Pimpri Chinchwad Mahapalika Recruitment 2022

महापालिकेत 4 हजार 246 पदे रिक्त , जाणून घ्या कोणती पदे भरली जाणार !!

Pimpri Chinchwad Mahapalika Recruitment 2022 – Manpower is declining every month due to old age and voluntary retirement of staff officers. As a result, the number of vacancies is increasing and we have to rely on contract workers for work. At present 11 thousand 511 posts in 355 different categories of A, B, C and D are sanctioned by the Government. Of these, 4,246 posts are vacant. Know More details about Pimpri Chinchwad Mahapalika Recruitment 2022, PCMC Jobs 2022, PCMC Upcoming Bharti 2022 at below

पिंपरी-चिंचवड पालिकेत विविध पदांची भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड-आरोग्य सेविका पदांसाठी भरती 

▶️पिंपरी चिंचवड पोलीस भरती निवड व प्रतीक्षा यादी जाहीर 

गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेत (Pimpri Municipal) नोकर भरती (Recruitment) बंद (Close) आहे. मात्र, नियत वयोमानानुसार व स्वेच्छेने निवृत्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांमुळे मनुष्यबळ (Man Power) दर महिन्याला घटत आहे. परिणाम, रिक्त जागांची संख्या वाढत असून कामकाजासाठी कंत्राटी कामगारांवर अवलंबून राहावे लागत आहे. सद्यःस्थितीत अ, ब, क व ड या चारही पदांवरील विविध ३५५ संवर्गातील ११ हजार ५११ पदे सरकारकडून मंजूर आहेत. त्यातील चार हजार २४६ पदे रिक्त आहेत.

महापालिकेच्या नवीन आकृतिबंधानुसार एक आयुक्त, तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे मंजूर आहेत. अतिरिक्त आयुक्ताची दोन पदे शासन नियुक्त व एक पद महापालिका सेवेतील अधिकाऱ्यांसाठी आहे. सध्या ही चारही पदे भरलेली आहेत.

सहआयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, प्रशासन अधिकारी, शहर अभियंता, सहशहर अभियंता, कार्यकारी अभियंता आदी १२० संवर्गातील पदे अधिकारी श्रेणीतील आहेत. त्या २७९ पदांपैकी १६८ पदे भरलेली आहेत. त्यात १५२ पदे महापालिका सेवेतील व १६ पदांवर शासन नियुक्त अधिकारी कार्यरत आहेत. १११ पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका अधिकाऱ्याला दोन-तीन विभागांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे.

अशीच स्थिती ब वर्ग संवर्गातील अधिकाऱ्यांचीही आहे. त्यांच्या विविध ४७ संवर्गातील ३२४ मंजूर पदांपैकी २१५ पदे भरलेली आहेत. त्यात महापालिका सेवेतील २११ व शासन नियुक्त चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. १०९ पदे रिक्त आहेत.

शिक्षकांची ४९३ पदे रिक्त

महापालिका सेवेतील शिक्षकांचा समावेश ‘क’ गटात होता. महापालिकेच्या १०५ प्राथमिक व २४ माध्यमिक, अशा १२९ शाळा आहेत. त्यांच्यासाठी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, शिक्षक, उपशिक्षक आदी ११ संवर्गातील एक हजार ६१४ पदे मंजूर आहेत. त्यातील एक हजार १२१ पदे भरलेली असून सर्व महापालिका सेवेतील आहेत. अद्याप ४९३ पदे रिक्त आहेत.


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागात लवकरच 50 नवी पदे भरण्यात येतील, जाणून घ्या कोणती पदे भरली जाणार !!

Pimpri Chinchwad Mahapalika Recruitment 2022 – Considering the scope of work of Pimpri-Chinchwad Municipal Corporation’s electricity department, the state government has finally sanctioned 50 additional posts. The diagram of the employees working under the municipal administration was prepared. The proposal given by Pimpri-Chinchwad Municipal Administration was approved by the Ministry of Urban Development of the State Government. So now 50 new posts will be filled in the power department. The posts of Co-City Engineer-1, Executive Engineer-3, Deputy Engineer-4, Junior Engineer-7, Electrical Supervisor-5, Electrical Engineer-10, Wireman-20 have been sanctioned. Know More about PCMC Electricity Department Bharti 2022, Pimpri Chinchwad Mahapalika Recruitment 2022 at below

PCMC Electricity Department Bharti 2022

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कामाची व्याप्ती लक्षात घेवून राज्य शासनाने 50 वाढीव पदांना अखेर मंजुरी दिली आहे. याबाबत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी यशस्वी पाठपुरावा केला आहे.

Pimpri Chinchwad Mahapalika Recruitment 2022

महापालिका प्रशासनाअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध तयार करण्यात आला होता. यासंबंधी प्रस्ताव 14 जून 2017 रोजी राज्याच्या नगरविकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, नगरविकास खात्याकडून अद्याप मंजुरी देण्यात आली नव्हती.

दरम्यान, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केला. महापालिकेतील कर्मचारी संख्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त कर्मचारी, मयत कर्मचारी, स्वेच्छा निवृत्त कर्मचारी कमी होत आहेत. तसेच, शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रशासकीय कामाचा व्यापही वाढत आहे. पूर्वी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांची संख्या ४ इतकी होती. त्यामध्ये वाढ होऊन आता ती संख्या ८ इतकी झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाला मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्याला अखेर यश मिळाले आहे.

सहशहर अभियंतासह 50 नव्या पदांना मंजुरी!

राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाकडून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता विद्युत विभागातील 50 नवी पदे भरण्यात येतील.

  • सहशहर अभियंता-1
  • कार्यकारी अभियंता- 3
  • उप अभियंता- 4
  • कनिष्ठ अभियंता- 7
  • विद्युत पर्यवेक्षक- 5
  • विजतंत्री- 10
  • वायरमन- 20 अशा पदांना मंजुरी देण्यात आली आहे.

आयुक्तांनी त्वरीत अंमलबजावणी करावी : आमदार लांडगे

राज्य शासनाच्या नगर विकास खात्याने महापालिका विद्युत विभागातील संबंधित 50 पदांच्या आकृतीबंधाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने शासनाच्या आदेशाची त्वरीत अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Leave a Comment