सरळ सेवा भरती करीता Screeing Test- Maha Saral Seva Bharti 2022

Important Update नवीन GR -सरळसेवेची पदभरती निवड समित्यांतर्फे,भरती दरवर्षी सप्टेंबरमध्ये 

Maha Saral Seva Bharti 2022 – It was decided to fill up the posts of Group B (Non-Gazetted), Group C and Group D in the category of Nomination Quota in the category of former Secondary Service Selection Boards (outside the purview of Maharashtra Public Service Commission) through the Mahapariksha website. However, due to irregularities in the process of Mahapariksha website, the alliance government decided to close Mahapariksha website. After that, it was decided to select private companies and recruit them through OMR system in 2021. This method was postponed due to irregularities in the examinations conducted by the selected companies. Now the guidelines for implementation of recruitment process through district, regional and state level selection committees were issued by the General Administration Department on Wednesday.

सरळसेवेची पदभरती निवड समित्यांतर्फे खासगी कंपन्यांद्वारेच

सर्व शासकीय पदांची भरती पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) परीक्षा घेण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र गट ब (अराजपत्रित), गट क आणि गट ड संवर्गातील सरळसेवेची पदभरती आता जिल्हा, प्रादेशिक आणि राज्यस्तरीय निवड समितीमार्फत आणि खासगी कंपनीद्वारे ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातूनच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरळसेवा पदभरती  लेखी परीक्षा अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर सरावासाठी उपलब्ध आहे. तसेच मोफत टेस्ट सिरीज साठी उमेदवारांनी प्लेस्टोर वर “महाभरती एक्साम” (MahaBharti Exam) हि अँप मोफत डाउनलोड आणि रजिस्टर करून रोज मोफत  टेस्ट सिरीज सोडवावी. 

✅सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!!

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोटय़ातील गट ब (अराजपत्रित), गट क आणि गट ड संवर्गातील सरळसेवेची पदे महापरीक्षा संकेतस्थळामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र महापरीक्षा संकेतस्थळामार्फत झालेल्या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याने  आघाडी सरकारने महापरीक्षा संकेतस्थळ बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खासगी कंपन्यांची निवड करून त्यांच्या माध्यमातून ओएमआर पद्धतीने परीक्षा घेऊन पदभरती करण्याचा निर्णय २०२१ मध्ये घेण्यात आला. निवडलेल्या कंपन्यांमार्फत घेतलेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याने ही पद्धत स्थगित करण्यात आली. आता जिल्हा, प्रादेशिक आणि राज्यस्तरीय निवड समितीमार्फत पदभरती प्रक्रिया राबवण्याच्या मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी प्रसिद्ध केला.

Maha Saral Seva Bharti 2022

Maha Saral Seva Bharti 2022 Full GR Download


Important Update –  सरळ सेवा भरती करीता आयोगाकडून चाळणी परीक्षेचे आयोजन, जाणून घ्या कधी ?

Maha Saral Seva Bharti 2022 Maharashtra Public Service Commission has issued new Notice regarding Saral Seva Bharti 2022. According to the official MPSC Saral Seva Notice, below is a list of exam for which Screening test will be conducted. For this exam very soon commission will inform about Exam Pattern, Exam Syllabus, MPSC Saral Seva Exam Date on its official site i. e mpsc.gov.in… Important update regarding will be published here so stay connected to this page for more information on Maha Saral Seva Bharti 2022

Maha Saral Seva Bharti 2022 Exam Details

आयोगामार्फत सरळसेवा भरतीकरिता प्रसिध्द करण्यात आलेल्या विविध जाहिरातीस अनुसरून चाळणी परीक्षेच्या आयोजनाबाबतचे प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे.

Maharashtra Direct Recruitment Exam Screening Test 2022

Maha Saral Seva Bharti 2022

Full PDF – Announcement regarding Screening Test of Various Direct Recruitment Posts


सरळसेवा पदभरती २०२२ शासन GR प्रसिद्ध – परीक्षा आता OMR वर  नाही तर “या” पद्धतीने होणार  !!

