NABARD मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी !

NABARD मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी !

NABARD Recruitment 2024 : नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (NABARD) ने भरती प्रक्रियेला सुरवात केली आहे. भरती ग्रेड A असिस्टंटच्या पदासाठी केली जाणार असून इच्छुक उमेदवाराला NABARD च्या अधिकृत साईटवरून ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येणार आहे. एकूण १०२ पदांसाठी भरती केली जाणार असून रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी चालून आली आहे असे म्हंटले तरी वावगं ठरणार नाही. जर तुम्ही या कामासाठी इच्छुक असाल तर NABARD च्या ऑफिसिअल वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. तेथेच रिक्त पदांसंबंधित अधिक माहिती मिळून जाईल.

NABARD ने भरतीसाठी १ जुलै २०२४ नुसार, २१ ते ३० आयु असलेल्या उमेदवारांनाच पात्र करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे उमेदवाराची वयोमर्यादा ३० असावी तर उमेदवार १ जुलै २०२४ तारखेपर्यंत २१ वर्ष पूर्ण असावा. रिझर्व्ह कॅटेगरीत बसणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत ठरावीक सूट दिली जाईल. विविध पदांसाठी NABARD ने अर्ज प्रक्रिया सुरु केली असून ऑगस्टच्या १५ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे असे आश्वासन NABARD ने दिले आहेत. जर उमेदवार एससी, एसटी किंवा पीडब्ल्यूबीडी प्रवर्गातील असेल तर त्याला अर्जशुल्क म्हणून १५० रुपयांचे भुगतान करावे लागेल तर इतर उमेदवारांसाठी अर्जशुल्क ८५० रुपये आहेत.

चार टप्प्यामध्ये निवड प्रक्रिया पार पडली जाईल. सर्वप्रथम इच्छुक उमेदवारास NABARD च्या अधिकृत साईट nabard.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल. यानंतर उमेदवाराची २०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये उत्तिरेन विद्यार्थ्यांची २०० मार्कांसाठी मुख्य परीक्षा घेतली जाईल. पुढे सायकोमेट्रिक परीक्षा घेण्यात येईल जी ९० मिनिटांची असेल. शेवटी मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड करण्यात येईल.

 

Leave a Comment

9163