NHPC मध्ये इंजिनियर्सना नोकरीची संधी!
NHPC Recruitment 2024 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अंतर्गत भरती मोहीम जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ‘ट्रेनी इंजिनीयर / ट्रेनी ऑफिसर्स’ पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने थेट http://www.nhpcindia.com या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ मार्च २०२४ असणार आहे.
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन भरती २०२४ साठी आवश्यक रिक्त पदे आणि पदसंख्या, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज कसा करावा याबाबतची माहिती जाणून घेऊ.
रिक्त पदे आणि पदसंख्या (Posts and No. of Posts) – नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने GATE २०२३ स्कोअरद्वारे २६९ जागेच्या ट्रेनी इंजिनीयर / ट्रेनी ऑफिसर्स पदासाठी अर्ज मागविले आहेत.
निवड प्रक्रिया (Selection Process) – उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये GATE २०२३ च्या पेपरमधील १०० पैकी गुण, गट चर्चा, वैयक्तिक मुलाखत आदींचा समावेश असेल.
अर्ज शुल्क (Application Fees) – यूआर/ ईडब्ल्यूएस/ ओबीसी (NCL) श्रेणीतील उमेदवारांना ६०० रुपये विनापरतीचे (नॉन-रिफंडेबल) शुल्क भरणे आवश्यक आहे. एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/माजी सैनिक/महिला श्रेणीतील उमेदवारांना नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही.
अर्ज कसा कराल ? How to apply :
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या http://www.nhpcindia.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होम पेजवर करिअर टॅबवर क्लिक करा.
पुढे, एनएचपीसी लिमिटेड ॲण्ड इट्स जॉईंट व्हेन्टचर (NHPC Limited and its Joint Venture)साठी GATE २०२३ स्कोअरद्वारे ‘ट्रेनी इंजिनीयर / ट्रेनी ऑफिसर्स’ पदासाठी भरतीची अधिसूचना वर क्लिक करा.
त्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करावी आणि अर्जासह पुढे जावे.
नंतर उमेदवारांनी अर्जाचा फॉर्म भरावा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
अर्ज जमा (Submit) करावा.
संदर्भासाठी या फॉर्मची एक प्रिंटआउटसुद्धा घ्यावी. अशा प्रकारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.