प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथे भरती सुरु ; १२ वी उत्तीर्णांसाठी संधी !
Regional Mental Hospital Ratnagiri Bharti 2024 :
प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथे रिक्त पदे उपलब्ध आहेत. पदे भरण्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी यांच्यातर्फे भरती जाहीर केली आहे. या भरतीत अर्ज करण्यासाठी दिनांक १ ऑगस्ट २०२४ हे शेवटची तारीख नेमून देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज योग्य त्या कागदपत्रांसहित ऑफलाइन पद्धतीने जमा करणे आवश्यक आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि मासिक वेतन याच्याबद्दल जाणून घेऊ.
रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावे लागतील. १९ जुलै २०२४ पासून अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. १ ऑगस्ट २०२४ ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख म्हणून घोषित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज जमा करताना तो निघून गेलेल्या अंतिम तारखेच्या आधीच जमा होईल यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी.
प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथे 3 रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय २१ ते ३८ वर्षे यामधील असणे आवश्यक आहे. या रिक्त पदांच्या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण लागू होणार नाही. त्यामुळे सर्व वर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा सारखीच असेल.
पदे-
- मेडिकल को-ऑर्डिनेटर
- अकाउंटंट कम बिलिंग क्लर्क
- डेटा एन्ट्री ऑपरेटर
वरती नमूद केलेल्या तीन पदांपैकी कोणत्याही पदासाठी अर्जदार अर्ज करत असेल तरी अर्ज जमा करताना अर्जासोबत रेझ्यूमे, तसेच शैक्षणिक पात्रतांबद्दल हमी देणारे प्रमाणपत्रे, अनुभवाची हमी देणारे प्रमाणपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
अर्ज जमा करण्यासाठी पत्ता: अधिक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी.
जमा झालेल्या अर्जांमधून पात्र उमेदवारांची निवड करून पुढे मुलाखत पद्धतीने त्यातून योग्य उमेदवाराची पदासाठी निवड करण्यात येईल. रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयातील या भरतीतून कंत्राटी पद्धतीने तात्पुरते स्वरूपासाठी ही पदे भरण्यात येतील.
रत्नागिरी जिल्ह्यातील भरती आणि इतर माहिती सविस्तर स्वरूपात https://ratnagiri.gov.in/ या लिंक वर मिळेल.