Maharashtra Sarkar Saral Seva Bharti 2022 – Maharashtra Government has issued New GR Regarding Conduction of Online Exam of various Department.
From here the Upcoming exam Will be taken through TCS, IBPS, MKCL. Check Full Maha Direct Recruitment 2022 Details, New Update on saral Seva Bharti at below

saral seva bharti post list | saral seva bharti 2022 maharashtra | saral seva bharti latest news

सरळसेवा पदभरती बाबत शासन GR प्रसिद्ध !! पुढील आयोजित सर्व परीक्षा TCS, IBPS, MKCL यांच्या माध्यमातून घेतल्या जातील.

OMR Vendore मार्फत सुरु असलेल्या परीक्षाप्रणाली  मध्ये विविध तक्रारी प्राप्त झाल्या मुळे राज्य मंत्रिमंडळात बुधवारी पदभरतीसाठी  सुधारित  निर्णय घेण्यात आला.. त्यानुसार परीक्षेसाठी सध्या असलेल्या कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्यात आले आहे ..तसेच पद्भारतीसाठी यापुढे होणाऱ्या परीक्षा TCS, IBPS, MKCL यांच्या माध्यमातून घेण्यात येईल .

सरळसेवा पदभरती  लेखी परीक्षा अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर सरावासाठी उपलब्ध आहे. तसेच मोफत टेस्ट सिरीज साठी उमेदवारांनी प्लेस्टोर वर “महाभरती एक्साम” (MahaBharti Exam) हि अँप मोफत डाउनलोड आणि रजिस्टर करून रोज मोफत  टेस्ट सिरीज सोडवावी. 

✅सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!!

Maharashtra Sarkar Saral Seva Bharti 2022 GR 


Maharashtra Sarkar Saral Seva Bharti 2021 – Responsibility for MHADA’s canceled exams has now been handed over to Tata Consultancy Services (TCS). Besides, all types of recruitment examinations in the state will be conducted through TCS, MKCL, IBPS. The decision was taken at a meeting of the state cabinet on Wednesday. As per the decision of the state cabinet meeting, examinations conducted by various government departments in the state will now be conducted through MKCL (Maharashtra Knowledge Corporation Limited), IBPS (Institute of Banking Personnel) or TCS (Tata Consultancy Services). About a month ago, a meeting between senior leader Sharad Pawar, Chief Minister Uddhav Thackeray, Home Minister Dilip Walse-Patil and Education Minister Varsha Gaikwad was held. The name of TCS was decided in a meeting held yesterday regarding MHADA exam.

गेल्या काही दिवसांत शासकीय अनेक परिक्षांमध्ये पेपरफुटीची प्रकरणं समोर आली आहेत. आधी लातूरमध्ये आरोग्य विभागाच्या पेपरफुटीनंतर म्हाडा परिक्षांची पेपरफुटीही समोर आली. ज्यामुळे आता असा गोंधळ टाळण्यासाठी राज्य सरकारने या परीक्षा घेण्याकरता काही कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे यापुढे राज्यातील शासकीय विभागांमार्फत होणाऱ्या परीक्षा यापुढील काळात एमकेसीएल ( महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड), आयबीपीएस ( इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल) किंवा टीसीएस ( टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस) या संस्थांच्या माध्यमातूनच घेण्यात येणार आहेत. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

या संस्था घेणार परीक्षा

– महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड

– इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल

– टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

या महत्त्वाच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अनुमती दर्शविली आहे. याआधी 2014 मध्ये सुद्धा या संस्थांच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येत होत्या. मात्र सरकार बदलल्यांतर हे कंत्राटही बदलण्यात आलं होतं. पण आता महाविकास आघाडीने आपला निर्णय बदलला आहे. दरम्यान याआधी म्हाडाच्या परीक्षा आता टीसीएसच्या मदतीनं घेण्यात येणार असल्याचं समोर आलं होतं. म्हाडाचा पेपर फुटल्यानंतर परीक्षेबाबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. पेपरफुटीमुळे रद्द झालेली परिक्षाही लवकरात लवकर घेण्यात येईल आणि त्यात पूर्ण पारदर्शकता राखली जाईल, असंही मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

