महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये मेगाभरती! पाच हजारहून अधिक रिक्त जागा, त्वरित करा अर्ज
Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत “विद्युत सहाय्यक” पदांच्या पाच हजारहून अधिक रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. एकूण तब्बल ५३४७ जागांसाठी हे अर्ज मागवण्यात येत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी असून त्वरीत अर्ज करून या संधीचे सोने करावे. अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून २० मार्च २०२४ या शेवटच्या तारखे पर्यंत अर्ज भरावे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिक्षा शुल्क आणि पात्र उमेदवारांना पगार किती मिळणार याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊ या.
पदाचे नाव (Name of Posts) – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विद्युत सहाय्यक या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
पदसंख्या (No. of Posts) – या पदांसाठी ५३४७ जागा रिक्त असून त्वरीत अर्ज करावा.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे त्यासाठी अधिसुचना नीट वाचावी.
वयोमर्यादा (Age Limit) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
परीक्षा शुल्क (Application Fees) – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५० + GST रुपये शुल्क आकारण्यात येईल तर मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांना रु. १२५ + GST शुल्क भरावा लागेल
अर्ज पद्धती (Application Mode) – तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date for Application) – २० मार्च २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूवी अर्ज करावा अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
वेतन (Salary) :
प्रथम वर्ष – १५,००० रुपये
द्वितीय वर्ष – १६,००० रुपये
तृतीय वर्ष – १७,००० रुपये
अधिकृत वेबसाईट (Official Website) – https://www.mahadiscom.in/ या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करून या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यावी.
अधिसुचना (Notification )– https://drive.google.com/file/d/15ZlKyZU8qDU8HEDqNC7Pio-jZMtKHWNE/view?usp=sharing
अर्ज कसा करावा?
विद्युत सहाय्यक या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज करण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचावी.
आवश्यक विचारलेली माहिती नीट भरावी.
अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी भरावा अन्यथा अपात्र ठरविण्यात येईल.