MPSC एमपीएससी’चे २०२५ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर !

MPSC एमपीएससी’चे २०२५ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर !

MPSC 2025 Exam Time table : २०२४ या वर्षातील काही परीक्षा विविध कारणांमुळे पुढे गेल्या होत्या. आता महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. त्याचा निकाल २०२५ च्या मे महिन्यात लागणार आहे. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा-२०२४ ही १ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे. तसेच महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही ५ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे.

MPSC Exam Time table 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे २०२५ मधील विविध परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे जाहीर केलेले वेळापत्रक अंदाजित वेळापत्रक असणार आहे. यामध्ये काही बदलही होऊ शकतात. या अंदाजित वेळापत्रकानुसार २०२५ सालची महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. याची जाहिरात जानेवारी २०२५ मध्ये येण्याची शक्यता आहे. तर या परीक्षेचा निकाल २०२६ च्या जानेवारी महिन्यात लागणार आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २०२५ मधून राज्यसेवेच्या विविध संवर्गातील ३५ पदांची भरती होणार आहे. तसेच यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, सहाय्यक नियंत्रक वैधमापनशास्त्र, अन्न व औषध प्रशासकीय सेवा आणि वनसेवा यांची संयुक्त पूर्व परीक्षा २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. या या विविध संवर्गातील पदांची पूर्व परीक्षा झाल्यानंतर त्याचा त्याचा निकाल जानेवारी २०२६ मध्ये लागेल. नंतर याच्या मुख्य परीक्षांच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील.

९ नोव्हेंबरला गट-ब परीक्षा
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या पदाची पूर्व परीक्षा १२ ऑक्टोबर २०२५ रोजी होईल. तर या पूर्व परीक्षेचा निकाल जानेवारी २०२६ मध्ये लागेल आणि मुख्य परीक्षेचे दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. त्यानंतर महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ या परीक्षेद्वारे सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक (श्रेणी एक)/ मुद्रांक निरीक्षक ही पदे भरली जातील. या पदांसाठीची पूर्व परीक्षा ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होईल. याचा निकाल फेब्रुवारी २०२६ मध्ये जाहीर करण्यात येईल. तसेच मुख्य परीक्षांच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील.

 

Leave a Comment