मुंबई उच्च न्यायालायात नोकरीची संधी !

मुंबई उच्च न्यायालायात नोकरीची संधी !

Mumbai HighCourt Recruitment 2024 :

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात मॅरेज कौन्सिलर या पदासाठीच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून एकूण ३१ जागांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी ईच्छुक आणि पात्र उमेदवाराने १ ऑगस्ट २०२४ पूर्वी अर्ज सादर करायचा आहे.

पद : मॅरेज कौन्सिलर – ३१ जागा

शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून समाजसेवेमधून पदव्युत्तर पदवी संपादन केलेली असावी,

उमेदवाराला किमान २ वर्षाचा फॅमिली कौन्सिलिंग चा अनुभव असला पाहिजे,

उमेदवाराकडे संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
उमेदवारासाठीची वयोमर्यादा ही जास्तीजास्त ४० वर्षे असेल. मागासवर्गीय उमेदवारासाठी वयोमर्यादा ही ४५ वर्षे ठेवण्यात आली आहे.

वेतन
या भरतीप्रक्रिये द्वारे निवड झालेल्या उमेदवारास उत्तम वेतन मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारास ५६ हजार १०० रुपये ते तब्बल १ लाख ७७ हजार ५०० रुपये एवढे दर महिना वेतन देण्यात येणार आहे.

अर्जाची पध्दत आणि अर्जाचा पत्ता
उमेदवाराने अर्ज सादर करताना ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. जे अर्ज केवळ स्पीड पोस्टाने पाठवायचे आहेत. दिनांक १ ऑगस्ट २०२४ पूर्वी उमेदवाराचे अर्ज हे Registrar (Inspection-I), High Court Affiliate Side, Bombay या पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रासहित सादर करणे बंधनकारक असेल.

अर्जासोबत लागणारी कागदपत्रे
शैक्षणिक कागदपत्रे, शैक्षणिक गुणपत्रके, जन्म तारखेचा पुरावा, अपंग उमेदवारसाठी अपंग प्रमाणपत्र, मागासवर्गीय उमेदवारासाठी जातीचे प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.

उमेदवारासाठी महत्वाच्या सूचना

  • अर्जाची पडताळणी केली जाईल.
  • उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले जाईल, त्यानंतर उमेदवाराची शॉर्टलिस्ट जाहीर केली जाईल.त्या शॉर्ट लिस्टमध्ये निवड झालेल्या उमेदवाराची नावे असतील.
  • उमेदवाराला या नोकरीकरिता दोन वर्षाचा प्रोबोशन पिरेड ठेवण्यात आलेला आहे.
  • जर उमेदवाराने दोन वर्षाचा प्रोबेशन पिरेड पूर्ण केला तर त्यांना मुंबई उच्च न्यायालयात कायमस्वरूपी नोकरी करण्याचा अधिकार मिळणार आहे.

Leave a Comment

9163