MSSU महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाची Merit List करा डाउनलोड !

MSSU महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाची Merit List करा डाउनलोड !

MSSU Merit List 2024  :

देशपातळीवर होणाऱ्या या परीक्षेसाठी यंदा १३.४८ लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १९ हजार ५०० विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पर्याय दिला होता.

विद्यार्थ्यांना भविष्यकाळात उपयोगी पडणाऱ्या कौशल्याधारित अभ्यासक्रमांचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची गुणवत्ता यादी आज, सोमवारी जाहीर होणार आहे. इंजिनिअरिंगपासून डिझाइन, बीबीए, बीए ऑनर्स (इकॉनॉमिक्स आणि सायकॉलॉजी) अशा विविध नऊ अभ्यासक्रमांसाठीच्या ७०० जागासांठी चुरस असून या ७०० जागांसाठी एकूण १६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आता गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. विद्यार्थ्यांनी त्यासाठी https://mssu.ac.in या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने गेल्या चार वर्षांत कौशल्याधारीत अभ्यासक्रमांच्या शिक्षणात चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. या विद्यापीठाच्या पुणे, खारघर, नागपूर, लोणावळा आणि ठाणे या पाच केंद्रांवर होणाऱ्या नऊ विविध अभ्यासक्रमांसाठी कॉमन युनिव्हर्सिटी एण्ट्रन्स टेस्ट म्हणजेच सीयुईटी परीक्षा देणे अनिवार्य होते. देशपातळीवर होणाऱ्या या परीक्षेसाठी यंदा १३.४८ लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १९ हजार ५०० विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पर्याय दिला होता.

या १९ हजार ५०० विद्यार्थ्यांपैकी १६ हजार विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष नोंदणी केली. यात मॅकेट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, माहिती-तंत्रज्ञान, डिझाइन, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, फॅसिलिटी मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी, इकॉनॉमिक्स आणि सायकॉलॉजी या शाखांचा पर्याय होता. या प्रत्येक शाखेत दोन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम, तीन वर्षांचा बीव्होक आणि चार वर्षांचा बीटेक, एमडेस, बीबीए किंवा बीए ऑनर्स असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. या सर्व अभ्यासक्रमांसाठीची गुणवत्ता यादी आता सोमवारी जाहीर होणार असून त्यानंतर प्रवेश पक्रिया सुरू होईल.

Leave a Comment