SAMEER मध्ये विविध पदांसाठी भरती!

SAMEER मध्ये विविध पदांसाठी भरती!

SAMEER Recruitment 2024 : सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च या भारत सरकारच्या स्वायत्त संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. भरतीची अर्जप्रक्रिया आणि निकषासंबंधी माहिती सांगणार आहोत.

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (SAMEER) मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासंबंधीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीप्रक्रियेसाठी ऑनलाईन ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.

SAMMER Recruitment

पदे आणि जागा

अकाउंट्स ऑफिसर- 1 जागा
लोअर डिव्हिजन क्लर्क – 3 जागा
मल्टी-टास्किंग स्टाफ- 2 जागा

वयोमर्यादा : या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 35 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क : तर या भरतीप्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारास अर्ज शुल्क 200 रुपये आकारण्यात आले आहे.

एससी /एसटी/ महिला/ अपंग व्यक्ती/ माजी सैनिकी यांना 50 रुपये अर्ज शुल्क असणार आहे.

नोकरीचे ठिकाण : मुंबई, कोलकाता, चेन्नई

अर्ज पाठविण्याचा पत्ता- रजिस्ट्रार, सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (समीर), आयआयटी कॅम्पस, पवई, मुंबई – 400076

अर्ज प्रक्रिया

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन www.sameer.gov.in या वेबसाइटवर सबमिट करणे आवश्यक आहे.
  • लिंक सक्रीय असण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे.
  • ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जदारांनी त्याची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे, अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आणि अर्ज स्पीड पोस्टने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • 15 सप्टेंबर 2024 पर्यंत हा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहचणे आवश्यक आहे .
  • लिफाफ्यावर जाहिरात क्रमांक, नाव आणि कोड आणि कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे हे लिहिलेले असावे.
  • फक्त तेच अर्ज विचारात घेतले जातील ज्याची हार्ड कॉपी अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत प्राप्त झाली आहे.
  • ऑनलाइन अर्जामध्ये दिलेल्या माहितीची सुरुवातीला तपासणी केली जाईल त्यानंतर उमेदवारांना मुलाखत/लेखी परीक्षा/कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाईल.
  • अपूर्ण आणि ऑनलाइन न सादर केलेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
  • ज्या उमेदवारांना मुलाखत / लेखी परीक्षा / कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाईल त्यांनी मूळ दस्तऐवजांसह त्याच्या कॉपीचा एक संच सोबत बाळगणे आवश्यक आहे

Leave a Comment