NHM Nandurbar येथे १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी !
NHM Nandurbar Recruitment 2024 :
नंदुरबार येथील राष्ट्रीय आरोग्य अभियानात २४ रिक्त पदांसाठी भरती सुरू. वय वर्ष १८ आणि त्यावरील सर्व उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. कीटक शास्त्रज्ञ पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट आणि लॅब टेक्निशियन या तीन पदांसाठी ही भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी दिनांक १६ ऑगस्ट २०२४ ही शेवटची तारीख आहे
पद आणि त्यानुसार रिक्त जागा
- कीटक शास्त्रज्ञ – ०६ रिक्त जागा
- पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट – ०६ रिक्त जागा
- लॅब टेक्निशियन – १२ रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
- कीटक शास्त्रज्ञ
- झूलॉजी विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणे आवश्यक
- कामाचा अनुभव असणे आवश्यक
- पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट
- वैद्यकीय पदवी सोबत MPH / MHA / MBA उत्तीर्ण असणे आवश्यक.
लॅब टेक्निशियन
- १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
- पद आणि त्यानुसार वेतन
- कीटक शास्त्रज्ञ – ४०,०००/- दर महिना
- पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट – ३५,०००/- दर महिना
- लॅब टेक्निशियन – १७,०००/- दर महिना
अर्ज करतेवेळी अर्जासोबत ही कागदपत्रे जोडणे आवश्यक:
- भरतीसाठीचा अर्ज
- वयाचा पुरावा
- पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाची सर्व वर्षांची प्रमाणपत्रे
- गुणपत्रिका
- कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
- शासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र, नियुक्ती प्राधिकार्याच्या आदेशाच्या प्रतिसह
जात प्रमाणपत्र
राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार येथे सुरू असलेल्या या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया दिनांक ८ ऑगस्ट २०२४ पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने सादर करू शकतात. दिनांक १६ ऑगस्ट २०२४ नंतर जमा झालेला अर्ज या भरतीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.