NWCMC नांदेड वाघाळा महानगरपालिकेत भरती सुरू !

NWCMC नांदेड वाघाळा महानगरपालिकेत भरती सुरू !

NWCMC Recruitment 2024 :

नांदेड वाघाळा महानगरपालिकेत सिटी कोऑर्डिनेटर या पदासाठी भरती सुरू आहे. या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी २२ जुलै २०२४ पर्यंत नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या कार्यालयात त्यांचा अर्ज जमा करावा. सिटी कोऑर्डिनेटर या पदासाठी रुजू झाल्यानंतर त्या उमेदवाराला दर महिना ४५,०००/- इतके वेतन मिळविण्याची संधी आहे.

नांदेड वाघाळा महानगरपालिकेत भरती सुरू आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. ही भरती सिटी को-ऑर्डिनेटर म्हणजेच शहर समन्वयक या पदासाठी होणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या, अनुभवाच्या, वयोमर्यादेच्या अटी काय आहे ते पुढे जाणून घेऊ.

NWCMC Job Eligibility: काय असेल योग्यता

  • B.E. (शाखेचे बंधन नाही)
  • B.Tech (शाखेचे बंधन नाही)
  • B. Arch
  • BSc (शाखेचे बंधन नाही)
  • B. Planning

शैक्षणिक पात्रतेची अट पूर्ण करण्यासाठी वरती नमूद केलेल्या पदव्यांपैकी कोणत्याही पदवीचे पूर्ण शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.

Salary: नांदेड महानगरपालिकेतील शहर समन्वयक या पदावर रुजू होणाऱ्या उमेदवारांना दर महिना ४५,०००/- पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.

Age Limit and Experience : शहर समन्वयक या पदासाठी वयवर्ष ३५ पर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. जर अर्जदारांना शहर समन्वयक या पदाचा अनुभव असेल तर त्यांना त्यांच्या वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
स्थानिक स्वराज्य संस्थेत (नागरी) कार्यालयाशी निगडीत कामाचा किमान सहा महिन्यांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

How to Apply कसा करता येईल अर्ज :
नांदेड वाघाळा महानगरपालिकेत शहर समन्वयक या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १० जुलै २०२४ पासून सुरू झाली आहे. हा अर्ज सादर करण्यासाठी २२ जुलै २०२४ ही अंतिम तारीख असणार आहे. इच्छुक उमेदवारांना हा अर्ज नांदेड येथील महानगरपालिकेच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. हे पदावर होणारी नियुक्ती ही कंत्राटी तत्त्वावर असेल.

भरतीसाठीचे अर्ज पुढील पत्त्यावर ठरवून दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधी जमा करणे आवश्यक आहे:
स्वच्छ भारत अभियान, कक्ष क्रमांक ३०९, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, मुख्य प्रशासकीय इमारत, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, नांदेड.

इतर नोकरीच्या संधी आणि अधिक माहितीसाठी nwcmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Leave a Comment

9163