NPCIL मुंबई मध्ये ४०० पदांसाठी थेट भरती, सरकारी नोकरी करण्याची संधी !
NPCIL Mumbai Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता व्हा नो टेन्शन. थेट भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. विशेष म्हणजे केंद्र शासनाची बक्कळ पगारावाली नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. मग उशीर कशाला करता लगेचच करा अर्ज. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. विशेष म्हणजे आॅनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदाच्या रिक्त जागांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
रिक्त पदे आणि पदसंख्या : एक्झिक्युटिव्ह ट्रेनीया पदाच्या एकूण ४०० रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
१. केमिकल
२. इलेक्ट्रिकल
३. इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन
४. सिव्हिल आदी क्षेत्रांतील ही पदे आहेत.
वयोमर्यादा – एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षे यादरम्यान असावे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी संबंधित शाखेतून बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी. पदवीधर असणे आवश्यक आहे किंवा इन्स्टिट्यूटमधून इंडस्ट्रियल आणि फायर सेफ्टी विषयात किमान ६० टक्के गुण असावेत.
पगार – उमेदवारांना महिन्याला ५५ हजार रुपये पगार मिळेल.
अधिक माहितीसाठी PDF जाहिरात एकदा वाचून घ्यावी.
https://www.npcilcareers.co.in/ETHQ20243004/candidate/Default.aspx
उमेदवार थेट https://www.npcilcareers.co.in/MainSiten/DefaultInfo.aspx या लिंकवरून अर्ज करू शकतात.