पेपरफुटीमागे मराठवाडा कनेक्शन

आरोग्य विभागापाठोपाठ म्हाडाच्या परीक्षेचं पेपरफुटीचं रॅकेट समोर आलं होतं. यातलं मराठवाडा कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. आरोग्य विभागाच्या झालेल्या परीक्षेतही जालना मधील दोन आणि औरंगाबाद येथील एका व्यक्तीला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली होती. आताच्या प्रकरणात औरंगाबादमध्ये सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परिचित असलेले गणिताचे प्राध्यापक अजय चव्हाण आणि सक्षम अ‍ॅकॅडमीचा संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे हे त्यांच्या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांसाठी रॅकेटच्या प्रमुख सुत्रधाराकडून पेपर विकत घेणार होते. औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शहरात मागील काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसची वाढती संख्या आणि क्रमाने स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा आकडा वाढवण्यासाठी आता क्लासेस चालक आधीच पेपर विकत घेण्याच्या घोटाळ्यात सहभागी होत असल्याचं समोर आलं आहे. या परीक्षेच्या आयोजनाचे कंत्राट जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आली होती. या कंपनीचा संचालक डॉ. प्रितीश देशमुख यांनीच पेपर फोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी रॅकेट उघडकीस आणले. देशमुख ला अटक केल्यानंतर मात्र आरोग्य विभागाच्या घोटाळ्याप्रमाणेच शहरातील दोन क्लासेसचे तीन प्राध्यापकांनीच सर्वाधिक पेपरची मागणी केल्याचे समोर आलं होतं.

Maharashtra Sarkar Saral Seva Bharti 2021 – Mahasarkar Saral Seva Bharti 2021 Updates & Details are given here. Saral Seva Bharti 2021 is expected soon for large number of vacancies in All over Maharashtra. For More Updates about Coming Recruitment news Download the MahaBharti Official App From this Link.

प्राप्त बातमीनुसार, सध्या  राज्यातील सरळ सेवेने पदभरती करण्यासंदर्भात बिंदुनामावली अद्ययावत करण्यासाठी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ९ सप्टेंबर रोजी आदेश लाईनअप केले आहेत. त्यामुळे राज्यात विविध पदांसाठी रिक्त असणाऱ्या जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून, एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षित केलेली पदे खुल्या प्रवर्गात दाखवून संबंधित कार्यालयाने बिंदुनामावली प्रमाणित करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

त्यामुळे शासन निर्णयानुसार गट ‘क’ व ‘ड’मधील पदे तसेच छोट्या संवर्गातील मागासवर्गी्यांकरिता आरक्षित पदे सरळ सेवेने भरण्याबाबत दिलासा मिळाला असून, राज्यातील १२३ दिव्यांग शाळांचा वेतनाचाही मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांतील रिक्त पदे बिंदुनामावली प्रमाणित करून भरण्याकरिता राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने यापूर्वी १६ ऑगस्ट २०१९च्या निर्णयाने विहीत केली होती. तसेच छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांची आरक्षित पदे भरण्याकरिता २१ ऑगस्ट २०१९ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले होते. मात्र, २२ ऑगस्ट २०१९च्या आदेशानुसार या बिंदुनामावलीला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून बिंदुनामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया थंडबस्त्यात होती. शासकीय कार्यालयांमध्ये हजारोंच्या संख्येने रिक्त पदे असतानाही केवळ बिंदुनामावलीअभावी सरळ सेवा पदभरती रखडली होती.

 

Leave a Comment