MHT CET च्या तारखांची घोषणा !! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
MHT CET Time Table 2021 – The Maharashtra Common Entrance Test will be held from September 15. Candidates will be able to download the Maha CET 2021 admit card soon at mahacet.org. Check the complete revised schedule here.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) दिनांक १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत म्हणाले, सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी एकूण ८ लाख ५५ हजार ८७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या प्रवेश परीक्षांसाठी २२६ केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. तसेच राज्याबाहेरील केंद्रांच्या संख्येतही या वर्षी वाढ करण्यात आलेली असून परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सीईटी परीक्षांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –
Maha CET 2021 revised schedule
मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स – MAH-MCA-CET – १५ सप्टेंबर २०२१
मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी – MAH-M.HMCT – १५ सप्टेंबर २०२१
मास्टर ऑफ आर्किटेक्चर – MAH-M.Arch-CET – १५ सप्टेंबर २०२१
मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन – MAH-M.P.Ed-CET – १५ सप्टेंबर २०२१
मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन – MAH-M.P.Ed-Physical Test (Offline) – १६, १७ व १८ सप्टेंबर २०२१
बॅचलर ऑफ आर्ट्स/बॅचलर ऑफ सायन्स/बॅचलर ऑफ एज्युकेशन (Four year integrated course)- MAH-B.A/B.Sc.,BEd CET – १५ सप्टेंबर २०२१
मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट स्टडीज – MAH-MBA/MMS CET – १६, १७ व १८ सप्टेंबर २०२१
बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजी, फार्मसी, अॅग्रीकल्चर – MHT-CET 2021 – २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२१
बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी – MAH-B.HMCET – ३ ऑक्टोबर २०२१
मास्टर ऑफ एज्युकेशन – MAH-M.Ed.-CET- ३ ऑक्टोबर २०२१
बॅचलर ऑफ एज्युकेशन, मास्टर ऑफ एज्युकेशन (तीन वर्ष कालावधी) – MAH-B.Ed. M.Ed.-CET- ३ ऑक्टोबर २०२१
बॅचलर ऑफ लॉ (इंटिग्रेटेड) – MAH-LLB-5Yrs-CET- ३ ऑक्टोबर २०२१
बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन – MAH-B.P.Ed.-CET- ३ ऑक्टोबर २०२१
बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन – MAH-B.P.Ed.Test (Offline)- ४ ते ७ ऑक्टोबर २०२१
बॅचलर ऑफ लॉ (३ वर्ष) – MAH-LLB-३Yrs-CET- ४, ५ ऑक्टोबर २०२१
बॅचलर ऑफ एज्युकेशन जनरल अँड स्पेशल – MAH-B.Ed. CET And B.Ed. CET+ELCT- ६ व ७ ऑक्टोबर २०२१
बॅचलर ऑफ फाइन आर्ट (ऑफलाइन)- MAH-AAC-CET- ९ आणि १० ऑक्टोबर २०२१
या परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ नोव्हेंबरपासून सुरु होईल. हे शैक्षणिक वर्ष सुरु करताना राज्यातील त्या वेळेची कोरोनाची परिस्थिती पाहून ऑनलाईन सुरु करायचे की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात येईल.
खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी ‘गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणे’ या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून ८ लाख रुपये इतकी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने घेतला आहे, असेही सामंत यांनी सांगितले. राज्य सीईटी कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर तपशीलवार वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
MHT CET च्या तारखांची घोषणा पुढील आठवड्यात: उच्च शिक्षणमंत्री
MHT CET Time Table 2021 – The decision regarding MHT CET Date 2021 for admission to engineering and other vocational courses in the state will be taken in the next 2 to 4 days. Higher Education Minister Uday Samant said that the number of examination centers in the state would have to be increased to take this exam.
राज्यातील इंजिनीअरिंग आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय (MHT CET Date 2021) येत्या २ ते ४ दिवसांत घेतला जाईल. ही परीक्षा घेण्यासाठी राज्यातील परीक्षा केंद्रे वाढवावी लागतील, असे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. नागपुरात ते शनिवारी पत्रकारांशी बोलत होते. तसेच राज्यात येत्या काळात मराठी भाषा विद्यापीठाची निर्मिती करण्यात येईल. त्यासाठी ८ ते १० दिवसांत समिती स्थापन केली जाईल. या समितीचा अहवाल आल्यानंतर अनेक दिवसांची ही मागणी पूर्णत्वात नेण्यात येईल, अशी घोषणाही सामंत यांनी केली.
