NMC नागपूर महानगरपालिकेत भरती !

NMC नागपूर महानगरपालिकेत भरती !

NMC Recruitment 2024 :

१० वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांकरिता नागपूर महानगरपालिकेत भरती सुरू आहे. ही भरती ३८ पदांसाठी आहे. दहावी उत्तीर्ण असलेल्यांसाठी महानगरपालिके तर्फे सुरू असलेली ही भरती फार महत्त्वाची असेल. जर इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेला किंवा पदवी शिक्षण पूर्ण केलेला उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होत असेल तर त्या उमेदवाराने या सर्व परीक्षांमध्ये उत्तीर्ण असल्याचे पुरावे अर्जात जोडणे आवश्यक आहे.

नागपूर महानगरपालिकेत ३८ जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने भरती जाहीर केली आहे. या भरतीत सहभागी होण्यासाठी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ फेरी पार पडेल. ही मुलाखत फेरी दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडेल. नागपूर महानगरपालिकेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या या भरतीतील ३८ जागा ह्या ब्रीडिंग चेकर या पदाच्या आहेत. यापदी रुजू झाल्यानंतर उमेदवार नागपूर येथे कार्यरत असतील.

पात्रतेचे निकष-
नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या ब्रीडिंग चेकर्स या पदासाठीच्या भरतीसाठी अर्ज करताना खालील अटी व नियम लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

शैक्षणिक पात्रता ब्रेडिंग चेकर्स या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नोकरीचा कालावधी
हे काम तात्पुरत्या स्वरूपाचे असेल, हे पुढील दोन महिने सुरू असेल.

अर्जदारासाठी वयोमर्यादा –
अर्जदाराचे किमान वय १८ वर्षे तर कमाल वय हे ४३ वर्षे असावे. १८ ते ४३ वर्षे यातील वय असलेला उमेदवार या भरतीसाठी पात्र असेल. नागपूर महानगरपालिकेतील ही पदे केवळ पुरुष उमेदवारांसाठी आहेत. या भरतीत महिला उमेदवार सहभाग घेता येणार नाही.

 

Leave a Comment