राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एमसीए रिक्त जागांची प्रवेश प्रक्रिया सुरू !
RTMNU Admission 2024 :
नागपूर विद्यापीठ या मूळ विद्यापीठाचे २००५ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. विद्यापीठाचे स्वरूप संलग्न व अध्यापनात्मक आहे. तुकडोजी महाराज यांचे ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ हे प्रसिद्ध गीत विद्यापीठाचे विद्यापीठ गीत आहे. हे विद्यापीठ असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि असोसिएशन ऑफ कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीजचे सदस्य आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची एमसीए प्रवेशांची प्रक्रिया आज मंगळवार, १० सप्टेंबर रोजी; तर विविध कॉलेजांमधील बीफार्मची प्रक्रिया गुरुवार, १२ सप्टेंबर रोजी राबविली जाईल.
फार्मसी द्वितीय वर्षासाठी संस्थास्तरीय प्रवेशांसाठी गुरुवारी सकाळी १०.३० ते दुपारी १२ या वेळेत नोंदणी होईल. त्याच दिवशी तात्पुरती गुणवत्ता यादी दुपारी १ वाजता; तर अंतिम गुणवत्ता यादी १.३० वाजता प्रसिद्ध होईल. दुपारी २ वाजता या यादीनुसार प्रवेश केले जातील. एमसीए प्रथम वर्षाच्या रिक्त जागांचे प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. संस्थास्तरावर रिक्त जागा भरण्यासाठी ही प्रवेशप्रक्रिया मंगळवारी राबविली जाणार आहे.
सोमवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून मंगळवारी सकाळी ११.३० वाजता तात्पुरती गुणवत्ता यादी लागणार आहे. या यादीवर काही आक्षेप असल्यास ते दूर करून दुपारी १.३० वाजता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. दुपारी २.३० वाजता विद्यार्थ्यांच्या समुपदेशनातून रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ( RTMNU ), पूर्वीचे नागपूर विद्यापीठ , हे नागपूर येथे स्थित एक सार्वजनिक राज्य विद्यापीठ आहे. हे भारतातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे, तसेच महाराष्ट्रातील दुसरे सर्वात जुने विद्यापीठ आहे. विदर्भातील अध्यात्मिक नेते, वक्ते आणि संगीतकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. हे विद्यापीठ असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि असोसिएशन ऑफ कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीजचे सदस्य आहे.