Nashik Mahanagarpalika Bharti 2022

Nashik Mahanagarpalika Bharti 2022 – Department of Public Health, Nashik under Nashik Mahanagarpalika has issued recruitment notification. Nashik Municipal corporation invites applications to fill 01 vacant posts of Public Relations Officer. Candidates who wish to apply here need to send their application at mentioned address under Nashik Municipal Corporation Recruitment 2022. Candidates can send their application on or before 25 April 2022 . Additional details about Nashik Mahanagarpalika Bharti 2022, Nashik Mahanagarpalika Recruitment 2022, Nashik Municipal Corporation Job Vacancy 2022, nmc.gov.in recruitment 2022, NMC Nashik Recruitment 2022 Notification are as given below:

Nashik Mahanagarpalika Recruitment 2022 नाशिक महानगरपालिका द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे  जनसंपर्क अधिकारी पदाच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

Nashik Municipal Corporation Job Vacancy 2022

 • पदाचे नाव –जनसंपर्क अधिकारी
 • शैक्षणिक पात्रता – Graduate in any discipline
 • पद संख्या – 01 जागा
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2022
 • नोकरीचे ठिकाण – नाशिक
 • वयोमर्यादा – 45 ते 65 वर्षे
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – मा. आयुक्त, नाशिक महानगरपालिका
 • अधिकृत वेबसाईट – www.nmc.gov.in

रिक्त पदांची तपशील – NMC Nashik Recruitment 2022 Notification

How to Apply For Nashik Municipal Corporation Bharti 2022

 • Applicants apply offline mode for NMC Nashik Vacancy 2022
 • Interested and eligible applicants can send your application to the given
 • Prescribe application format should get filled with all require details
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Nashik Mahanagarpalika Recruitment 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

महापालिकेत ३४८ रिक्त पदे भरण्यास मान्यता । भरती लवकरच अपेक्षित 

Nashik Mahanagarpalika Bharti 2022 – The approval of the Ministry of Housing and Urban Affairs to fill 348 vacancies in the medical department of the Municipal Corporation will help to solve the problem of filling up vacancies for many years as well as the new posts submitted to the state government. After the establishment of NMC, 7,082 posts in various categories have been sanctioned according to the population and the status of ‘C’ category in NMC. But in twelve years, a large number of these posts became vacant. Government permission is required to fill vacancies. However, vacancies can be filled only if the establishment cost is below 35%

महानगरपालिका लेखी परीक्षा अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर सरावासाठी उपलब्ध आहे. तसेच मोफत टेस्ट सिरीज साठी उमेदवारांनी प्लेस्टोर वर “महाभरती एक्साम” (MahaBharti Exam) हि अँप मोफत डाउनलोड आणि रजिस्टर करून रोज मोफत  टेस्ट सिरीज सोडवावी. 

✅सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!!

महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील(medical Department) ३४८ रिक्त पदे भरण्यास नगरविकास विभागाने मान्यता (Ministry of Housing and Urban Affairs)दिल्याने अनेक वर्षांपासूनचा रिक्त पदाच्या भरतीचा तसेच यापूर्वी राज्य शासनाला सादर करण्यात आलेल्या नवीन पदांच्या आकृतिबंधाचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे.

महापालिकेच्या स्थापनेनंतर लोकसंख्या व महापालिकेला असलेल्या ‘क’ वर्गाच्या दर्जानुसार विविध संवर्गातील सात हजार ८२ पदे मंजूर आहेत. परंतु बारा वर्षांत मोठ्या प्रमाणात यातील पदे रिक्त झाली. रिक्त पदे भरताना शासनाची परवानगी आवश्‍यक असते. परंतु आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या खाली असेल तरच रिक्त पदे भरता येतील, असा शासनाचा नियम असल्याने पदे भरता आली नाही.

पाच-सहा वर्षांपूर्वी महापालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याने चौदा हजार पदांचा नवीन आकृतिबंध शासनाला सादर करण्यात आला. परंतु, अद्यापही आकृतिबंध शासन मान्यतेसाठी प्रलंबित आहे. पूर्वीच्या ४१७ पदे व नवीन ६३५ अशा एक हजार ५२ पदांना राज्य शासनाने मध्यंतरीच्या काळात मंजुरी दिली. परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय व अग्निशमन या विभागातील अत्यावश्‍यक पदांना मान्यता देण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ८ डिसेंबर २०२१ ला महापालिकेला पत्र देत वैद्यकीय विभागातील ३४८ पदांच्या भरतीसाठी परवानगी दिली. यात आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्यात आली. त्याशिवाय ३ जानेवारी २०२२ ला उर्वरित विविध विभागाच्या ५२७ पदांची माहितीही पाठविण्याच्या सूचना देण्यात आला.


