Maharashtra SEC महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्यातर्फे रिटायर्ड स्टेनोग्राफर (हाय ग्रेड/लो ग्रेड) या पदांसाठी भरती !

Maharashtra SEC महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्यातर्फे रिटायर्ड स्टेनोग्राफर (हाय ग्रेड/लो ग्रेड) या पदांसाठी भरती !

Maharashtra SEC Recruitment 2024 :

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्यातर्फे रिटायर्ड स्टेनोग्राफर (हाय ग्रेड/लो ग्रेड) या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 पर्यंत यांचा अर्ज सादर करू शकतात. हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचा असेल. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणते उमेदवार पात्र आहेत याबद्दल अधिक वाचा.

MAHA SEC म्हणजेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, या निवडणूक आयोगात रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने त्यांचे अर्ज सादर करू शकतात. हेअर सादर करण्यासाठी दिनांक 20 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारीख ठरवून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या या भरतीतून रिटायर्ड स्टेनोग्राफर (हाय ग्रेड/लो ग्रेड) या पदाच्या दोन रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.

Eligibilty Criterias:

  • वय वर्ष ६३ किंवा त्याहून कमी वय असलेला कोणताही उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो.
  • मुंबईत नोकरी करण्याची तयारी असलेला उमेदवार याबाबत सहभागी होऊ शकतो.
  • स्टेनोग्राफर म्हणजेच लघुलेखक या पदाचा तीन वर्षांचा अनुभव असलेला उमेदवार
  • इंग्रजी किंवा मराठी श्रुतलेखनाचे ज्ञान आणि अनुभव असलेला उमेदवार.

रिटायर स्टेनोग्राफर (हाय ग्रेड/लो ग्रेड) पदाच्या भरतीत सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेची हमी देणारी प्रमाणपत्रे, त्यांच्या कामाच्या अनुभवाची हमी देणारी प्रमाणपत्रे, सेवानिवृत्ती संदर्भातील तपशील आणि कागदपत्रे हे सगळे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

 भरतीप्रक्रिया-
ही अर्ज प्रक्रिया दिनांक ५ ऑगस्ट २०२४ पासून सुरू झाली आहे. अर्ज सादर करण्यासाठी दिनांक २० ऑगस्ट २०२४ ही तारीख शेवटची असेल. दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या भरतीतील अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. असे न केल्यास उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडले नसतील तर त्या अर्जाला अपूर्ण मानून तो भरती प्रक्रियेतून बाद केला जाईल

 

Leave a Comment