मुंबईत नोकरी पण मराठी माणसाला ‘नो एन्ट्री महाराष्ट्रात संताप !
MumbaMumbai Job Advertis i Job Advertis : इंडीड जॉब या वेब पोर्टरवरील प्रोडक्शन मॅनेजर ही जागा भरण्यासाठी केलेली जाहिरात (Mumbai Job Advertis ) वादग्रस्त ठरली आहे. या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असं म्हटलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झालाय.
इंडीड जॉब या वेब पोर्टरवरील प्रोडक्शन मॅनेजर ही जागा भरण्यासाठी केलेली जाहिरात (Mumbai Job Advertis) वादग्रस्त ठरली आहे. या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असं म्हटलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झालाय. इंडीड जॉब ही जाहिरात सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालीये. मुंबईच्या मरोळ एमआयडीसी (Marol MIDC) येथे आर्या गोल्ड या कंपनीत प्रोडक्शन मॅनेजरची जागा असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, मराठी माणसाने अर्ज करु नये, असे म्हटल्याने महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला आता यानंतर कंपनीला उपरती झाल्यानंतर जाहिरातीत बदल केला असल्याचे दिसून येत आहे
दरम्यान, मराठी माणसाला ‘नो एन्ट्री’ असल्याची माहिती मिळताच मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे कंपनीमध्ये दाखल झाले आहेत. मराठी माणसाला ‘नो एन्ट्री’ म्हटल्यामुळे मनसे (MNS) आक्रमक झाली आहे. या जाहिरातीची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झाली असून मनसेचे नेते राज पार्टे कामगार नेते हे आर्या गोल्ड कंपनीच्या परिसरात दाखल झाले आहेत. शिवाय मनसे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) देखील या कंपनीमध्ये येणार आहेत. मनसे कार्यकर्ते कंपनीमध्ये दाखल होताच पोलिसांचा कंपनीमध्ये मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.
मनसे आक्रमक होताच कंपनीने पोलीस बंदोबस्त वाढवला
मनसे नेते आक्रमक झालेले पाहाताच आर्या गोल्ड कंपनी बाहेर शंभर ते दीडशे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ता आर्या गोल्ड कंपनीमध्ये दाखल झाले आहेत. यापूर्वी गिरगावमध्येही अशाच जाहिरातीमुळे मोठा वाद झाला होता. त्या जाहिरातीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. त्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.