खुशखबर! महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2022 -Maharashtra ZP Bharti 2022

खुशखबर! महाराष्ट्र जिल्हा परिषदांच्या १३ हजार ५२१ जागा रिक्त !!

Maharashtra ZP Bharti 2022: For this recruitment, the Rural Development Department seems to be shirking its responsibility by pointing the finger at the self-governing administration department. It is noteworthy that in connection with this recruitment, the amount of Rs. On March 3, 2019, the government advertised for various posts in the Zilla Parishads of Maharashtra. The highest number of 729 posts is in the Ahmednagar district, while the lowest number of 142 posts is in Bhandara Zilla Parishad. A total of 12 lakh 72 thousand 391 candidates have filed applications for these 13 thousand 521 posts from all over the state. An examination fee of Rs.500 was charged for an open category post and Rs.250 for a reserved category.

राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत विविध स्वरूपाच्या 13 हजार 521 पदांची नोकरभरती चार वर्षांपासून रखडली आहे. या भरतीसाठी ग्रामीण विकास विभाग स्वमान्य प्रशासन विभागाकडे बोट दाखवून आपली  जबाबदारी झटकताना दिसते आहे. विशेष असे की, या भरतीच्या अनुषंगाने राज्यभरातील सुमारे १३ लाख सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब युवकांकडून परीक्षा शुल्क म्हणून गोळा केलेली २५ कोटी ८७ लाख रुपयांची रक्कम शासनाच्या तिजोरीत पडून आहे.

३ मार्च २०१९ ला शासनाने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये विविध पदांच्या भरतीची जाहिरात काढली होती. त्यात सर्वाधिक ७२९ पदे अहमदनगर जिल्ह्यात, तर सर्वात कमी १४२ पदे भंडारा जिल्हा परिषदेतील आहेत. या एकूण १३ हजार ५२१ पदांसाठी राज्यभरातून १२ लाख ७२ हजार ३९१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. खुल्या प्रवर्गाच्या एका पदासाठी ५०० रुपये, तर आरक्षित वर्गासाठी २५० रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारले गेले.

या पदांसाठी होणार भरती 

कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, विस्तार अधिकारी, कृषी व सांख्यिकी, स्थापत्य सहायक, पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहायक (लेखा), वरिष्ठ सहायक (लिपिक), अंगणवाडी पर्यवेक्षक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी

अशी आहेत राज्यातील जिल्हानिहाय पदे  

 • अहमदनगर – ७२९
 • अमरावती – ४६३
 • अकोला – २४२
 • औरंगाबाद – ३६२
 • भंडारा – १४२
 • बीड – ४५६
 • चंद्रपूर – ३२३
 • गोंदिया – २५७
 • गडचिरोली – ३३५
 • हिंगोली – १५०
 • नाशिक – ६८७
 • लातूर – २८६
 • नंदुरबार – ३३३
 • पालघर – ७०८
 • परभणी – २५९
 • रायगड – ५१०
 • सातारा – ७०८
 • नागपूर – ४१८
 • पुणे – ५९५
 • बुलडाणा – ३३२
 • वाशिम – १८२
 • यवतमाळ – ५०५
 • जालना – ३२८
 • उस्मानाबाद – ३२०
 • ठाणे – १९६
 • नांदेड – ५५७
 • रलागिरी – ४६६
 • सिंधुदुर्ग – १६२
 • धुळे – २१९
 • वर्धा – २६७
 • जळगाव – ६०७
 • कोल्हापूर – ५३२
 • सांगली – ४७१
 • सोलापूर – ४१४

जिल्हा परिषदेतह आरोग्य विभागाचे 582 पदे भरण्याचा मार्ग मोकळा !!

Maharashtra ZP Bharti 2022:  Movements have started to recruit K-class staff in the health department of Zilla Parishad. The Ministry of Rural Development has instructed to prepare new diagrams in this category and submit them to the Government. Therefore, the way has been cleared to fill 582 posts in the health department in Nagar Zilla Parishad also. As the population of the district is increasing day by day and many health workers are retiring, the number of vacancies is increasing which is affecting the administrative work. The agency was appointed in 2019 to fill the vacancies.

