‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत बोगस अर्ज वाढले ‘

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत बोगस अर्ज वाढले ‘

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : सातारा जिल्ह्यातील लाभार्थ्याने २८ अर्ज दाखल केल्याचा प्रकार समोर आला. त्यातून त्यांनी जास्त रक्कम लाटण्याचे ‘उद्योग’ केले आहेत. या प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आणखी एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत बोगस अर्जांचा प्रकार समोर आल्याने महिला व बाल विकास विभागाने आता विविध वर्गांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी काढून घेतली आहे. आता हे अर्ज स्वीकारण्याचे अधिकार केवळ अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याशिवाय कोणाकडेही अर्ज भरता येणार नाहीत.

‘लाडकी बहीण योजनें’तर्गत ११ प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यात नागरी व ग्रामीण भागांतील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक-सीआरपी (एनयूएम, एमएसआरएलएम), मदत कक्षप्रमुख, सीएमएम, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि ‘आपले सरकार सेवा केंद्र’ यांचा समावेश आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात सुमारे साडेअठरा लाख आणि राज्यात सुमारे दोन कोटी ४० लाखांहून अधिक अर्ज भरण्यात आले

सातारा जिल्ह्यातील लाभार्थ्याने २८ अर्ज दाखल केल्याचा प्रकार समोर आला. त्यातून त्यांनी जास्त रक्कम लाटण्याचे ‘उद्योग’ केले. या प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आणखी एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आहे तरी काय?
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काय आहे, या योजनेच्या लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो, आणि त्याच्यासाठी प्रक्रिया काय आहे आणि कोणते डॉक्युमेंट, हमीपत्र या योजनेसाठी आपल्याला लागेल याची सविस्तर माहिती सरकारने योजने संदर्भातील शासन निर्णय जाहीर केला आहे.

योजनेचे उद्दिष्ट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनचे मुख्य उद्दिष्ट महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेही उद्दिष्ट आहे.
पात्रतेची वयोमर्यादा : 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महाराष्ट्रांतील महिला

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभ कोणाला ?
माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे. यासाठी डोमेसाइल असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्यातील विवाहित,विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला यासाठी पात्र ठरू शकतात.
महिलाचे किमान वय 21 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त वय 65 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

 

Leave a Comment