NADP नागपूरमध्ये प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर पदासाठी रिक्त जागा !
NADP Nagpur Recruitment 2024 :
एनएडीपी नागपूर येथे प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर या पदांसाठी रिक्त जागा असून त्यासाठी भरती सुरू झाली आहे. दिनांक ४ ऑगस्ट २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज सादर करू शकतात. प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर या दोन्ही पदांसाठी कोणते अर्ज भरायचे आहेत तसेच या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्या पात्रतेच्या निकषांची आवश्यकता आहे. यासंबंधीचे अधिक तपशील जाणून घेऊ.
नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स प्रोडक्शन म्हणजेच NADP मध्ये काही पदांच्या जागा या रिक्त आहेत व त्यासाठी भरतीची घोषणा केली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने त्यांचे अर्ज जमा करून या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. एनएडीपी नागपूर येथे सुरू असलेली ही भरती प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर या दोन पदांसाठी आहे. या पदांवर रुजू होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक ४ ऑगस्ट २०२४ पर्यंत जमा करायचे आहेत. त्यानंतर अर्ज जमा केल्यास उमेदवार भरतीसाठी पात्र ठरणार नाही.
प्रोफेसर पदासाठी असलेले रिक्त जागा ही ऑपरेशन या विषयातील प्रोफेसर म्हणून असेल. असोसिएट प्रोफेसर ही रिक्त जागा जनरल मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजी या विषयासाठी आहे. नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स प्रोडक्शन नागपूर यांच्यातर्फे असलेल्या या भरतीतून त्या त्या पदांसाठी असलेल्या या भरतीतून निवड झाल्यानंतर उमेदवार नोकरीवर रुजू होऊ शकतो.
ह्या दोन्ही पदांसाठीची नेमणूक ही कंत्राटी पद्धतीने केली जाईल. उमेदवार हा एका वर्षासाठी एन ए डी पी नागपूर यांच्यासोबत प्रोफेसर किंवा असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत असेल. उमेदवाराचा त्याच्या कार्यकाळातील परफॉर्मन्स आणि त्याची एकूणच गुणवत्ता यांची पारख करून पुढे आणखी एका वर्षासाठी हे कंत्राट वाढवले जाऊ शकते.
NADP Nagpur Eligibility Criteria पात्रतेचे निकष:
- संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण
Ph.D. पदवी - शिकवणे, संशोधन यासंबंधी कामातील १० वर्षांचा अनुभव
- साहाय्यक प्राध्यापक म्हणून ३ वर्षांचा अनुभव
- कमीत कमी ६ संशोधन पत्रिका (प्रकाशित)
- कमीत कमी २ Ph.D. धारकांसाठी मार्गदर्शक म्हणून अनुभव
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरतेवेळी पात्रतेषण एकषांमध्ये जे मुद्दे नमूद केलेले आहेत त्या संदर्भातील उपलब्ध पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. उमेदवाराचा फोटो, रेझ्यूमे तसेच येथे विचारण्यात आलेल्या इतर गुणपत्रिका कागदपत्रे हे सर्व जोडून मगच अर्ज जमा करावा. नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स प्रोडक्शन नागपूर यांच्याविषयीची अधिक माहिती https://ddpdoo.gov.in/units/NADP या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर वाचता येईल.