MSCE : इयत्ता पाचवी – आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्या
MSCE Scholarship Exam 2022 Registration – Corona’s background led to a delay in taking the scholarship exam last year. Similarly, the students did not get direct guidance from the teachers. As a result, there was a big drop in the results of the scholarship examination. But, now the schools have started following the rules regarding corona. Students are able to study in the classroom. So scholarship classes can also be started offline. Maharashtra State Examination Council has started filling up applications for Class V and VIII Scholarship Exam. The scholarship examination will be held on February 20, 2022. Students will be able to fill up applications (MSCE Scholarship Exam 2022 Registration) with regular fees from 1st December to 31st December 2021
Notification of Pre-Upper Primary Scholarship Examination (i.e. Class V) and Pre-Secondary Scholarship Examination (i.e. Class VIII) 2022 to be published on the website of the Examination Council at ‘www.mscepune.in’ and ‘https://www.mscepuppss.in/’ Has arrived. The deadline for filling up the online application form along with the regular fee for this exam was extended from 1st to 31st December 2021. But now schools are being given an extension from January 15 to 31 to fill up school information forms and online applications.
Scholarship Exam Postponed – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन अर्ज (Online Application) भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच यापूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार २० फेब्रुवारी रोजी होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची सुधारित तारीख लवकर जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
MSCE Scholarship Exam 2022 Registration
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती (Scholarship Exam) परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. येत्या २० फेब्रुवारी २०२२ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असून विद्यार्थ्यांना १ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यास विलंब झाला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात मोठी घट झाली. परंतु,आता कोरोना विषयक नियमांचे पालन करून शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण घेता येत आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती वर्ग सुद्धा ऑफलाइन पद्धतीने सुरू होऊ शकतात.
परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज स्विकारले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे राज्य परीक्षा परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना २०० रुपये व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना १२५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना अनिवार्य बाबीं / कागदपत्रे खालीलप्रमाणे : MSCE Required Documents
१. विद्यार्थ्याची फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी (jpg/jpeg/png/bmp format मध्ये 100 kb पेक्षा जास्त नसावी.)
२. विदर्भातील ११ जिल्हयातील पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.२०,०००/- पेक्षा कमी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) प्रमाणपत्र. (इ. ५ वी व इ. ८ वी साठी)
३. विद्यार्थ्याचे पालक रु. २०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे भूमिहीन शेतमजूर असल्यास भूमिहीन शेतमजूर व रू.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याबाबत सक्षम अधिकारी (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) यांनी दिलेली प्रमाणपत्रे. (इ. ८ वी साठी)
४. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी.
परीक्षा आयोजनाबाबत सर्वसाधारण माहिती : About MSCE Exam 2022
१. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सीलबंद स्वरुपात देण्यात येतील.
२. उत्तरपत्रिकांची तपासणी OMR पध्दतीने केली जाते.
३. कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येत असल्याने सदर उत्तरपत्रिकांची डिजिटल स्कॅन कॉपी (छायाप्रत ) देण्यात येणार नाही.
४. उत्तरपत्रिकेत गिरवलेली / खाडाखोड केलेली उत्तरे ग्राहय धरली जाणार नाहीत. एकदा नोंदविलेले उत्तर बदलता येणार नाही.
५. कोणत्याही परिस्थितीत उत्तरपत्रिकेतील वर्तुळ पेन्सिलने रंगवू नये. अशा उत्तरांना शून्य गुण दिले जातील.
६. शिष्यवृत्ती परीक्षेची परीक्षापूर्व कामे, उत्तरपत्रिकांची तपासणी शिष्यवृत्तीधारकांची निश्चिती, विद्यानिकेतन प्रवेश निवड याद्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका / प्रमाणपत्रे व परीक्षेची सर्व सांख्यिकीय माहिती संगणकावर तयार केली जाते.
