Mazi Ladki Bahin Yojna मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात याचिका !

Mazi Ladki Bahin Yojna मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात याचिका !

Petition in court against Ladaki Baheen Yojana :

राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यातील शिंदे सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोवर्ष गटातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा होणार आहेत. येत्या १४ ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी हे पैसे महिलांना मिळणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील महिलावर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र आता लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागणार का? अशा चर्चा सुरु झाल्यात कारण माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मंगळवारी या याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे.

मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार-
नावेद मुल्ला नावाच्या याचिकाकर्त्याने माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने ही योजना सुरु केली आहे. ही भ्रष्ट कृती असून हा मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार आहे त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना म्हणजे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. सामान्य जनता 28 टक्क्यांपर्यंत GST कर भरते. हे पैसे फुकट वाटण्यासाठी नाहीत असं नावेद मुल्ला यांनी आपल्या याचिकेत म्हंटल आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी मंगळवारी 6 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना कायद्याच्या कचाट्यात सापडणार का? हे पाहायला हवं. असं झाल्यास राज्यभरातील महिलावर्गाला हा सर्वात मोठा धक्का असेल.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली होती. ही योजना म्हणजे जनतेची फसवणूक आहे. आता विधानसभा निवडणूक आहे पण दोन महिन्यांनी लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही.

Leave a Comment