकी ९,४३५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यंदा पाच वर्ष विधी अभ्यासक्रमांच्या कॉलेजांमध्ये भर पडली असून ही संख्या १४८ एवढी झाल्याची माहितीही सीईटी कक्षाकडून देण्यात आली.

राज्य सीईटी कक्षातर्फे राबवण्यात येणाऱ्या कायद्याच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून पाच वर्षे एलएलबीसाठी तब्बल नऊ हजार ४३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या अभ्यासक्रमासाठी राज्यभरात एकूण १२ हजार ७३१ जागा उपलब्ध होत्या. विशेष म्हणजे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत १,८३० ने म्हणजेच २४ टक्क्यांनी वाढली आहे.

राज्यात पाच वर्ष विधी अभ्यासक्रमासाठी गेल्या वर्षी ११ हजार ५२० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी फक्त सात हजार ६०५ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. अनेक कॉलेजांची विद्यार्थीसंख्या घटल्याने या कॉलेजांसमोरील अडचणी वाढल्या होत्या. यंदा विधी अभ्यासक्रमाच्या, म्हणजेच पाच वर्षे एलएलबी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा टक्का वाढला असून एकूण उपलब्ध जागांपैकी ७४ टक्के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उपलब्ध १२ हजार ७३१ जागांसाठी १५ हजार १८१ विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. त्यानंतर सामायिक प्रवेश परीक्षा फेरीच्या माध्यमातून त्यापैकी ९,४३५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यंदा पाच वर्ष विधी अभ्यासक्रमांच्या कॉलेजांमध्ये भर पडली असून ही संख्या १४८ एवढी झाल्याची माहितीही सीईटी कक्षाकडून देण्यात आली.

 

Leave a Comment