विद्यार्थ्याचे आधार कार्ड क्रमांक व बँक खाते क्रमांकाबाबत :
ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, IFS Code व बँक खाते क्रमांक) आणि विद्यार्थ्याचा आधार क्रमांक किंवा आधार एनरॉलमेंट क्रमांक उपलब्ध असल्यास नमूद करावा. परंतु सदर बाबी अनिवार्य नसल्याने बँक खात्याचा तपशील किंवा आधार क्रमांकासाठी विद्यार्थी / पालकांवर सक्ती करण्यात येऊ नये. केवळ सदर माहिती उपलब्ध नाही म्हणून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचा सविस्तर मार्गदर्शन करणारा व्हिडीओ लवकरच ब्लॉगवर उपलब्ध होईल. सदर अधिसूचना खालील दिलेल्या pdf मध्ये आहे. तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पुढील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. www.mscepune.in व https://www.mscepuppss.in
ऑनलाईन अर्ज कुठं करायचा?
पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना www.msecpune.in आणि https://msecpuppss.in या वेबसाईटवर अर्ज करण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आलं आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा फीमध्ये वाढ
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची फी यावर्षीपासून वाढवण्यात आली आहे. नव्या शासन निर्णयाप्रमाणं बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क 50 रुपये तसेच परीक्षा शुल्क 150 रुपये करण्यात आलंय. मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थ्यासाठी प्रवेश शुल्क 50 रुपये तर परीक्षा शुल्क 75 रुपये करण्यात आलं आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास दिली मुदतवाढ
पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळांच्या माध्यमातून 31 जानेवारीपर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिल्यानं परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
जाहिरात वाचा
???? अर्ज करा
MSCE इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या शुल्कात वाढ !!
MSCE Scholarship Exam 2021 – The Maharashtra State Examination Council conducts the fifth and eighth scholarship examinations every year. Scholarships are given to the students who pass this examination for a certain period of time every month. The school education department of the state government on Thursday decided to increase the fees for the fifth and eighth scholarship examinations. Know More about latest information regarding MSCE Scholarship Exam 2021 at below
राज्य सरकारने विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पाचवी तसेच आठवीच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ करण्याऐवजी परीक्षा आणि प्रवेश शुल्कात एकूण अडीचपट वाढ केली आहे. या शुल्कवाढीमुळे शिष्यवृत्ती परीक्षा देण्याकडे कल नसणारे विद्यार्थी यापुढे परीक्षा देतील का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या निर्णयाला पालक आणि विद्यार्थी संघटनांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दरवर्षी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा काही कालावधीसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठीचे शुल्क वाढविण्याचा निर्णय़ गुरुवारी घेतला. या निर्णयानुसार बिगरमागास; तसेच मागास आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क २० रुपयांवरून ५० रुपये केले आहे, तर बिगरमागास विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ६० रुपयांवरून १५० रुपये केले आहे. यापूर्वी, मागास आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क आकारण्यात येत होते. मात्र, आतापासून ७५ रुपये आकरण्यात येणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षांसाठी बिगरमागास विद्यार्थ्यांना एकूण २०० रुपये, तर मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांना १२५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
त्याच वेळी पाचवीची शिष्यवृत्ती सहावी ते आठवीपर्यंत प्रत्येत वर्षातील दहा महिने २५० ते एक हजार रुपयांपर्यंत मिळते, तर आठवीची शिष्यवृत्ती नववी आणि दहावीत प्रत्येकी दहा महिन्यांसाठी ३०० ते दीड हजार रुपयांपर्यत मिळते. ही रक्कम फारच तुटपुंजी असल्याचे शिक्षक आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक शिष्यवृत्तीच्या परीक्षा गांभीर्यांने घेत नाहीत. आता या परीक्षांच्या शुल्कात अडीचपट वाढ करण्यात आल्याने, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत निम्म्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत शुल्कवाढ करून, शालेय शिक्षण विभागाने कोणता उद्देश साधला, अशी विचारणा होऊ लागली आहे.
परीक्षेचा खर्च वाढल्याने शुल्कात वाढ
शालेय शिक्षण विभागाने २०१० सालानंतर शिष्यवृत्तीच्या रक्कमेत फारशी वाढ केली नाही. मात्र, २०१६मध्ये आणि आता ११ नोव्हेंबरला शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी लागणाऱ्या प्रवेश आणि परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली. या शुल्कवाढीसाठी आवेदनपत्रे भरणे, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांची छपाई, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, निकाल तयार करणे, गुणवत्ता याद्या तयार करणे यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे या शुल्कात वाढ करण्यात येत असल्याचा दाखला शिक्षण विभागाने दिला आहे.
