NEET PG 2024 Date नीट पीजी परीक्षा ११ ऑगस्टला !

NEET PG 2024 Date नीट पीजी परीक्षा ११ ऑगस्टला !

NEET PG 2024 Date :

नीट पीजी २०२४ परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून सादर परीक्षा ११ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळ आणि दुपार अशा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. नॅनॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस म्हणजेच NBEMS ने परीक्षेची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार NEET PG च्या अधिकृत वेबसाइट nbe.edu.in ला भेट देऊन सूचना पाहू शकता.

पदव्युत्तर मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलाय जाणाऱ्या NEET PG परीक्षेबाबत एक महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस म्हणजेच NBEMS च्या वतीने नुकतीच या परीक्षेच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. NBE ने दिलेल्या माहितीनुसार, NEET PG 2024 परीक्षा रविवार, ११ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. या दिवशी NEET PG परीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. ही परीक्षा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) CBT मोडमध्ये आयोजित करेल.

दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणाऱ्या NEET PG परीक्षेशी संबंधित अधिक माहिती लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर दिली जाईल.ज्या उमेदवारांनी पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET PG) साठी अर्ज केला होता आणि २३ जून रोजी परीक्षेला बसायचे होते ते NBE च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नवीन परीक्षेच्या तारखेची सूचना तपासू शकतात.

Leave a Comment