शिक्षण कमी झालंय ? तर या योजनेबद्दल जाणून घ्या व मोफत ट्रेनिंग चा लाभ घ्या
Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana (PMKVY) – कमी शिक्षण घेतलेल्या अथवा मधूनच औपचारिक शिक्षण सोडलेल्या लोकांना रोजगाराच्या दृष्टीने कौशल्ये मिळवून देण्यासाठी ” पंतप्रधान कौशल्य विकास योजना” आयोजित करण्यात आली आहे. तसेच, या योजनेत तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षांचे रजिस्ट्रेशन असते.
या योजनेअंतर्गत कोर्स पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना एक सर्टीफिकेट दिलं जातं जे संपूर्ण देशभरासाठी वैध असतं. या योजनेत सरकारकडून तरुणांना 8 हजार रुपये दिले जातात. कोर्स पूर्ण झाला की सरकार एक सर्टिफिकेट देतं. ते अख्ख्या देशात वापरता येतं. पंतप्रधान कौशल्य विकास योजने अंतर्गत 2022 पर्यंत देशातील जवळपास 40 कोटी लोकांना प्रशिक्षित करण्याचे ध्येय ठेवले गेले आहे. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वत:च्या रोजगारासाठी कर्ज मिळवण्याचीही सुविधा आहे. या योजनेचा तिसरा टप्पा आता सुरु झाला आहे.