MSCE इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सुधारित परीक्षा केंद्राची यादी जाहीर
MSCE Scholarship Exam 2021 – The date of Class V and VIII Scholarship Examination conducted by Maharashtra State Examination Council has been changed. Scholarship examination will now be held on 12th August. Earlier, the date of the exam was announced as August 8. However, now the exam has been postponed for another 4 days.
-
बृहन्मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रातील खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुधारित परीक्षा केंद्राची यादी (इयत्ता ५ वी)
-
बृहन्मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रातील खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुधारित परीक्षा केंद्राची यादी (इयत्ता ८ वी)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला. शिष्यवृत्तीपरीक्षा आता १२ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी या परीक्षेची तारीख ८ ऑगस्ट अशी जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता परीक्षा आणखी ४ दिवस पुढे ढकलली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे व बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे राज्यातील अनेक संघटनांकडून प्राप्त निवेदनांचा विचार करून शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असल्याचे राज्य परीक्षा परिषदेने कळविले आहे.
२०२०-२१ च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ऑगस्टमध्ये होत आहेत. या परीक्षेदरम्यान कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्यावतीने मान्यता देण्यात आली होती. मात्र, राज्यातील पूरपरिस्थी लक्षात घेऊन या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, १२ ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात येईल.
दरम्यान, यापूर्वीही ही परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या/तिसऱ्या रविवारी घेण्यात येणार होती. त्यानंतर करोना पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलून एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. पण करोनाची परीस्थिती नियंत्रणात न आल्याने पुन्हा या परीक्षेला स्थगिती देण्यात आली.
5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर,परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
MSCE Scholarship Exam 2021 – Now that the 10th grade results are out, there is important news for 5th and 8th grade students. Scholarship examinations for both the classes, which have been postponed due to corona outbreak, will now be held on August 8, said School Education Minister Varsha Gaikwad.
शिष्यवृत्ती परीक्षा सोमवार दि. ०९ ऑगस्ट, २०२१ चे प्रवेशपत्र -संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. शाळांनी तात्काळ सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र निर्गमित करावे
MSCE Scholarship exam Dates
MSCE Scholarship exam now will be held on 9th August 2021. Earlier exam is scheduled on 8th August 2021.
10वीचा निकाल लागल्यानंतर आता 5वी आणि 8वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सातत्याने पुढे ढकलण्यात आलेली या दोन्ही वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा आता 9 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय. कोरोना नियमांचं पालन करुन ही परीक्षा होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. ही परीक्षा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं मान्यता देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षेबाबत माहिती देताना वर्षा गायकवाड यांनी ट्वीट केलं आहे. सन 2020-21 च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून 9 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. परीक्षार्थींना मनापासून शुभेच्छा!, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.
Previous Year MSCE Scholarship Exam Paper
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०१७ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ५ वी) | |||||||||||||||||||||||||||
|
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०१७ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी) | |||||||||||||||||||||||||||
|
शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक २३ मे, २०२१ रोजी घेण्यात येणार !!
MSCE Scholarship Exam 2021 – The Pre-Primary Scholarship Examination and the Pre-Secondary Scholarship Examination conducted by the Maharashtra State Examination Council are conducted in the month of February every year. The examination is conducted simultaneously in all the districts of the state. This examination is conducted for students pursuing government approved, subsidized, unsubsidized, permanent unsubsidized, self-financed education. The exam is scheduled to be held in April this year as the corona has not subsided yet
शिष्यवृत्ती परीक्षा – २०२१ ही दि. २५ एप्रिल, २०२१ ऐवजी २३ मे, २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.
Latest Update on 31st March 2021 इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२१ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेसाठी दिनांक १०/०४/२०२१ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Latest Update on 29th March 2021- इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२१ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेसाठी दिनांक ३०/०३/२०२१ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत काही दुरुस्ती करावयाची असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह [email protected] या हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येते. परंतु, करोनाच्या संकटामुळे ही परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आली असून, फेब्रुवारी २०२१ ऐवजी 25 एप्रिल 2021 रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
दरवर्षी इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती घेण्यात येते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येते. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते.
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents