Sainik School Nashik Admission 2020 – 2021
Admission process of Sainik School Nashik (Bhonsala Military School) is started Now. This year because of Corona Epidemic there is some Changes in Admission process. Read following details carefully.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) निवड होण्यासाठी विद्यार्थ्यांची उत्तम प्रकारे तयारी करून घेणाऱ्या औरंगाबाद येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेने करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रियेच्या स्वरूपात बदल केला आहे. प्रवेश परीक्षा आणि मुलाखत न घेता केवळ दहावीतील गुणवत्ता क्रमानुसार २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे कमी गुण असलेल्या परंतु, क्रीडासह इतर अवांतर क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी असणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
सैनिकी क्षेत्रात मराठी टक्का वाढावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था सुरू करण्यात आली आहे. या संस्थेत इयत्ता १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ‘एनडीए’साठी निवड होण्याकरिता या संस्थेत विद्यार्थ्यांची कसून तयारी करून घेतली जाते. त्यामुळे ‘एनडीए’मध्ये निवड होणाऱ्यात या संस्थेतील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असते. दरवर्षी या संस्थेत फक्त ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत असे प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप असते. याशिवाय शारीरिक पात्रताही तपासली जाते.
यंदा करोना संकट काळात संस्थेने प्रवेश प्रक्रियेत बदल केला आहे. इयत्ता १० वीतील गुणवत्ता क्रमानुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यांची प्रवेश परीक्षा आणि मुलाखत घेतली जाणार नसल्याचे संस्थेचे संचालक कर्नल (निवृत्त) अमित दळवी यांनी नमूद केले आहे.
गुणवत्ता क्रमासाठी गणित,विज्ञान आणि इंग्रजी या विषयातील गुण ग्राह्य़ धरले जाणार असून संस्थेकडे आलेल्या अर्जानुसार गुणवत्ता यादी तयार करून ती संस्थेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार असून ३१ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना माहिती भरता येणार आहे.
Guidelines for filling Online Admission Form (Bhonsala Military School)
1. Complete Registration using Mobile Number.
2. Login to Admission Portal by Using Registered Mobile Number.
3. Fill the information of student, parents and Demand Draft. Upload relevant documents.
4. Print the online form, fill remaining details & sign on given space.
5. Send the printed copy of the form to Bhonsala Military School Nashik , through post/courier along with DD & xerox copy of a relevant document as mentioned in the form.
6. Admission open for 5th to 9th standard only.
https://bms.bhonsala.in//Encyc/2020/2/8/Admission-Form.html
मागणी काय?
’ एनडीए प्रवेशाचे स्वप्न बाळगून काही वर्षांपासून क्रीडा क्षेत्रासह शारीरिक संपदेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश प्रक्रियेतील या बदलामुळे धक्का बसला आहे.
’ एनडीएसाठी केवळ अभ्यासातील गुणवत्ताच नव्हे, तर इतर क्षेत्रातील कामगिरीही महत्त्वपूर्ण ठरते. अशा कामगिरीचा ठसा मुलाखतीवेळी पडत असल्याने अभ्यासातील गुणवत्ता कमी असूनही विद्यार्थ्यांची चौफेर गुणवत्ता उजेडात येऊन त्यांना न्याय मिळतो.
’ परंतु, आता एनडीएची तयारी करून घेणाऱ्या संस्थेत प्रवेशासाठी मुलाखतीलाच बगल देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
’ करोनाच्या पाश्र्वभूमिवर परीक्षा घेणे शक्य नसल्यास किमान ऑनलाइन मुलाखती तरी घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांकडून केली जात आहे.
सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत परीक्षा आणि मुलाखत न घेता केवळ इयत्ता १० वीतील गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश देणे क्रीडासह इतर क्षेत्रात चांगली कामगिरी असणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे प्रवेश परीक्षा आणि मुलाखत याआधारेच संस्थेत विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी
– एस. पी. पाटील, पालक, नाशिक
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents