MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरती !
MPSC Recruitment 2024 :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लिगल ऑफिसर (गट अ) आणि मॅनेजर (गट अ) या पदांच्या १३ जागा रिक्त असून त्यासाठी भरती सुरू झाली आहे. उमेदवारांना २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत त्यांचे अर्ज सादर करता येतील. कायदा विषयातील अभ्यास केलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. पदावर नियुक्ती झाल्यानंतर २,१५,९००/- मासिक वेतन मिळणार.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरती जाहीर करण्यात आली आहे. आदिवाशी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत १३ नवीन जागांसाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लिगल ऑफिसर (गट अ) आणि मॅनेजर (गट अ) या पदांच्या एकूण १३ जागा रिक्त आहेत. इच्छुक उमेदवार त्यांचा अर्ज २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती म्हणजे सुवर्णसंधी आहे. लिगल ऑफिसर (गट अ) आणि मॅनेजर (गट अ) या पदी रुजू झाल्यानंतर नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्रातील असेल. ज्यात लिगल ऑफिसर (गट अ) पदाच्या १२ जागा रिक्त आहेत, तर मॅनेजर (गट अ) पदाची एक जागा रिक्त आहे. या पदांमधील चार जागा या महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे या भरतीत पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार दोघेही सहभागी होऊ शकतात.
पद आणि त्यानुसार वयोमर्यादा
- लिगल ऑफिसर (गट अ)
- उमेदवाराचे वय १८ वर्षे ते ३८ वर्षे यादरम्यान असावे.
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट.
- मॅनेजर (गट अ)
- उमेदवाराचे वय १९ वर्षे ते ५० वर्षे यादरम्यान असावे.
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट
पद आणि त्यानुसार मासिक वेतन
- लिगल ऑफिसर (गट अ) – ६७,७००/- ते २,०८,७००/- दर महिना
- मॅनेजर (गट अ) – १,२३,१००/- ते २,१५,९००/- दर महिना
या भरतीमध्ये सहभगी होण्यासाठी अर्ज भरणे महत्त्वाचे आहे. ही अर्ज प्रक्रिया दिनांक ६ ऑगस्ट २०२४ पासून सुरू झाली असून दिनांक २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत सुरू राहील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खुल्या वर्गातील उमेदवारांना ७१९/- परीक्षा शुल्क भरावे लागेल. मागासवर्गीय उमेदवारांना ४४९/- इतके परीक्षा शुल्क भरावे लागेल. परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी २६ ऑगस्ट २०२४ शेवटची तारीख असेल. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी २९ ऑगस्ट २०२४ शेवटची तारीख असेल.