“या” महापालिकेतील अग्निशमन व वैद्यकीय विभागातील मानधनावरील भरतीस नकार !! जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स 

Nashik Mahanagarpalika Bharti 2022 –  The ruling BJP had decided to hire NMC employees on honorarium in the special general body meeting in November as the services and facilities provided to Nashik residents are under stress due to insufficient manpower. With 695 posts newly sanctioned by the government, out of a total of 7717 sanctioned posts in various categories, 2632 posts are vacant in NMC. However, as the establishment cost of NMC has reached 41 per cent and earlier the posts in the fire and medical departments were rejected on the issue of establishment cost, it has become clear that the recruitment on honorarium will get a red signal from the government again.

Nashik Mahanagarpalika Bharti 2022 Latest Update

महापालिकेतील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी मानधनावरील नोकरभरतीच्या प्रस्तावाला महापालिकेतील(Municipal Corporation) सत्तारूढ भाजपने (BJP)महासभेत हिरवा कंदील दाखविला असला तरी वाढत्या आस्थापना खर्चाच्या मुद्द्यावरून मानधन भरतीचा चेंडू शासनाच्या कोर्टात(Court) पाठविण्यात आला आहे.

परंतु, महापालिकेचा आस्थापना खर्च ४१ टक्क्यांपर्यंत पोचल्याने व यापूर्वी अग्निशमन व वैद्यकीय विभागातील पदे आस्थापना खर्चाच्या मुद्द्यावरून भरतीस नकार दिल्याने पुन्हा मानधनावरील भरतीला शासनाकडून रेड सिग्नल मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

NMC Nashik Recruitment 2022

अपुऱ्या मनुष्यबळामुळे नाशिककरांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा- सुविधांवर ताण पडत असल्याने महापालिकेत मानधनावर नोकरभरती करण्याचा निर्णय सत्तारूढ भाजपने नोव्हेंबरच्या विशेष महासभेत घेतला होता. शासनाने नव्याने मंजूर केलेल्या ६९५ पदासह महापालिकेत विविध संवर्गातील एकूण ७७१७ मंजूर पदांपैकी २६३२ पदे रिक्त असल्याने कामकाजावर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनीदेखील प्रस्तावाला विरोध दर्शविला नव्हता. त्याशिवाय मानधनावर नोकर भरतीचा प्रस्ताव ठेवताना आयुक्तांकडून अर्थात प्रशासनाकडून येणे आवश्‍यक होते. परंतु, नगरसेवकांकडून प्रस्ताव ठेवण्यात आल्याने अशासकीय स्वरूप प्राप्त झाले होते. तेव्हाच प्रस्तावाच्या भवितव्याबद्दल साशंकता होती. परंतु, भाजपने प्रशासनाकडे ठराव पाठवून चेंडू टोलवला. प्रशासनानेदेखील शासन मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविल्याने आता शासनाच्या हाती मानधन भरतीचे भवितव्य राहणार आहे.

वैद्यकीय, अग्निशमनसाठी फेरप्रस्ताव

राज्य शासनाने कोविड व तातडीची बाब म्हणून वैद्यकीय, अग्निशमन विभागातील ६८० पदे भरण्यास मंजुरी दिली, परंतु त्यासाठी अटी व शर्ती टाकण्यात आल्या आहेत. त्यात पुन्हा आस्थापना खर्चाची अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे वैद्यकीय व अग्निशमन भरतीच्या प्रस्तावाची जी अवस्था झाली तीच अवस्था मानधनावरील भरतीची होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

निवडणुकीत गाजणार मुद्दा

मनुष्यबळाची कमतरता असल्याने महापालिकेचे कामकाज चालविणे मुश्‍कील झाले आहे. त्यामुळे भाजपने मानधन भरतीचा पर्याय स्वीकारला, परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून प्रस्तावाला मान्यता दिली जात नाही. हा मुद्दा निवडणुकीत भाजपकडून उपस्थित केला जाण्याची दाट शक्यता आहे.

 


Nashik Mahanagarpalika Bharti 2022 – Although the general body has approved the unofficial proposal to recruit staff on honorarium in the municipal corporation, as the establishment cost has reached over 38%, the administration will be sent for the approval of the state government after receiving the resolution. Earlier, due to rising costs, a new layout of medical, fire and 14,000 seats has been submitted to the government. While that report is still pending, the recruitment will remain on paper as there will be nothing new in the honorarium recruitment proposal approved by the General Assembly.

