SBI मध्ये ११०० पदांसाठी भरती ;त्वरित अर्ज करा !

SBI मध्ये ११०० पदांसाठी भरती ;त्वरित अर्ज करा !

SBI Recruitment 2024 : भारतीय स्टेट बँकेने ११०० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. विशेष म्हणजे अर्ज करण्याची मुदत ऑगस्टच्या १४ तारखेपर्यंत असणार आहे. तर इच्छुक उमेदवारांनॊई लवकर अर्ज करावा अन्यथा संधी हातातून निसटेल.

भारतीय स्टेट बँक (SBI) ने विविध पदांसाठी भरती प्रक्रियेस सुरुवात केली आहे. महत्वाची बाब म्हणजे भरती प्रक्रियेला सुरुवात जुलै महिन्यातच करण्यत्व आली होती. जुलैच्या २४ तारखेला भरती प्रक्रियेस सुरुवात झाली. यादरम्यान अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आल्यामुळे भारतीय स्टेट बँकेने इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. एकूण ११०० पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत असून भारतीय स्टेट बँकेत काम करू इच्छुक असणाऱ्या अनेक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. गेल्या काही दिवसांत अनेक उमेदवारांनी SBI च्या या भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. जर तुम्हीही या संधीचे सोने करू इच्छुक आहेत तर वेळ अद्याप गेलेली नाही. ऑगस्टच्या १४ तारखेपर्यंत अर्ज करण्यास मुभा देण्यात आली आहे. अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑगस्टच्या १४ तारखेच्या आत अर्ज करावा, अन्यथा ही संधी हातातून निसटून जाईल.

SBI Bharti 2024

अर्जप्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर sbi.co.in अर्ज करता येणार आहे. रिक्त पदांमध्ये डेव्हलपमेंट मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, वीआर वेल्थ, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर तसेच रिजनल हेड पदांचा समावेश आहे. अर्ज करताना उमेदवाराला मागितल्या जाणाऱ्या आवश्यक त्या सगळ्या दस्तवेजांची पुष्टी करणे महत्वाचे असणार आहे. यामध्ये संक्षिप्त बायोडेटा, ID प्रूफ, आयु प्रमाणपत्र, जातीचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र तसेच शैक्षणिक प्रमाणपत्राची गरज भासणार आहे. दस्तावेज खरे आणि सगळे असले पाहिजेत अन्यथा उमेदवाराची शॉर्टलिस्टिंग केली जाणार नाही.

अर्ज करते वेळी उमेदवाराला अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. जनरल तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ७५० रुपये इतके आहे. तर एससी/ एसटी तसेच पीडब्ल्यूबीडी उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही आहे. अर्ज शुल्क डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या साहाय्याने भरता येईल. अधिक माहितीसाठी उमेदवाराने sbi.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

 

Leave a Comment