Advertisement

पंतप्रधानांच्या द्वारे PM किसान योजनेचा १६वा व ‘नमो’चा दुसरा-तिसरा हप्ता वितरित

प्राप्त माहिती नुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथून २८ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता पीएम किसान सन्मान योजनेचा १६वा हप्ता आणि राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता वितरित केला जाणार आहे. तसेच, याद्वारे महाराष्ट्रातील ८८ लाख शेतकऱ्यांना ५,७६० कोटींचा लाभ मिळणार आहे. या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात प्रत्येकी ६,००० रुपये जमा होतील. 

 

केंद्र शासनाने शुक्रवारी व्हीसीद्वारे तसे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शनिवारी पत्राद्वारे कळविले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या दोन्ही योजनांचा लाभ पात्र शेतकरी खातेदारांना देण्यात येणार होता. मात्र, याचा मुहूर्त आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी या गावात निघाला आहे. २८ फेब्रुवारीला पंतप्रधानांचा येथे दौरा आहे व या दौऱ्यात त्यांच्या हस्ते एका क्लिकद्वारे ५,७६० कोटींचे वितरण संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात होणार आहे. त्यामुळे हा दिवस जिल्हा, तालुका व गावपातळी व केव्हीके, सीएससी केंद्र येथे ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याच्या सूचना कृषी संचालकांनी दिल्या आहेत. या कार्यक्रमात खासदार, आमदारांसह स्थानिक लोकप्रतिनिधी यांना आमंत्रित करावे व लिंकद्वारे शेतकऱ्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेण्याच्या सूचना आहेत.

PM Kisan yojna 16th Payment  – The PM-Kisan Samman Nidhi is a significant initiative by the Government of India to provide financial support to farmers. Under this scheme, eligible landholding farmer families receive an income support of ₹6,000 per year, distributed in three equal installments of ₹2,000 each every four months. Here are some key details about the scheme:

16th Installment Release Date: Honourable Prime Minister Narendra Modi will release the 16th installment of the PM-Kisan scheme on 28th February 20241.

 

पंतप्रधानांच्या एका क्लिकवर मिळणार लाभ

  • पीएम किसान योजना १६वा हप्ता शेतकरी लाभार्थी : ८८ लाख मिळणारा लाभ : १,९६० कोटी
  • नमो शेतकरी महासन्मान निधी (दुसरा व तिसरा हप्ता)
  • शेतकरी लाभार्थी : ८८ लाख मिळणारा लाभ : ३,८०० कोटी

Leave a Comment