महापालिकेत मानधनावर कर्मचारी भरती करण्याचा अशासकीय प्रस्ताव महासभेने मंजूर केला असला तरी आस्थापना खर्च ३८ टक्क्यांच्या वर पोचला असल्याने प्रशासनाला ठराव प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. यापूर्वी वाढत्या खर्चामुळे शासनाकडे वैद्यकीय, अग्निशमन, तसेच चौदा हजार जागांचा नवा आकृतिबंध शासनाला सादर करण्यात आला आहे. तो अहवाल अद्याप प्रलंबित असताना महासभेने मंजूर केलेल्या मानधन कर्मचारी भरती प्रस्तावात नवीन काही होणार नसल्याने भरती कागदावरच राहणार आहे.

गेल्या चोवीस वर्षात महापालिकेत भरती झाली नाही. या दरम्यान शहराचा विस्तार व लोकसंख्या वाढल्याने पायाभूत सुविधा पुरविण्यावर, तसेच सेवा देताना मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला आहे. मनुष्यबळाअभावी उपलब्ध कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेत मानधनावर कर्मचारी भरती करण्याचा निर्णय सत्तारूढ भाजपने बुधवारी (ता .१७) विशेष महासभेत घेतला. वैद्यकीय व अग्निशमन विभागाच्या मंजूर ६९५ पदासह विविध संवर्गातील एकूण ७, ७१७ मंजूर पदांपैकी २, ६३२ पदे रिक्त आहेत.

रिक्तपदांची भरती करण्यासाठी शासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. नियमानुसार आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या आत असेल तरच रिक्तपदांची भरती करता येते. ही बाब प्रशासनाला माहिती असल्याने प्रशासनाने मानधनावर पदे भरण्याचा प्रस्ताव सादर केला नाही. स्थायी समितीच्या पाच सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार महासभा बोलाविण्यात आली. प्रशासनाकडून वांरवार आस्थापना खर्चाची बाब निदर्शनास आणूनही प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यासंदर्भात आयुक्त जाधव यांनी पुन्हा भूमिका स्पष्ट केली. आस्थापना खर्च ३८. २१ टक्के असल्याने शासनाची मंजुरी आवश्‍यक आहे. महासभेचा ठराव प्राप्त झाल्यानंतर शासनाकडे पाठविला जाणार आहे. भरती करायचीच ठरल्यास आयुक्तांच्या अधिकारात सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ करता येणार नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

कर्मचारी भरतीत भारतीय हाच एकमेव निकष

आस्थापना खर्चाच्या मर्यादेवरून महासभेने मंजुरी दिलेली मानधनावरील कर्मचारी भरती होईल किंवा नाही, याबाबत अस्पष्टता आहे. परंतु, कायद्यातील पळवाटा शोधून भरती झाल्यास नियमानुसार सेवा व शर्ती नियमांचे पालन करण्याबरोबरच जाहिरातीच्या माध्यमातूनच उमेदवारांकडून अर्ज मागवावे लागणार आहेत. अर्ज मागविताना भूमिपुत्र हा निकष लावता येणार नाही. त्यामुळे देशभरातील कुठल्याही व्यक्तीला भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. भूमिपुत्र निकष लावल्यास देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का पोचून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शहराचा विस्तार व लोकसंख्या वाढत असल्याने कामकाजावर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला आहे. त्याव्यतिरिक्त दरमहा निवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने महापालिकेमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुविधांवर ताण येत आहे. त्यामुळे मानधनावर कर्मचारी भरतीची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली. नव्याने मंजूर केलेल्या ६९५ पदांसह विविध संवर्गातील एकूण सात हजार ७१७ मंजूर पदांपैकी दोन हजार ६३२ पदे रिक्त असल्याने सर्व सरळसेवा भरतीमधील रिक्त पदे भरण्यास महासभेत मान्यता देण्यात आली. मानधनावर कर्मचारी भरतीच्या प्रस्तावाला मंजुरी देताना सर्वच नगरसेवकांनी स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याची मागणी केली.


Nashik Mahanagarpalika Bharti 2021 : NMC decided to recruit on honorarium basis for about 3000 vacancies in various NMC establishments. The proposal was approved in a special general meeting held on Wednesday (Dec. 18) under the chairmanship of Mayor Satish Kulkarni.

