MSCE पुणे अंतर्गत मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक’ या पदांवर भरती सुरु
MSCE Pune Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत रिक्त पदांवर भरती होणार आहे. नेमकी कोणत्या पदांवर होणार आहे जाणून घ्या. पुणे शहरातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत ‘मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक’ या पदांवर भरती होणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या, तसेच नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांनी वरील पदांकरिता अर्ज कसा करायचा त्याबद्दल माहिती पाहा. तसेच भरतीसाठी पात्रता निकष जाणून घ्या.
पद आणि पदसंख्या
मुख्य लिपिक या पदासाठी एकूण ६ जागा रिक्त आहेत.
वरिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण १४ जागा रिक्त आहेत.
निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठी एकूण ३ जागा रिक्त आहेत.
एकूण रिक्त पदांची संख्या २३ अशी आहे.
शैक्षणिक पात्रता
मुख्य लिपिक – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची, कुठल्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
टंकलेखन किंवा संगणक टंकलेखनात मराठी ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
मुख्य लिपिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान दोन वर्षाचा शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वरिष्ठ लिपिक – वरिष्ठ लिपिक पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडे किमान दोन वर्षांचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक / लिपिक आणि
टंकलेखन पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
तसेच, उमेदवार एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
निम्नश्रेणी लघुलेखक – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कुठल्याही शाखेची पदवी असणे आवश्यक.
टंकलेखन किंवा संगणक टंकलेखन मराठी ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट, तसेच इंग्रजी व मराठी लघुलेखन १०० शब्द प्रति मिनिटचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
उमेदवार एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
शुल्क :
- जे उमेदवार खुल्या वर्गातील आहेत, त्यांच्यासाठी ९५०/- रुपये शुल्क आकारला जाईल.
- जे उमेदवार राखीव वर्गातील आहेत, त्यांच्यासाठी ८५०/- रुपये शुल्क आकारले जाईल.
पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अधिकृत वेबसाईट – https://www.mscepune.in/