Maharashtra Zilla Parishad Vacancy 2022

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील के वर्ग कर्मचारी पदे भरती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ग्रामविकास मंत्रालयाने या संवर्गातील नवीन आकृतीबंध तयार करून शासनाला सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे नगर जिल्हा परिषदेतही आरोग्य विभागाचे 582 पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दिवसेदिवस जिल्ह्यातील लोकसंख्या वाढत असून, तसे आरोग्य विभागातील अनेक कर्मचारीही निवृत्त होत आहेत परिणामी, रिक्त जागाही वाढल्या आहेत त्यातून प्रशासकीय कामावर परिणाम होताना दिसून येतो वास्तविकत राज्य सरकारने क वर्गातील औषध निर्माता, आरोग्य सेवक महिला व पुरुष, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पाच संवर्गातील रिक्त जागांची भरती करण्यासाठी 2019 मध्ये एजन्सी नेमली होती.

नगर जिल्ह्यामध्येही 582 पदासाठी अर्ज मागावले होते परंतु कोरोना आणि तांत्रिक अडचणींनी ही भरती झाली नाही. आता मात्र शासनाने नव्याने आदेश काढून ही भरती करण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय जिल्हा परिषद स्तरावरील निवड समितीलाच भरतीचे अधिकार देण्यात आले आहेत. शासनाकडून लवकर याबाबत मार्गदर्शक सूचना मिळणार आहेत. 2019 मध्ये अर्ज केलेल्यांचीच परीक्षा घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे आरोग्य विभागातील क वर्गातील पदांच्या भरतीबाबत शासनाने आदेश काढले आहेत. त्यानुसार 2019 मध्ये ज्या पदांसाठी अर्ज मागावले होते. त्याच जागा भरल्या जातील याबाबत जिल्हा निवड समितीला ते अधिकार असतील डॉ संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद


Maharashtra ZP Bharti 2022: The Rural Development Department had taken over the right to recruit from Group ‘C’ in the Zilla Parishad. However, recruitment has not taken place yet. Therefore, it has been handed over to Zilla Parishad again. The government has clarified that the recruitment will be done through the district selection board. It was decided to recruit Megha during the then Fadnavis government. This created an atmosphere of great joy among the students who were preparing for the competitive exams. The students started preparing loudly.

Later, the state government decided to give 13% reservation in jobs to the Maratha community. It was ordered to be implemented while recruiting servants. Due to the reservation given to the Maratha community, the new point list was changed. This affected the recruitment process. While the list was being finalized, the central government gave 10 percent reservation to the economically weaker sections.

जिल्हा परिषदेतील गट ‘क’ मधील पद भरतीचे अधिकार ग्राम विकास विभागाने आपल्याकडे घेतले होते. परंतु, अद्याप भरतीच झाली नाही. त्यामुळे आता हे पुन्हा जिल्हा परिषदेकडे देण्यात आला आहे. जिल्हा निवड मंडळ मार्फत ही भरती करण्यात येणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात मेघा भरती करण्याचा निर्णयघेण्यात आला होता. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांनी तयारी जोरात सुरू केली. नंतरच्या काळात राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरीत १३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.

नोकर भरती करताना त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देण्यात आल्याने नव्याने बिंदुनामावलीत बदल करण्यात आला होता. त्याचा भरती प्रक्रियेवर परिणाम झाला. ही बिंदुनामावली अंतिम होत असतानाच केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकाला १० टक्के आरक्षण दिले. त्यामुळे पुन्हा बिंदुनामावली बदलावी लागली. यात बराच काळ केला. त्यामुळे पुन्हा भरती प्रक्रिया लांबली. दरम्यानच्या काळात महाभरती पोर्टलच्या माध्यमातून शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या पदांकरिता | राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याचे सांगण्यात येते.

परंतु, निवडणूक व इतर कारणामुळे परीक्षा घेण्यात आली नाही. नंतर राज्यात सत्ताबदल झाली. सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण  रद्दबातल ठरविण्यात आले. त्यामुळे पुन्हा बंदुनामावलीत बदल करावा लागला. यामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. परीक्षा घेणाऱ्या संस्थांवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले.टीईटीचा मोठा घोटाळा समोर आला.म्हाडाच्या परीक्षेतही तसाच प्रकारझाला. ग्राम विकास विभागाकडून भरती प्रक्रियाच सुरू करण्यात आलीनाही. शिपाई वर्गातील पदे भदे सरकारने बाह्यसंस्थेच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्जाचे काय?

मेगा भरतीच्या वेळी नागपूर जिल्हा परिषदेकडून १५० वर पदांसाठी भरतीची जाहिरात काढण्यात आली होती. विद्याथ्र्यांनी मोठ्या संख्येने अर्ज केले होते. त्यासाठी आवश्यक डीडीही जोडले होते. त्यामुळे आता भरती प्रक्रियेच्या वेळी ते अर्ज कायम करण्यात येतील की वगळण्यात येतील, असाच प्रश्न उपस्थित होत आहे.


