Nyay Sahayak Vaidnyanik Prayogshala Bharti 2021 – In maharashtra Forensic Department, there is almost 4000+ vacant posts to be filled. This vacancies is out of total sanctioned posts of 8236. So many candidates having Forensic Expert Degree are awaiting for Recruitment Process to be carried Out. Know More details when this recruitment process will start…?
राज्यात फॉरेन्सिक तज्ज्ञ म्हणून पदवी घेतलेले हजारो विद्यार्थी बेरोजगार आहेत. फॉरेन्सिक लॅब मध्ये एकूण आठ हजार २३६ पदे मंजूर असली तारील त्यातील चार हजारांच्या वर जागा रिक्त आहे. विविध ठिकाणच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये संध्या १ लाखाहून अधिक गुन्ह्यांमधील पुरावे विश्लेषणाच्या प्रतीक्षेत आहे. सविस्तर माहिती खाली वाचा….
राज्यात फॉरेन्सिक विभागातील रिक्त पदांच्या भरतीला मान्यता !! GR प्रकाशित
Nyay Sahayak Vaidnyanik Prayogshala Bharti 2021 – The state government has finally woken up to fill the vacancies of technicians of various ranks in the forensic lab working to investigate the scientific and technical evidence of the crime. 291 posts will be filled in the Directorate of Various Auxiliary Statutory Laboratories in the State. Out of which 187 posts will be filled through direct service and 104 posts will be filled through external system. Read More information about Nyay Sahayak Vaidnyanik Prayogshala Bharti 2021 at below
Nyay Sahayak Vaidnyanik Prayogshala Bharti 2021
गुन्ह्याच्या शास्त्रोक्त व तांत्रिक पुराव्याच्या तपासासाठी कार्यरत फॉरेन्सिक लॅबमधील विविध दर्जाची तंत्रज्ञांची रिक्त पदे भरण्याबाबत राज्य सरकारला अखेर जाग आली आहे. राज्यातील विविध न्याय सहायक वैधानिक प्रयोगशाळा संचालनालयात २९१ पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी १८७ पदे सरळ सेवेने तर १०४ जागा बाह्ययंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत.
पद भरतीबाबतच्या प्रलंबित प्रस्तावाला अखेर गृह विभागाने मान्यता दिली आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे राज्यभरातील साडे सहा हजार डीएनए चाचणीचे अहवाल रखडल्याचे ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले होते. त्याबाबत २२ व २३ सप्टेंबरला वृत्त प्रसिद्ध करून तंत्रज्ञांअभावी पोस्को व महिला अत्याचारासंबंधीचे गुन्हे प्रलंबित असल्याचे आकडेवारीनिशी मांडले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या गृह विभागाने त्याला मान्यता देऊन भरतीची कार्यवाही करण्याची सूचना संचालनालयाला केली आहे.
DFSL Bharti 2021
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना फॉरेन्सिक लॅबकडे अपुऱ्या अधिकारी व तंत्रज्ञ मनुष्यबळामुळे तब्बल ६,४५१ डीएनए तपासणीची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामध्ये महिलांवरील अत्याचार व पोक्सोच्या गुन्ह्यातील २२०० वर केसेसचा समावेश आहे. गेल्या ५ वर्षातील ही प्रकरणे असून त्याबाबतचा प्रस्ताव रखडल्याचे ‘लोकमत’ने मांडले होते. त्यानंतर सरकारने फॉरेन्सिक लॅबचे संचालक यांच्या ६ नोव्हेंबर २०२० च्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या नवीन पद भरतीसाठी वित्त विभागाने ३० जुलै रोजी मान्यता दिली होती. मात्र गृह विभागाकडून त्याचे अध्यादेश जारी करणे बाकी होते. मिळालेल्या माहितीनुसार या विभागात गट-अ ते गट -ड या संवर्गत सरळ सेवेतील एकूण ३३७ रिक्त पदे आहेत. त्यामध्ये १८७ पदे सरळ सेवेने भरली जाणार आहेत तर, १०४ जागा आऊट सोर्सिंगद्वारे भरण्याला शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे.
ही पदे भरली जाणार – Nyay Sahayak Vaidnyanik Prayogshala Recruitment 2021
पद भरतीला मान्यता दिलेल्या १८७ पदांमध्ये गट-अ मधील उपसंचालक-६,सहायक संचालक-१७, गट -ब मधील सहायक रासायनिक विश्लेषक ३३, वैज्ञानिक अधिकारी-१७ आदींचा समावेश आहे. तर, वाहनचालक-३, प्रयोगशाळा परिचर-७१ आदी जागा बाह्य यंत्रणेद्वारे भरल्या जाणार आहेत.
फॉरेन्सिक लॅबमधील रिक्त पदे भरण्याला मान्यता देण्यात आली आहे. त्याची कार्यवाही लवकर करण्याची सूचना केली आहे. जेणेकरून त्याठिकाणी प्रलंबित केसेस लवकर निकालात निघतील.
सतेज पाटील, गृह राज्यमंत्री
Read Full GR Here
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents