NCERT मध्ये प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर तसेच असोसिएट प्रोफेसर ची भरती सुरु !

NCERT मध्ये प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर तसेच असोसिएट प्रोफेसर ची भरती सुरु !

NCERT Recruitment 2024 :

NCERT ने प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर तसेच असोसिएट प्रोफेसर विविध जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार ऑगस्टच्या १६ तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने प्रोफेसर पदातील विविध जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर तसेच असोसिएट प्रोफेसर पदातील रिक्त जागांसाठी अर्ज करता येऊ शकणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार ऑगस्टच्या १६ तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. यानंतर अर्ज करण्याची मुदत संपणार असल्यामुळे वेळेअगोदर अर्ज करण्याचे निर्देश NCERT ने जारी केले आहेत.

एकूण १२३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली असून जर तुम्ही NCERT मध्ये काम करण्यास इच्छुक असाल तर या संधीचे सोने करा. अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना NCERT च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दयावे लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असल्यामुळे ncert.nic.in या वेब साईटवर जाऊन अप्लाय करता येणार आहे.

या भरती प्रक्रियेत असिस्टंट प्रोफेसर पदासाठी ३२ जागा शिल्लक आहेत. असोसिएट प्रोफेसर पदासाठी ५८ जागा तर प्रोफेसर पदासाठी 33 जागा रिक्त आहेत, एकूण १२३ पदांची भरती करण्यात येणार आहे. निवड प्रक्रियेत मुलाखत आणि दस्तावेजांच्या तपासणीचा समावेश आहे. मुलाखतीच्या तसेच दस्तावेजांच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.

विविध पदांसाठी पगाराची संख्या वेगवगेळी आहे. प्रोफेसर पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमाह वेतन १,४४,२०० रुपये इतके मिळेल, तर असोसिएट प्रोफेसर पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला १,३१,४०० रुपये दरमाह वेतन म्हणून दिले जाईल. असिस्टंट प्रोफेसर आणि असिस्टंट लायब्रेरियनच्या पदासाठी दरमाह वेतन ५७,७०० रुपये आहे.

अर्ज करण्याची सगळ्यात मुख्य बाब म्हणजे अर्ज ncert.nic.in वर करता येणार आहे. एसटी/ एससी/ पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना अर्जशुल्क माफ असून इतर प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये अर्जशुल्क म्ह्णून भरावे लागणार आहे.

 

Leave a Comment