Pet Exam Timetable Download 2021

मुंबई विद्यापीठाने PET परिक्षेसाठीचे वेळापत्रक जाहीर केले ! येथे करा डाउनलोड

Pet Exam Timetable Download 2021 – Mumbai University’s stomach examination schedule has been issued. Examinations for Anthropology, Commerce and Management and Interdisciplinary will be held on 17th December, while Examinations for Science and Technology will be held on 18th December.

MU PET 2021 मुंबई विद्यापीठाच्या पेट (Phd Entrance Test पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. शुक्रवार १७ आणि शनिवार १८ डिसेंबर २०२१ रोजी विद्याशाखानिहाय आणि विषयनिहाय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

यानुसार मानव्यविद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा आणि आंतरविद्याशाखेच्या परीक्षा १७ डिसेंबर रोजी तर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या परीक्षा १८ डिसेंबर रोजी आयोजित केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ९ ते १५ डिसेंबर दरम्यान सराव (मॉक) परीक्षांचेही आयोजनही ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे.

पेट परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये एकूण ४,४९९ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून २,६५४ एवढ्या मुलींनी तर १,८४५ एवढ्या मुलांनी अर्ज केले आहेत. विद्याशाखानिहाय विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी सर्वाधिक १,९२१ एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यानंतर मानव्यविद्याशाखेसाठी १,१३२, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी ७४५ आणि आंतरविद्याशाखेसाठी ७०१ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. एकूण ७९ विषयांसाठी ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी रसायनशास्त्र विषयासाठी सर्वाधिक ४६९ एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यापाठोपाठ इंग्रजी या विषयासाठी २२५ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत.


Pet Exam Timetable Download 2021 – Mumbai University has announced the schedule for PhD and MPhil entrance exams. Accordingly, MPhil will be held on March 25 and PhD entrance examination will be held on March 26 and 27, 2021. Download PET Exam Timetable 202 from below link

मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षी २७ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० दरम्यान पेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवले होते.  पीएचडी आणि एमफील प्रवेश परिक्षेसाठीचे मुंबई विद्यापीठाने वेळापत्रक जाहीर केले आहे. एकूण ७९ विषयांसाठी ही परीक्षा ॲानलाईन पद्धतीने होणार असून याबाबतचे सविस्तर विषयनिहाय वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

वेळापत्रक (PET March Timetable)

  • २५ मार्च रोजी एमफील
  • तर २६ आणि २७ मार्च २०२१ रोजी पीएचडी प्रवेश परीक्षा होणार आहे.

मॅाक टेस्ट लिंक (PET Mock Test Link)

दिनांक १२ ते १७ मार्च दरम्यान विद्यार्थ्यांना मॅाक टेस्ट परीक्षा देता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना लघुसंदेश आणि ईमेलवर माहिती पाठविण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॅा. विनोद पाटील यांनी सांगितले.

Information For PET March 2021 Exam

Pet Exam Timetable Download 2021

Click On Below Link To Download Pet Exam Timetable

Download PET TT

Leave a Comment