Maharashtra ZP Bharti 2022: Health workers, nurses, laboratory technicians in Zilla Parishads of the state. The recruitment process for 10 thousand 127 vacancies in the category of Pharmacist and Health Supervisor has been started. The selection of districts will be done through a committee under the chairmanship of the District Collector. Information was given by Rural Development Minister Hasan Mushrif on Thursday. All the Zilla Parishads in the state have been directed to make posts related to the health department out of the group-C category. Candidates will be selected from the vacancies as per the advertisement of March 2019 to fill the posts in five categories.

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरोग्यसेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ. औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गातील १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत ही भरती करण्यात स्थापन झालेल्या जिल्हा निवड येणार असल्याची. माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पदांची करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना आदेश देण्यात आला आहे. पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार आलेल्या अजांतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

एकूण १० हजार १२७ पदे रिक्त 

 • आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षकाची ४७ पदे
 • औषध निर्मात्याची ३२४ पदे,
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञाची ९६
 • आरोग्यसेवकाची  ३१८४ पदे आणि
 • आरोग्यसेविकांची ६४७६ पदे

पाच संवर्गांसाठी एकूण चार लाख अर्ज प्राप्त झाले असून या अर्जाद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया आता तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्ग वगळता इतर संवर्गातील मंजूर असलेल्या पदांचा सुधारित विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यानुसार सुधारित मान्यता मिळाल्यानंतर इतर संवर्गातील आकृतिबंध मंजूर करण्यासाठी आहेत.आकृतिबंध अंतिम करून त्यास पदभरतीची कार्यवाही जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

 


Maharashtra ZP Bharti 2022: Zilla Parishad is being withdrawn Mega Recruitment for  ‘C’ and ‘D’ category posts. Mushrif said that 2328 ‘A-class ‘C’ and ‘2428’ posts would be filled through a committee headed by the district collector. Employees who have received appointment orders should take care that Zilla Parishad will not be discredited. Work for three years in the place where it is now. Don’t rush for help. Prioritize the work of the poor and common people. Don’t do anything under the table, he advised. It is very difficult to get a government job right now

जिल्हा परिषदेतील ‘क’ व ‘ड’ वर्गातील कर्मचाऱ्यांची पदे जिल्हा परिषदेच्या वतीने सरळ सेवेने भरण्यात येतील, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केली. अनुकंपा तत्त्वावरील जिल्हा परिषदेतील ६२ कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश प्रदान कार्यक्रम सोमवारी जिल्हा परिषदेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते.

जिल्हा परिषदेतील ‘क’ व ‘ड’ वर्गातील पदांचे आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय मागे घेण्यात येत आहे. ‘क’ वर्गातील २३२८ व’ड’ वर्गातील १०० अशी २४२८ पदे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत भरण्यात येतील, असे मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्हा परिषदेची बदनामी होणार नाही, याची काळजी नियुक्ती आदेश मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी घ्यावी. सध्या आहे त्या ठिकाणी तीन वर्षे काम करा. बदलीसाठी लगेच हेलपाटे मारू नका. गरीब, सर्वसामान्यांची कामे प्राधान्याने करा. टेबलाखालून काही करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. सरकारी नोकरी मिळणे सध्या खूप कठीण झाले आहे

‘क’ व ‘ड’ वर्गातील पदे

‘क’ वर्गामध्ये कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, आरोग्य सेवक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, पशुधन र्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ यांत्रिकी यांचा तर ‘ड’ वर्गात शिपाई पदाचा समावेश आहे.


राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील १३ हजार ५२१ पदांची भरती कधी ? जाणून घ्या  !!

Maharashtra ZP Bharti 2022 –The examination for 13,000 posts of Zilla Parishad was to be conducted by the District Selection Committee. However, later it was decided to take the exam from the Mahapariksha website. However, due to confusion on this website, it was shut down. The government then selected four private companies for the test. The tender process of the Rural Development Department was completed with the trust company. However, now that the government has canceled the agreement with Nyasa Company, there has been a resurgence in the recruitment of Zilla Parishad. It is learned that the government has now selected three new companies through which the examination process is underway.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील १३ हजार ५२१ पदांची भरती प्रक्रिया तीन वर्षांपासून रखडली आहे. मार्च २०१९ मध्ये या पदांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करूनही भरती घेतली जात नसल्याने २० लाखांहून अधिक अर्जदार परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत.

Maharashtra ZP Recruitment 2022

फडणवीस सरकारच्या काळात राज्यात मेगाभरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यात जिल्हा परिषदेमधील १३ हजार ५२१ जागांचा समावेश होता. यासाठी मार्च २०१९ मध्ये २० लाखांवर अर्ज आले. एका उमेदवाराने तीन ते चार हजार रुपये खर्च करून विविध पदांसाठी अर्ज केलेत. मात्र, राज्य शासनाने कधी करोनाचे तर कधी आर्थिक अडचणीचे कारण समोर केल्याने परीक्षा लांबणीवर पडली.  वर्षभरापासून विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू असल्याने जिल्हा परिषदेचीही पदभरती होईल, अशी अपेक्षा उमेदवारांना होती. मात्र, सरकारकडून  कुठलीच हालचाल नाही.  राज्य सरकारने पदभरतीसंदर्भात त्वरित निर्णय न घेतल्यास लाखो उमेदवारांकडून येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा एमपीएससी समन्वय समितीने दिला आहे.

Maharashtra Zilla Parishad Vacancy 2022

परीक्षेतील अडचणी काय?

जिल्हा परिषदेच्या १३ हजार पदांची परीक्षा ही जिल्हा निवड समितीकडून घेण्यात येणार होती. मात्र, नंतर महापरीक्षा संकेतस्थळावरून परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. परंतु, या संकेतस्थळावरील गोंधळ समोर आल्याने ते बंदच करण्यात आले. पुढे सरकारने परीक्षेसाठी चार खासगी कंपन्यांची निवड केली. यातील न्यासा कंपनीसोबत ग्रामविकास विभागाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, आता न्यासा कंपनीसोबतचा करारही सरकाने रद्द केल्याने जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये पुन्हा खोडा निर्माण झाला. शासनाने आता नव्याने तीन कंपन्या निवडल्या असून त्यामार्फत परीक्षा घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

परीक्षा केंद्रांवर कठोर निर्बंधांची मागणी

नुकत्याच झालेल्या ‘म्हाडा’ परीक्षेत राज्यभर डमी उमेदवारांना पकडण्यात आले होते. आता जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या ही लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे परीक्षेत पुन्हा गोंधळ टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, बायमेटृकि, मोबाईल जॅमर व  अंग तपासणी बंधनकारक करावी, अशी मागणीही एमपीएससी समन्वय समितीने केली आहे.

लाखो उमेदवारांनी तीन वर्षांआधी जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी अर्ज केले होते. बेरोजगारांचे कोटय़वधी रुपये सरकारकडे पडून आहेत. पदभरती करायची नसेल तर सरकारने व्याजासकट उमेदवारांचे पैसे परत करावे अन्यथा त्वरित पदभरती घ्यावी.

 


Maharashtra ZP Bharti 2022- ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत 5 विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 5600 पेक्षा अधिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. फोर्म भरायची शेवटची तारीख 29 सेप्टेंबर 2021, 10 ऑक्टोबर 2021 होती पण विभागाने आता ती वाढवली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील पदे भरण्याचा आदेश दिनांक 14 जून, 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. ज्यात फार्मासिस्ट, आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांचा समावेश आहे. नवे अर्ज करण्याची तारीख 21 सेप्टेंबर 2021 होती पण विभागाने आता ती 29 सेप्टेंबर 2021, 10 ऑक्टोबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

New Registrations will start from 1st till 10th October 2021. The New Vacancy List is being updated.

MAHA ZP Bharti Last Date 2021

Required Educational Qualification | आवश्यक शैक्षणिक अर्हता

 • औषध निर्माता: B.Pharm / D.Pharm व MS-CIT किंवा तत्सम सर्टिफिकेट
 • आरोग्य सेवक: 10 वी उत्तीर्ण व MS-CIT किंवा तत्सम सर्टिफिकेट
 • आरोग्य सेविका: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद व MS-CIT किंवा तत्सम सर्टिफिकेट
 • आरोग्य पर्यवेक्षक: B.Sc व आरोग्य कर्मचारी कोर्स व MS-CIT किवा तत्सम सर्टिफिकेट
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: फिजिक्स/ केमिस्ट्री/ बायोलॉजी/ झूलॉजि/ माइक्रोबायोलॉजी विषयात B.Sc व MS-CIT किवा तत्सम सर्टिफिकेट
 • वयोमर्यादा 18 ते 38 वय वर्षे (मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथिलक्षम)

Apply Online Now 

4 thoughts on “खुशखबर! महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2022 -Maharashtra ZP Bharti 2022”

Leave a Comment