महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महसूल व वन विभागातील सहायक वन संरक्षक, गट- अ तसेच वनक्षेत्रपाल गट-ब या संवर्गातील 100 पदांसाठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा -2019 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
नगरचा वैभव दिघे राज्यात प्रथम
या परिक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील वैभव दिघे हा राज्यातून तसेच मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम आला आहे. तर पुणे जिल्ह्यातील पूजा पानसरे हिने महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम येनाचा मान मिळवला आहे.
काही पदांचा निकाल राखून ठेवला
तसेच वनक्षेत्रपाल पदाकरीता खेळाडूंसाठी आरक्षित असलेल्या 4 पदांचा तसेच अन्य तीन पदांचा निकाल प्रशासकीय कारणास्तव राखून ठेवण्यात आला आहे. यामध्ये अन्य एका उमेदवाराचा निकालदेखील राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या पदांची यादी तसेच निवडण्यात आलेल्या उमेदवारांची नावे नंतर जाहीर केले जातील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
निकाल कसा पाहावा ?
♦ निकाल पाहण्यासाठी https://mpsc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
♦ त्यानंतर वनसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याचे नोटीफिकेशन दिसेल. त्यावर क्लिक करा
♦ नोटीफिकेशनवर क्लिक केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी दिसेल.
♦ या यादीत तुमचे नाव असेल तर तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण आहात
♦ ही यादी डाऊनलोड करुन ठेवा. भविष्यात गरज पडू शकते.
राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकालही जाहीर
यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकाल 28 सप्टेंबर रोजी जाहीर केला होता. एमपीएससीनं या सदंर्भात परिपत्रक जारी केलं होतं. एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. एमपीएससी 413 पदांचा निकालाची विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा होती. अखेर निकाल अखेर जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांनी राज्य सरकारचे आभार मानले होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर पाहता येईल.