MSEDCL मध्ये ज्युनियर असिस्टंट अकाऊंट्स पदासाठी नोकरीची संधी !

MSEDCL मध्ये ज्युनियर असिस्टंट अकाऊंट्स पदासाठी नोकरीची संधी !

MSEDCL Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) (MSEDCL) ‘ज्युनियर असिस्टंट अकाऊंट्स’ पदांची सरळसेवा पद्धतीने ३ वर्षांच्या कंत्राटी कालावधीसाठी भरती. ३ वर्षांचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना ‘लोअर डिव्हीजन क्लर्क या नियमित’ पदावर सामावून घेण्यात येईल. (वेतन श्रेणी – २९,०३५ – ७२,८७५) Advt. No. ०५/२०२३ dt. २९.१२.२०२३ एकूण रिक्त पदे – ४६८ (अजा – ७२, अज – ४७, विजा-अ – १४, भज-ब – ७, भज-क – १८, भज-ड – १७, विमाप्र – ४, इमाव – ११६, आदुघ – ७१, खुला – १०२).
महिलांसाठी एकूण १४० पदे राखीव (अजा – २२, अज – १४, विजा-अ – ४, भज-ब – २, भज-क – ५, भज-ड – ५, विमाप्र – १, इमाव – ३५, आदुघ – २१, खुला – ३१).

आरक्षित पदे – खेळाडू – २४, माजी सैनिक – ७१, प्रकल्पग्रस्त – २४, भूकंपग्रस्त – ७, शिकावू उमेदवार – ४७, दिव्यांग – २५ (गट-अ – अल्पदृष्टी – १६, गट-ब – ऐकण्यातील दुर्बलता – ७, गट-क कुष्ठरोग मुक्त, शारीरिक वाढ खुंटणे ( Dwarfism), आम्ल हल्लाग्रस्त (AAV) – २), अनाथ – ५.

पात्रता – (दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी) बी.कॉम./ बी.एम.एस./ बी.बी.ए. आणि एमएस-सीआयटी किंवा समतूल्य (३ महिने कालावधीचा कॉम्प्युटर सर्टिफिकेट कोर्स किंवा टॅली सर्टिफिकेट किंवा पदवीला १ विषय कॉम्प्युटर सायन्स अभ्यासलेला असावा.) उमेदवार हा महाराष्ट्रातील अधिवासी (Domicile) असणे आवश्यक.

वयोमर्यादा – (दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी) किमान १८ वर्षं पूर्ण व कमाल ३२ वर्षे.

कमाल वयोमर्यादा – (मागासवर्गीय/ आदुघ/ खेळाडू/ अनाथ – ३७ वर्षे, दिव्यांग, माजी सैनिक – ४७ वर्षे).

महावितरण/ महानिर्मिती/ महापारेषण कंपनीमध्ये व्होकेशनल ॲप्रेंटिस (अकाऊटन्सी ॲण्ड ऑडिटिंग)/ऑफिस मॅनेजमेंट शिकावू उमेदवारी प्रशिक्षण (Apprenticeship) २९ डिसेंबर २०२३ पूर्वी पूर्ण केलेल्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत प्रशिक्षणाच्या कालावधीइतकी सूट देण्यात येईल.

दरमहा मानधन – प्रथम वर्ष रु. १९,०००/-, द्वितीय वर्ष रु. २०,०००/-, तृतीय वर्ष रु. २१,०००/-. उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी, व्यवसायकर इ. वजावट करण्यात येईल.

निवड पद्धती – ऑनलाईन परीक्षा (अंदाजे मार्च २०२४ मधे होईल.) प्रोफेशनल नॉलेज व सामान्य अभियोग्यता चाचणी (General Aptitude) यावर आधारित राहील. (१) तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान – ५० प्रश्न, ११० गुण, (२) सामान्य अभियोग्यता – (अ) तर्कशक्ती ( Reasoning) – ४० प्रश्न, २० गुण, (ब) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड (संख्यात्मक अभियोग्यता) – २० प्रश्न, १० गुण, (क) मराठी भाषा – २० प्रश्न, १० गुण, एकूण १३० प्रश्न, १५० गुण, वेळ १२० मिनिटे.

चुकीच्या उत्तरांसाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण दंड म्हणून वजा करण्यात येतील. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेतील १५० पैकी प्राप्त गुणांचे रूपांतर १०० गुणांत करून अंतिम निवड यादी बनविली जाईल.

नमुना अर्ज व माहिती www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी ( Domicile) असलेबाबत नमूद करणे आवश्यक आहे. अजा/ अज वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांनी त्या त्या मागासप्रवर्गासाठी विहीत करण्यात आल्याप्रमाणे नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – रु. ५००/- जीएसटी; मागासवर्गी, आदुघ व अनाथ – रु. २५० जीएसटी

दिव्यांग आणि माजी सैनिक यांना फी माफ आहे.

ऑनलाइन अर्ज www.mahadiscom.in या संकेतस्थळावर दि. २० मार्च २०२४ पर्यंत करावेत.

Leave a Comment