रेल्वेमध्ये ९१४४ पदांची मेगा भरती ; अर्ज प्रक्रिया सुरु !

रेल्वेमध्ये ९१४४ पदांची मेगा भरती ; अर्ज प्रक्रिया सुरु !

RRB Recruitment 2024 : नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता Railway Recruitment Board (RRB) अंतर्गत मेगाभरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण ९१४४ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. “तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II” या दोन पदांसाठी ही भरती असून इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. ९ मार्च पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून आज आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पात्र उमेदवाराची वयोमर्यादा , अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि अर्ज कसा भरावा, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव – Railway Recruitment Board (RRB) अंतर्गत खालील दोन पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

  • तंत्रज्ञ ग्रेड I
  • तंत्रज्ञ ग्रेड II

पदसंख्या – तंत्रज्ञ ग्रेड I आणि तंत्रज्ञ ग्रेड II या दोन पदांसाठी एकूण ९१४४ जागा रिक्त आहे. तंत्रज्ञ ग्रेड I साठी आणि तंत्रज्ञ ग्रेड II साठी या जागा विभागल्या आहेत. त्या खालील प्रमाणे –

  • तंत्रज्ञ ग्रेड I – ११००
  • तंत्रज्ञ ग्रेड II – ७९००

वयोमर्यादा – या पदासाठी पात्र उमेदवाराची वयोमर्यादा खालीलप्रमाणे असावी.

  • तंत्रज्ञ ग्रेड I – १८ ते ३६ वर्षे
  • तंत्रज्ञ ग्रेड II – १८ ते ३३ वर्षे

अर्ज शुल्क – सर्व उमेदवारासाठी अर्ज शुल्क हा ५०० रुपये आहे तर SC,ST,Ex-Serviceman, PWED, आणि महिला उमेदवारासाठी अर्ज शुल्क २५० रुपये आहे.

पगार – पात्र उमेदवारांचा पदांनुसार पगार खालीलप्रमाणे असेल

  • तंत्रज्ञ ग्रेड I- २९,२००
  • तंत्रज्ञ ग्रेड II – १९, ९००

निवड प्रक्रिया – या पदांसाठी निवड प्रक्रिया ही संगणक आधारित परिक्षाद्वारे असेल.

अर्ज सुरू होण्याची तारीख – ९ मार्च २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ एप्रिल २०२४

अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.

अधिसुचना – https://drive.google.com/file/d/1nRQZ9Tozepyh2bKQzvtcEEL2w9jIxoZB/view?usp=sharing

अर्ज कसा करावा ?
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात घेता त्यापूर्वी अर्ज करावा.
नीट माहिती भरून शेवटी प्रवेश शुल्क भरावा.
आणि अर्जाची प्रिंट आपल्याजवळ काढावी.

Leave a Comment