मशिन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी (MTPF) मध्ये नोकरीची संधी !

मशिन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी (MTPF) मध्ये नोकरीची संधी !

MTPF Recruitment 2024 :

मशिन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी ( MTPF), अंबरनाथ आर्मर्ड वेहिकल्स निगम लिमिटेड ( AVNL) यांचे युनिट. (भारत सरकारचा उपक्रम, संरक्षण मंत्रालय) ॲप्रेंटिसेस ॲक्ट, १९६१ अंतर्गत नॉन-आयटीआय आणि आयटीआय उमेदवारांची ट्रेड ॲप्रेंटिसेसच्या ५९ व्या बॅचकरिता भरती. एकूण रिक्त पदे – ९०. ट्रेडनुसार रिक्त पदांचा तपशील –
( I) नॉन-आयटीआय – एकूण ४७ पदे. कालावधी – २ वर्षे. स्टायपेंड – पहिले ३ महिने रु. ३,०००/-, नंतरचे ९ महिने रु. ६,०००/-, दुसऱ्या वर्षी रु. ६,६००/- दरमहा.

(१) फिटर – १० पदे

(२) टर्नर – १५ पदे.

(३) मशिनिस्ट – १६ पदे.

(४) MMTM – ६ पदे.

पात्रता : १० वी किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (गणित आणि विज्ञान विषयात प्रत्येकी ४० टक्के गुण आवश्यक.)
( II) एक्स-आयटीआय – एकूण ४३ पदे. कालावधी – १ वर्ष. स्टायपेंड – रु. ८,०५०/- दरमहा.
(१) फिटर – ९ पदे.

(२) टर्नर – १४ पदे.

(३) मशिनिस्ट – १५ पदे.

(४) इलेक्ट्रिशियन – ३ पदे.

(५) वेल्डर – २ पदे.

पात्रता : १० वी आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय कोर्स किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा – (दि. २६ जुलै २०२४ रोजी) १५ ते २४ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; दिव्यांग – खुला – १० वर्षे, इमाव – १३ वर्षे, अजा/अज – १५ वर्षे; आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना आयटीआय ट्रेनिंगच्या कालावधीइतकी).

निवड पद्धती : नॉन-आयटीआय ट्रेडसाठी १० वीमधील गुणांनुसार आणि एक्स-आयटीआय ट्रेडसाठी १० वी आणि आयटीआयमधील एकत्रित गुणवत्तेनुसार गुणवत्ता यादी बनविली जाईल.

कागदपत्र पडताळणीनंतर वैद्याकीय तपासणी केली जाईल.

Annexure- I मध्ये दिलेल्या विहीत नमुन्यातील अर्जाची प्रिंट काढून पूर्ण भरलेल्या अर्जावर avnl. co. in/ advertisement for 59th batch Trade Apprentice. MTPE वरील अलिकडच्या काळात काढलेला पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटोग्राफ चिकटवून आवश्यक त्या कागदपत्रांसह पुढील पत्त्यावर दि. २६ जुलै २०२४ पर्यंत पोहोचेल असा पाठवावा.

The Chief General Manager, Machine Tool Prototype Factory, A Unit of AVNL, Govt. of India Enterprise, Ambernath, Dist. Thane – 421502.अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे : (१) आधारकार्ड नसल्यास ओळखपत्र, (२) १० वीचे गुणपत्रक, (३) १० वीचे प्रमाणपत्र, (४) आयटीआयचे एकत्रित गुणपत्रक, (५) नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट, (६) जातीचा दाखला, (७) दिव्यांग दाखला इ.

 

Leave a Comment

9163