PM आवास योजनेतील घरांच्या किंमतीत वाढ !
Mumbai Mahada :
मुंबईत सध्याच्या घडीला घर घेणे म्हणजे खूप जोखमीचे झाले आहे. कारण मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा स्थितीत मुंबईत घर घेणाऱ्यांकरिता आशेचा किरण म्हणजे म्हाडाची सोडत. म्हाडामधून कमी किमतीत घरं उपलब्ध करून दिली जातात. यावर्षीची मुंबई येथील सोडत अवघ्या काही दिवसांत निघण्याची शक्यता आहे. ही सोडत दोन हजार घरांसाठी असेल असे सांगण्यात येत आहे. मात्र कमी किमतीतल्या घरांच्या ऐवजी म्हाडाची घरे महागली आहेत का ? शिवाय कमी उत्पन्न असलेल्या घरांच्या किंमतीत वाढ आणि पॉश घरांच्या किंमती मात्र जैसे थे असल्याचा (Mumbai Mhada) असा सवाल ‘सामना’ मधून उपस्थित करण्यात आलाय
यंदाच्या म्हाडाच्या लॉटरी मध्ये मागील लॉटरी मधील शिल्लक घरांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गोरेगावच्या पंतप्रधान आवास योजनेतील शिल्लक घरांच्या किमती यंदा सव्वा चार लाख रुपयांनी मागणार आहेत. तर कन्नमवार नगर मधील अत्यल्प गटाच्या घरांसाठी देखील लाखभर रुपये जास्त मोजावे लागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जुहू आणि ताडदेव मधील पॉश घरांच्या किमती गतवर्षी एवढीच (Mumbai Mhada) असल्याची माहिती सूत्राने दिली असल्याचा वृत्तपत्रातून मध्ये म्हंटले आहे.