महापालिकेच्या विविध आस्थापनांमधील रिक्त असलेल्या सुमारे ३ हजार जागांसाठी मानधन तत्त्वावर भरती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (दि.१८) झालेल्या विशेष महासभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

मात्र, या भरती प्रक्रियेच्या आडून भाजप राजकारण करत असल्याचं सांगत विरोधकांनी या प्रस्तावाचा कडाडून निषेध केला.

महापालिकेचे कामकाज सध्या कंत्राटी कर्मचार्‍यांच्या भरवशावर सुरू आहे. १९९८ पासून महापालिकेने भरती केलेली नाही. त्यामुळे ही भरती आवश्यक असल्याचं महापौर कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं. तत्पूर्वी, विविध विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागात ७९७ घंटागाडी कर्मचारी व सुमारे ७०० स्वच्छता कर्मचारी, तर आरोग्य विभागात एकूण ३७१८ कर्मचार्‍यांची आवश्यकता असल्याची माहिती डॉ.आवेश पलोड यांनी सभागृहात दिली. शिक्षण विभागात एकही कंत्राटी कर्मचारी नसून, २०१७ च्या संच मान्यतेनुसार १९३ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. एकूणच, महापालिकेतील विविध संवर्गात सुमारे तीन हजार जागा रिक्त आहेत. त्यासाठी मानधन तत्त्वावर ही भरती प्रक्रिया आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केली जाणार आहे.

वॉटरग्रेसच्या ठेकेदाराचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर

शहरातील स्वच्छतेचा ठेका असलेल्या वॉटरग्रेस कंपनीच्या ठेकेदाराने मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा प्रकार महासभेदरम्यान पुढे आला. ठेकेदाराने त्याच्याकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात हा भ्रष्टाचार केला असून, यासंदर्भातला अहवाल पुढच्या महासभेत सादर केला जाणार आहे.


नाशिक महानगरपालिका मध्ये नवीन पदभरती सुरु; अभियंता पदांवर थेट मुलाखत 

Nashik Mahanagarpalika Bharti 2021 – Department of Public Health, Nashik under Nashik Mahanagarpalika has issued recruitment notification. Nashik Municipal corporation invites applications to fill 02 vacant posts of Bio Medical Engineer. Candidates who wish to apply here need to attend walk in interview at mentioned address under Nashik Municipal Corporation Recruitment 2021. Candidates Must be present for the interview on 9th November 2021. Additional details about Nashik Mahanagarpalika Bharti 2021 are as given below:

Nashik Mahanagarpalika Recruitment 2021 नाशिक महानगरपालिका द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे जैव वैद्यकीय अभियंता पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा… सरकारी नोकरीचे रोजगार वार्तापत्र-लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

 • पदाचे नाव –जैव वैद्यकीय अभियंता
 • पद संख्या – 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
 • नोकरी ठिकाण – नाशिक
 • पगार – रु 30,000/-
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीची तारीख –09 नोव्हेंबर 2021
 • मुलाखतीचा पत्ता – नाशिक महानगर पालिका, नाशिक
 • अधिकृत वेबसाईट – https://nmc.gov.in/

Important For Nashik Mahanagarpalika Recruitment 2021 

 1. Candidate need to read the official notification.
 2. Candidate after reading official notification note down the dates of interview and time.
 3. Then prepare for interview and practice for interview.
 4. Candidate have advice read the document paragraph in official notification and take this document and also Xerox copy of this document take with you when you go to interview.

रिक्त पदांचा तपशील – NMC Nashik Vacancy 2021

Bio Medical Engineer  02 Posts

 

Educational Qualification For Nashik Mahanagarpalika Bharti 2021 

 1. Bachelor in Bio Medical Engineering

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NMC Nashik Bharti 2021

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


 खुशखबर !! पुढील महिन्यात नाशिक महानगरपालिकेत ६०० कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी भरती 

Nashik Mahanagarpalika Bharti 2021 – Great News !! Candidates who are searching job in Nashik Municipal Corporation, the wait is over!!  As  Mahanagarpalika will soon starts recruitment process for 600 vacant posts in next month. So be ready for NMC Mega Recruitment and read below article for more information…

खुशखबर !! दीड महिन्यांपूर्वी राज्य शासनाने नाशिक महानगरपालिकेच्या ६०० पदांच्या भरतीसाठी मंजुरी दिली होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पुढील महिन्यात हि पदभरती प्रक्रिया सुरू केली जाईल.मनुष्यबळाची अडचण पूर्ण करण्यासाठी पालिका वैद्यकीय विभागातील हि पदे कायमस्वरूपी भरणार असून आतापसूनच महानगरपालिकेने तयारी सुरू केली आहे …

Nashik Mahanagarpalika Bharti 2021

Leave a Comment