Ministry of Ports, Shipping and Waterways अंतर्गत भरती सुरु !

Ministry of Ports, Shipping and Waterways अंतर्गत भरती सुरु !

Ministry of Ports, Shipping and Waterways Recruitment 2024 :

सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्यांसाठी गोव्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या नोकरींसाठी तब्बल 2 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे. जाणून घेऊया या नोकरीची अधिक माहिती

गोवा हे सर्व भारतीयांच आवडीच फिरण्याचे ठिकाण, गोव्यातील निसर्ग आणि तेथील वातावरण अनुभवण्यासाठी प्रत्येक जण तेथे जातो अथवा जाऊ इच्छितो. जर त्याच गोव्यामध्ये सरकारी नोकरीची संधी मिळाली तर अजून काय पाहीजे असेच वाटू शकते. भारत सरकारच्या मुरगाव पोर्ट अथॉरिटी गोवा मध्ये 13 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीप्रक्रियेसंबंधी mptgoa.gov.in मध्ये नोटिफिकेशन जारी केले गेले आहे.
मुरगाव बंदर प्राधिकरण, गोवा बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय (Ministry of Ports, Shipping and Waterways) च्या अंतर्गत ही भरतीप्रक्रिया होणार आहे. जर तुमचे सरकारी नोकरी करण्याचे ध्येय आहे आणि त्यातही गोव्यात काम करण्याची संधी तुम्हाला मिळत असेल तर लवकरात लवकर यासाठी अर्ज प्रक्रिया करा.

पदे आणि जागा

  • ट्रेनी पायलट- 05
  • डी वाय सेक्रेटरी- 01
  • अकाऊंट ऑफिसर जीआर- 02
  • असिस्टंट एग्झिक्युटिव्ह इंजीनीयर- 1
  • असिस्टंट मटेरियल मॅनेजर- 1
  • लॉ ऑफिसर- 1
  • असिस्टंट कॉस्ट अकाऊंट ऑफिसर- 1
  • असिस्टंट इंजीनीयर-1

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

नोटिफिकेशनमध्ये विविध पदानुसार त्याचा पात्रता निकष देण्यात आला आहे. त्यानुसार वय आणि शैक्षणिक पात्रता दिली गेली आहे .

पगार (Salary ) :

पगार 40,000 ते 2 लाख पर्यंत असून विविध पदानुसार वेतन दिले गेले आहे.

अर्ज प्रक्रिया

गोवामधील या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचे आहे.
अर्जाची शेवटची तारीख- 22 ऑगस्ट 2024
नोटिफिकेशनमधील अर्ज डाऊनलोड करुन त्यावर संपूर्ण माहिती भरुन फोटो जोडावा.
त्यानंतर तो अर्ज आवश्यक कागदपत्रांसोबत टू द सेक्रेटरी, मुरगाव पोर्ट अथोरिटी, हेडलॅंड, गोवा- 403804 (TO THE SECRETARY, MORMUGAO PORT AUTHORITY, HEADLAND, SADA, GOA -403804. ) या पत्त्यावर पाठवावा.

Leave a Comment