प्राध्यापक भरतीचा मुद्दा मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. याबाबत, सध्याची परिस्थिती बघता सध्या थांबण्याची विनंती वित्त विभागाने केली आहे. येत्या सोमवारी प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत या विषयावर चर्चा होईल. प्रत्यक्ष कॉलेजेस सुरू करावयाचे असले तरी तरी अद्याप तिसर्या लाटेबाबत स्पष्टता आलेली नाही. सर्व कर्मचार्यांचे पूर्ण लसीकरण झाल्याशिवाय कॉलेजे सुरू करता येणार नाही. उच्च शिक्षण विभागाने छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीचे ३०१ कोटी देण्यात आले आहेत. ते तातडीने वितरित करण्यात येतील. खासगी कॉलेजांमधील शुल्क कमी करण्याबाबत चिंतामणी जोशी यांची समिती तसेच शुल्क नियमन समिती नेमण्यात आली आहे. याबाबतीत नागपूर विद्यापीठाचे सूत्र राज्यभरात राबविण्यास सांगितले आहे, अशी माहिती उच्च शिक्षणमंत्र्यांनी दिली.
नागपुरातील विविध शिक्षणसंस्थांच्या गरजांच्या पूर्ततेबाबत त्यांनी माहिती दिली. रामटेक येथील संस्कृत विद्यापीठाला विस्तारासाठी जागा हवी आहे. त्यासंदर्भात, जिल्हाधिकार्यांना सूचना देण्यात आला आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानातील फॉरेन्सिक कॉलेज व इन्स्टिट्युट ऑफ सायन्स यांचे प्रत्येकी १ कोटी रुपये तर वसंतराव नाईक कॉलेजचे ४९ लाख रुपये परत गेले आहे. योग्य प्रस्ताव आल्यास हे पैसे त्यांना देण्यास येतील. याशिवाय, डीपीसीमधूनही या संस्थांना मदत करण्यात येईल, असेही सामंत म्हणाले.
महाराष्ट्र सीईटी 2021 संभाव्यत: “या” महिन्याच्य अखेरीस उदय सामंत यांनी सांगितले
MHT CET Time Table 2021 – Maharashtra Higher and Technical Education Minister Uday Samant have recently stated that the exam is likely to held by July end or August. Maharashtra Common Entrance Test, MHT CET 2021 exam date is expected to be announced soon by the state education department
महाराष्ट्र राज्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नुकतीच बारावी बोर्ड परीक्षा रद्द केली. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे केले आणि महाविद्यालयांमध्ये त्यांना प्रवेश कसा मिळाला, हा बहुतेक लोकांचा एकच प्रश्न आहे. या परिस्थितीत महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले की, महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (एमएचटी सीईटी) २०२१ लवकरच घेण्यात येईल.
पुणे येथे पत्रकार परिषद घेताना शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले की एमएचटी सीईटी परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल. समितीबरोबर चर्चा केल्यानंतर राज्य शिक्षण विभागामार्फत नेमकी तारीख जाहीर केली जाईल. तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, फार्मसी आणि आर्किटेक्चरच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी ही प्रवेश परीक्षा आहे.
शिक्षण मंत्री म्हणाले की एमएचटी सीईटी २०२१ चे आयोजन व त्याचे विश्लेषण करण्यासाठी विविध विद्यापीठांचे कुलगुरू, महाराष्ट्र सीईटी कक्षाचे अधिकारी आणि उच्च शिक्षण विभाग यांच्यासमवेत एक समिती स्थापन केली आहे. ते म्हणाले की ही समितीही या आवाहनाबद्दल विश्लेषण करेल. १२ वी बोर्डाची परीक्षा रद्द झाल्यामुळे महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी सर्वसाधारण सीईटी परीक्षेचे. सीईटी परीक्षेसंदर्भात अधिकृत सूचना लवकरच प्रसिद्ध केली जाईल.
एमएचटी सीईटी 2021 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल आणि अर्जदारांना कोणतीही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. परंतु अद्याप अधिकृत नोटीस जाहीर केलेली नाही. विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटीविषयी माहितीसाठी एमएचटी सीईटीची अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासा. आम्ही एमएचटी सीईटी 2021 परीक्षेचे सर्व तपशील त्वरित अपलोड करू.
सीईटी परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असल्याची सीईटी सेलची माहिती
MHT CET Time Table 2021 – There is confusion among the students as the schedule of the subsequent CET exams has not been announced by the CET cell yet. But As per information by CET CELL it will soon released Time Table for CET Exams. So keep visiting to know further details on MHT CET Time Table 2021.
CET Time Table 2021 Maharashtra – अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी या पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी महाराष्ट्रातून सुमारे साडेतीन लाख विद्यार्थी अर्ज भरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा याची दिशा व मार्गदर्शन मिळत असते. मात्र अद्याप सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे पुढे काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे. सीईटी सेलने संपूर्ण नियोजन जाहीर न करता किमान तारखा तरी जाहीर कराव्यात, असे मत विद्यार्थ्यांनी मांडले.
नियाेजित प्रवेेश प्रक्रिया संपल्यावर वेळापत्रक हाेणार जाहीर
मागील वर्षी तब्बल ६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी नोंदणी केली होती. इतर परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या. अभियांत्रिकी व इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात संपली. मात्र, लाॅची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू आहे. ही प्रक्रिया संपल्यावरच पुढील वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे सांगण्यात आले आहे. नियाेजित प्रवेेश प्रक्रिया संपल्यावर वेळापत्रक हाेणार जाहीर
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents