RRC रेल्वेत अप्रेंटिसशिप पदांची मेगाभरती! १०वी उत्तीर्ण असलेल्या तरुणांना संधी
RRC Central Railway Bharti 2024 :
RRC म्हणजेच सेंट्रल रेल्वेच्या द रेल्वे रिक्रुटमेंट सेल यांच्यातर्फे भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीतून २ हजार ४२४ उमेदवारांना अप्रेंटिसशिप देण्याची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेल यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करावा लागेल. हा अर्ज सादर करण्यासाठी दिनांक १६ जुलै २०२४ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२४ इतका कालावधी नेमून देण्यात आला आहे. १५ ऑगस्ट २०२४ नंतर सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरतीमधून २ हजार ४२४ तरुणांना रेल्वेसोबत अप्रेंटिसशिप करण्याची संधी मिळेल. या कामाच्या अनुभवावरून या सर्व उमेदवारांना पुढे सेंट्रल रेल्वेसोबत काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही भरती खुली केली आहे.
वयोमर्यादा आणि शुल्क-
रेल्वे रिक्रुटमेंट सेल अंतर्गत असलेल्या या भरतीतून अप्रेंटिसशिप मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे वय हे वय वर्ष १५ ते २४ वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे. SC, ST वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेच्या अटीत ५ वर्षांची सूट दिली जाईल. तर OBC वर्गातील वयोमर्यादेत उमेदवारांना यात ३ वर्षांची सूट मिळेल. SC, ST या वर्गातील उमेदवारांना तसेच महिला उमेदवारांना हा अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. OBC आणि खुल्या वर्गातील अर्जदारांकडून हा अर्ज भरण्यासाठी १००/- अर्ज शुल्क आकारले जाईल.
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक. (५०% गुण असणे आवश्यक)
व्होकेशनल ट्रेनिंगच्या स्टेट काऊन्सिल किंवा नॅशनल काऊन्सिल तर्फे देण्यात आलेले नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट उमेदवाराकडे असणे आवश्यक.
अर्ज कसा भरावा?
- रेल्वे रिक्रुटमेंट सेलच्या https://rrccr.com/TradeApp/Login या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवार अप्रेंटिसशिपमध्ये
- सहभागी होण्यासाठी अर्ज दाखल करू शकतात.
- संकेतस्थळावर जाऊन तेथे अपलाय ऑनलाइन या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- तिथे समोर आल्यानंतर तो उमेदवारांना अत्यंत लक्षपूर्वक भरायचा आहे.
- अर्जात विचारलेले तपशील, सर्व कागदपत्रे, आणि फोटो हे भरायचे आहे.
- हे भरल्यानंतर पुढे अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
- अर्ज संपूर्ण भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घ्यावा आणि मगच तो जमा करावा.
https://rrccr.com/TradeApp/Login या संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवार त्यांचा या अप्रेंटिसशिप साठी चा अर्ज सादर करू शकतात.